शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

Kiss of Love

By admin | Updated: November 20, 2014 18:25 IST

हे प्रकरण नक्की आहे काय?

 केरळातल्या कोझीकोडे शहरात घडलेल्या एका घटनेचं हे निमित्त. कोझीकोडेतल्या एका कॅफेच्या पार्किंग एरियातली ही घटना. हा कॅफे ही तरुण मुलामुलींची विशेषत: जोडप्यांची हॅँगआउटची जागा. या कॅफेच्या पार्किंगमधे एक जोडपं मिठय़ा मारत आणि किस करत असल्याचा व्हिडिओ एका मल्याळम वाहिनीने बातमी म्हणून दाखवला. त्यांचं म्हणणं होतं की, शहरात उघड्यावाघड्यावर अशी अनैतिक कृत्यं घडत आहते, हे सारं कोण रोखणार?
 
 
तो व्हिडीओ पाहून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्या कॅफेची मोडतोड केली. आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची कृत्यं करणार्‍यांना रोखलं जाईल, अनैतिक गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशी चेतावनी दिली.
 
केरळातली तशी ही पहिलीच घटना नव्हे. २0११ पासून केरळात हा वाद धुसफुसत होताच. कोडीयाथूर या शहरात २६ वर्षांच्या एका तरुणाची जमावानं हत्त्या केली. एका विवाहित स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्या जमावातल्या काही आरोपींना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली. २0१३मधेही पोलिसांनी एका अभिनेत्रीचा रात्री पुरुष सहकार्‍यांसोबत बीचवर गेल्याबद्दल छळ केला. याच वर्षीच्या जूनमधली घटना, एका महिला नाट्यकलावंताला तिच्या पुरुष सहकलाकाराबरोबर पोलिसांनी अटक केली, ते रात्री  एकत्र प्रवास करत होते, असा आरोप केला. लग्न झालेले असेल तर सौभाग्यलंकार न घालता रात्री सार्वजनिक ठिकाणी बसणार्‍या कपल्सची पोलिसांनी उलटतपासणी केल्याचे तर बरेच प्रकार अलीकडे घडले. अशा अनेक घटनांमुळे तरुण मुलांमधला संताप केरळात वाढत होता, त्याचं निमित्त होऊन एक आंदोलनच उभं राहिलं, त्याचं नाव ‘किस ऑफ लव्ह.’.
 
शॉर्ट फिल्ममेकर राहुल पासूपालन यांनी ‘किस ऑफ लव्ह’ नावाचं एक फेसबुक पेज तयार केलं. या नैतिक पोलीसगिरीचा आपण जाहीर विरोध करु आणि सार्वजनिक जागी किस करू असं आवाहन त्यांनी केलं आणि २६00 जणांनी ते स्वीकारून एकत्र जमायचं ठरवलं.
 
२ नोव्हेंबर रोजी कोचीतल्या मरीन ड्राईव्हववर एकत्र जमत या जोडप्यांनी खुलेआम किस करत, आपला निषेध नोंदवला आणि त्याचे फोटो काढून आपापल्या फेसबुकवरही टाकले.
 
पोलिसांनी या जोडप्यांना अटक केली, विविध धर्माचे म्होरकेही या तरुणांना रोखण्यासाठी जमले.  अनेकांनी तर अटक करुन घेत पोलीस व्हॅनमधे किस केले. काही मोर्चे निघाले आणि म्हणता म्हणता हे आंदोलन केरळभर पसरलं.
 
दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी किस करत, तो फोटो काढून घेत आपापल्या फेसबुक पेजवर टाकण्याचं, मित्रांना व्हॉट्सअँप करण्याचं फॅडही शहरी मुलांमधे सुरू झालं. आणि ज्या शहरात अशी नैतिक पोलिसगीरी नाही, तिथले तरुणतरुणीही आपण कसे ट्रेण्डी आहोत हे दाखवण्यासाठी किस करत फोटो काढत सुटले.
 
७ डिसेंबरला एक मोठं आंदोनल करण्याचा किस ऑफ लव्ह वाल्यांचा दावा आहे. आणि लाखाहून जास्त असलेले त्यांच्या पेजचे पाठीराखे या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं जाहीर करत आहेत.
 
प्रेमाच्या प्रदर्शनाला विरोध कसला करता म्हणून आंदोलन करणारे तरुण आणि आपली संस्कृती नासवून टाकायला निघालेल्यांना रोखायचं म्हणून पुढे येणारे तरुण, यांच्यात हे युद्ध सुरू झालं. टीव्हीचॅनल्ससह मीडियानं ते देशभर दाखवलं.
 
केरळच्या बाहेर देशभरातल्या मोठय़ा शहरातही हे लोण पसरलं. हैद्रराबाद, कोलकाता, दिल्ली विद्यापीठ, इथंही हे आंदोलन सुरू झालं.
 
हे आंदोनल उचलून धरणारे होते तसंच ते बंद पाडणारे तरुणही होते. मास रिपोर्टिंग करत किस ऑफ लव्ह हे फेसबुक पेज बंद पाडण्यात आलं. पुन्हा कुणीतरी ते सुरू केलं, पुन्हा लाईक्स-कमेण्टा आणि निषेधाचे झेंडे फडकू लागले.
 
तोंड कसं फुटेल?
मॉरल पोलिसिंगच्या केसेस केरळमध्ये कॉमन होत चालल्या आहेत. आमचं म्हणणंच नाही की, हे असं रस्त्यात किस करुन समाज बदलेल. मात्र असं ‘काहीतरी’ केल्याशिवाय जर माध्यमं आणि समाजात चर्चाच होणार नसेल, तर विषयाला तोंड फोडणार कसं? बदल दहा-पंधरा वर्षांत होतील, पण ही नैतिक पोलीसगिरी स्वातंत्र्याची गळचेपी आहे, हे तरी समाजाला कळले पाहिजे.
- राहुल पासुपालन, 
कोचीत राहणारा २८ वर्षांचा शॉर्टफिल्म मेकर, ज्यानं किस ऑफ लव्ह फेसबुक पेज सुरू करुन हे आंदोलन सुरू केलं.
 
आय अँम व्हेरी ओके विथ पीडीए
सार्वजनिक ठिकाणी किस करणार्‍यांना फ्रान्स सरकार पैसे देतं, का? तर त्यांना आपला देश जगातली सगळ्यात रोमॅण्टिक जागा आहे हे सिद्ध करायचंय. आणि भारतात त्यालाच लोक अनैतिक ठरवतात. सार्वजनिक ठिकाणी किस केल्यानं, जवळ आल्यानं काही वाईट दिसत नाही. फक्त किती जवळ यायचं, याची र्मयादा ज्यानं त्यानं सांभाळावी.
- पूजा बेदी, 
अभिनेत्री
 
सगळेच नाही फक्त काही प्रकारची जनावरं रस्त्यावर, उघडेवाघडे ‘जवळ’ येतात. शरीर संबंध करतात आणि तसं करणार्‍या प्राण्यांना लोक  दगडच मारतात. जनावरं सुद्धा सरसकट रस्त्यावर संबंध ठेवत नाहीत, हे तरी लक्षात घ्या. मला स्वातंत्र्य आहे, मी काहीही करेन असं म्हणत तुम्ही दारू पिऊन रस्त्यावरून नागडे नाही ना फिरू शकत? समाजाला त्रास होणार असेल तर अशा व्यक्तिगत गोष्टींना सार्वजनिक नाहीच करता येऊ शकत.
- चंपत राय
महासरचिटणीस, विश्‍व हिंदू परिषद 
 
पीडीए म्हणजे काय?
पीडीए म्हणजे पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन. आपलं प्रेम जगजाहीर चारचौघात व्यक्त करणं, शारीरिक जवळीक साधणं, मिठी मारणं, चुंबन घेणं आणि फेसबुकसह अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्याचे फोटो टाकणं, तशा कॉमेण्ट्स लिहिणं हे सारं पल्बिक डिस्प्लेचा भाग. आपलं व्यक्तिगत आयुष्य, नातं, प्रेम असं जगजाहीर व्यक्त करणं म्हणजे हे पीडीए. त्याला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाजूनं सध्या लढाया सुरू आहेत.