कोल्हापुरी साज आणि थाट
By Admin | Updated: November 5, 2015 21:55 IST2015-11-05T21:55:00+5:302015-11-05T21:55:00+5:30
फॅशन एक्सपर्ट फ्यूजनचं एक रूप, सध्या फॅशनमधे दिसतंय! दिवाळीची खरेदी तर करायची.

कोल्हापुरी साज आणि थाट
- शिवानी मित्र
फॅशन एक्सपर्ट
फ्यूजनचं एक रूप,
सध्या फॅशनमधे दिसतंय!
दिवाळीची खरेदी तर करायची.
पण टिपिकल पारंपरिक कपडे घेतले तर ते एकदमच फेस्टिव्ह होतात. म्हणजे मग एरव्ही वापरता येणं अवघड!
आणि जरा कॅज्युएल, फॅशनेबल काही घ्यायला जावं तर ते दिवाळीच्या मूडशी, सेलिब्रेशनशी मॅच होत नाही..
मग करायचं काय?
तेच!
मार्केटनं कधीच फ्यूजनचा हात धरलाय, तो आपणही धरायचा.
सध्या ज्या काही फेस्टिव्ह फ्यूजन फॅशन इन आहेत.
त्याचीच ही एक झलक.
त्यातलं तुम्हाला काही आवडलं तर कॉपी मारायला हरकत नाही!
1) फुलकारी-हेवी दुपट्टा
ड्रेसला महत्त्व, दुपट्टय़ाला काय एवढं महत्त्व? असं मानण्याचे दिवस आता गेले.
आता काळ नवीन. त्यामुळे या दिवाळीत चांगला घशघशीत, हेवी एम्ब्रॉयडरीवाला दुपट्टा घ्याच. तो कशावरही घालता येतो. एकदम ब्राईट रंग, पारंपरिक नक्षी, जरीकाम, जरदोसी, टिकली वर्क जे काय आवडत असेल ते!
बाकी काहीच आवडत नसेल तर पारंपरिक फुलकारी दुपट्टा घ्या.
एवढं जरी केलं तरी साध्या, नेहमीच्या पंजाबीचा लूक बदलेल. कीप इट सिम्पल, बट ट्रॅडिशनल!
2) तनमणी-मोहनमाळ- ठुशी-कोल्हापुरी साज
प्लीजच. म्हणजे हे असलं कुणी घालतं का, आता असं मुली विचारू शकतात. पण तीच तर गंमत आहे. ड्रेस मॉडर्न स्टाईलचा म्हणजे अगदी पटियाला, सिल्व्हजलेस पंजाबी किंवा अगदी प्लेअर्ड स्कर्ट घालणार असलात तरी चालेल पण त्यावर दिवाळीत सहज तनमणी, लांब मोहनमाळ, मोत्याच्या कुडय़ा, कानात डूल, बुगडी, कोल्हापुरी साज, ठुशीही वापरता येईल. शंभर गोष्टी नाही घालायच्या, फक्त एकच पारंपरिक दागिना. फ्यूजन लूक तयार.
3) मांगटिका-हेडगेअर
मांगटिका कुणी सर्रास वापरत नाही. पण स्कर्ट, टॉप, लेहेंगा स्टाईल, स्कर्ट यावर सुद्धा मांगटिका, वेल, मोत्यांचे वेल, मोती पिना, घुंगरू, मोगरा आणि मोती असं काही केसात लावता येऊ शकतं. त्यातून एक वेगळाच लूक तयार होईल.
4) पैठणी टय़ुनिक्स
पैठणीच्या कापडाचा कुर्ता अनेकजणी शिवतात. पण आता त्याचं टय़ुनिकही वेगळ्या पद्धतीनं शिवता येतं. टय़ुनिक, जिन्स, गळ्यात मोत्याची माळ, कानात मोत्याचे डूल किंवा एक मोती एवढं जरी घातलं तरी तुमचा हा भन्नाट कॉम्बो लूक तयार होतो.
5) कोल्हापुरी चपला
त्या जितक्या पारंपरिक आहेत, तितक्याच आधुनिकही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत एक तरी कोल्हापुरी चपलांचा जोड, जुती तुमच्याकडे हवेच. त्यात आता अनेक ब्राईट रंग मिळतात. कधी न वापरलेले रंग घ्या. त्यांचीच सध्या फॅशन आहे.