जिवंत क्षणांची भाषा कला आणि छंद !
By Admin | Updated: September 17, 2015 22:48 IST2015-09-17T22:48:29+5:302015-09-17T22:48:29+5:30
फोटोग्राफी नावाची भाषा कुणीच शिकवली नाही ती माझीच मला आली. त्या भाषेला शब्द, व्याकरण, विश्लेषण शिकवली नाहीत; पण जगाकडे आणि प्रत्येक गोष्टीकडे

जिवंत क्षणांची भाषा कला आणि छंद !
- ओजस कुलकर्णी (फोटोग्राफर)
यात कला नेमकी कशाला म्हणायचे आणि छंद म्हणजे काय?
- हे प्रश्न मला नेहमीच त्रस द्यायचे. पण त्या उत्तरांपेक्षा, त्या प्रश्नांमधेच मी शोधून काढला, आनंद!
त्याचं नाव फोटोग्राफी.
फोटोग्राफी नावाची भाषा कुणीच शिकवली नाही ती माझीच मला आली. त्या भाषेला शब्द, व्याकरण, विश्लेषण शिकवली नाहीत; पण जगाकडे आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन शिकवला. माङयातला आणि फोटोग्राफीच्या भाषेचे आणि आमच्यातल्या संभाषणाचं माध्यम म्हणजे कॅमेरा! एक फोटोच नेहमी बोलत होता! अजूनही तो बोलतो आहे आणि बोलत राहणं कधी थांबणारही नाही.
कलेने पोट भरण्याचा माझा हेतू नव्हताच. त्यामुळे मी फक्त त्यातला आनंद घेतोय. कधी कधी फोटोत सुरकुत्या असलेले पाय असतात!
पण म्हणाल पाय? यात काय कला?
- कधी कधी फोटोत पडक्या वाडय़ाचा एक निर्भय, निर्धास्त दरवाजा असतो! पण या सुरकुत्या असलेल्या पायांकडे बघून हेच पाय, जीवनचक्राचा प्रवास करून थकलेले पण अजूनही प्रवासासाठी आतूर आणि खंबीर दिसतात. तेव्हा वाडय़ाचं दार केविलपणं भासतं! आत अंधार पण तरी स्तब्ध.
असे फोटोच फार बोलतात माङयाशी! मला दुसरं काहीच लागत नाही. फोटोतून मिळणारा आनंद हा अशावेळी आधार देत असतो! शाबासकी मिळते, कधी कधी तर कसलेही काय फोटो काढतोस, अशा शब्दांतसुद्धा ऐकावं लागतं. आणि मग मी अजूनच माझा आणि माङया कलेच्या प्रेमाचा पाया भक्कम करत असतो. माङयासाठी कला म्हणजे काय हे नाही सांगता येणार; पण माङया फोटोग्राफीवर माझं जिवापाड प्रेम आहे. हीच माझी माङयातल्या कलेची व्याख्या!