शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

केरळच्या मदतीचा पूर ओसरल्यावर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 7:00 AM

आपत्ती आली की मदतीचे ओघ वाहतात. पण त्या माणसांना नेमकं काय हवंय हे शोधत निघालो तशी एक वेगळीच नजर मिळाली आणि मदत काय हवी हे शोधण्याचं एक कौशल्यही सापडलं. ती ही केरळची गोष्ट.

ठळक मुद्देआपत्तीग्रस्तांना मदत म्हणून नेमकं काय द्यायचं हे कळणं, तसा विचार करणं, त्यांना जे हवं ते पोहचवणं, हे महत्त्वाचं आहे.

- विनिता ताटके 

ऑगस्टच्या 23 तारखेला शिरीष, दत्ता आणि मी केरळला जायला निघालो तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं, ‘‘पूर तर ओसरला, आता तुम्ही कशाला जाताय?’’‘‘हे काय, कुठलंही मदतीचे साहित्य न घेता जाताय? मग तुम्ही तिथे जाऊन करणार तरी काय?’’‘‘इतक्या उशिरा जाऊन तुमचा काही उपयोग होणार का? की तुम्ही नुसते बघे म्हणून जाणार?’’लातूरला 30 सप्टेंबर 1997 या दिवशी भूकंप झाला त्याला आता 21 वर्षे झाली. आपत्तीची बातमी आली की अनेक जण धान्य, कपडे, पाण्याच्या बाटल्या अशी मूलभूत वस्तूरूपी मदत गोळा करतात हे तेव्हापासून आपण पाहतो आहोत. हे सर्व सामान भरलेले कितीतरी ट्रक आपत्तीग्रस्त ठिकाणाकडे रवाना होतात. गोळा केलेली ही मदत गरजूंर्पयत पोहचविण्यासाठी स्वयंसेवकांचे चमू रात्नीचा दिवस करून काम करतात. बरेच डॉक्टर स्वयंस्फूर्त प्रेरणेने आरोग्यसेवा देण्यासाठी आपली नावं नोंदवतात आणि गरज असेल तिथे जाऊन पोहचतात.या सर्व मदतीची आवश्यकता असतेच. मात्न मदतीसाठी गोळा केलेलं सामान घेऊन नेमकं कुठं जायचं, तिथं नेमकी कशाची गरज लागू शकते; ज्यांना आपण मदत पोहचवतो आहोत त्यांना कशानं दिलासा वाटू शकतो हे तपासून पाहिलेलं नसेल तर गोळा केलेली मदत निरूपयोगी बनून तिला अक्षरशर्‍ कचर्‍याचं रूप येतं. ज्या व्यक्तीच्या जिवावर बेतण्याची परिस्थिती आलेली असते ती व्यक्ती त्या वेळी कोणतीही मदत स्वीकारायला तयार असते. नंतर मात्न गरज असते ती नेहमी लागणार्‍या वस्तूंची. बरेचदा जिथे खरी गरज असते तिथे ती पोहचत नाही. ज्यांच्यार्पयत व्यवस्थित मदत पोहचते तिथेच मदतीचा ओघ सुरू राहतो. अशा वेळेला या वस्तूंचं रूपांतर कचर्‍यात व्हायला वेळ लागत नाही. देणार्‍याला मात्न मदत पोहचल्याचं समाधान मिळालेलं असतं. भावनेच्या भरात मदतीचा वाहणारा हा पूर साधारण आठ ते दहा दिवस टिकतो. आपणही आपल्या कामात मग्न होतो. आपत्तीग्रस्त मात्न उद्ध्वस्त झालेलं आपलं घर कसं परत वसवायचं या विवंचनेत असतो आणि तेव्हा त्याला धीर द्यायला कोणी उरत नाही.नेमकं हेच ओळखून, पूर ओसरायला लागल्यावर सात दिवसांनी आम्ही केरळला जायला निघालो. आमच्या पाठीशी ‘मैत्नी’ संस्थेचा अनुभवी मित्नपरिवार सर्वथा योग्य ती मदत पाठवायला खंबीरपणे उभा होता.आपल्याला भाषेची समस्या येईल हे जाणून आम्ही थ्रिसूर शहरातील मनोज नावाच्या मित्नाला आमच्यासोबत येण्याची विनंती केली. मनोज सुरुवातीच्या काळात साहित्य पाठविणार्‍या स्थानिक गटाला मदत करत होताच, पूरग्रस्त भागाचीही त्याला माहिती होती. त्यामुळे त्यानं आम्हाला थेट पूरग्रस्त गावात नेऊन पोहचवलं. कुळ्ळूर हे चेलाकुडीच्या काठावर वसलेले साधारण 25 हजार वस्तीचे गाव सलग 4 दिवस 10 ते 15 फूट पाण्याखाली होते. गावातली 700च्या वर घरं पाण्याखाली होती. लोक घरं सोडून राज्य शासनानं शाळांमध्ये सुरू केलेल्या छावण्यांत येऊन राहिले होते. अनेकांची तर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी हेलिकॉप्टरमधून किंवा बोटीनं सुटका करावी लागली होती. सुदैवाने गावात कोणीही मृत्युमुखी पडलं नाही; पण बर्‍याच जनावरांनी मात्न जीव गमावला होता.आम्ही गावात फिरलो तेव्हा स्मशान शांतता पसरलेली होती. नेहमी ऐकू येणारे पक्ष्यांचे, कुत्र्या-मांजरांचे अथवा वर्दळीचे कुठलेही आवाज नव्हते. केळीच्या, जायफळाच्या बागा कुजलेल्या दिसत होत्या. नारळाच्या झाडांच्या बुंध्यांना जवळजवळ 15 फुटांर्पयत गाळ अडकलेला दिसत होता त्यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येत होता. जेसीबीच्या मदतीने रस्त्यांवरचा गाळ काढून रस्ते मोकळे करण्याचं काम चाललं होतं. छावण्या सोडून काही जण आपल्या घराची काय परिस्थिती आहे हे पहायला आले होते. कोणी वस्तू शोधत होतं, तर कोणी साफसफाई करण्याचा प्रयत्न करत होतं. घरं 3-4  दिवस पाण्यात बुडून राहिल्यामुळे सर्व सामान खराब झालं होतं. कपडे कुजले होते, गाळानं भरले होते. प्लायवुड किंवा मोल्डेड लाकडाचं फर्निचर कुजल्यामुळे वास येत होता. पलंग, सोफा, खुच्र्या, कपाटं यापैकी कुठलंच सामान पुन्हा वापरण्याजोगं राहिलं नव्हतं. वापरण्याजोगी भांडी-कुंडीही जेमतेम शिल्लक राहिली होती. फ्रीज, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करायचा प्रयत्न लोक करत होते; पण दुरुस्तीशिवाय त्या पुन्हा वापरणं शक्य होणार नव्हतं. अनेक दुचाकी वाहनं वर्कशॉपमध्ये पाठवावी लागणार होती.कचर्‍याचे ढीग जमत होते ते फेकून द्याव्या लागणार्‍या वस्तूंचे. काही जण तर असं सामान सरळ जाळून टाकत होते. पाण्याच्या ओलीमुळे झालेल्या कोंदट वातावरणात कचर्‍याच्या या धुरामुळे आणखी भर पडून पूर्णपणे अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक घराबाहेरच्या, मोठय़ा रस्त्यांवर जमलेल्या कुजलेल्या कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं हे सर्वात महत्त्वाचं काम दिसत होतं.केरळ सरकार पूर काळात दक्ष होते. पण सरकारच्या कामाला चेहरा नसतो. ते सर्वाना मदत होईल अशा प्रकारे काही योजना जाहीर करतं. पण तरी त्यातून काही माणसं सुटतात.

अशीच एक एकटी राहणारी राजम्मा. राजम्माच्या छोटय़ाशा झोपडीत काहीच शिल्लक राहिलं नव्हते. एक हंडा तांदूळ फक्त तिला सापडले; पण त्यालाही बुरशी आली होती, काहींना तर मोडही आले होते.अशोकन आणि रिजिता यांचं घर राहण्यालायक राहिलं नव्हतं. घरकुल योजनेतून काही रक्कम घेऊन नुकत्याच बांधलेल्या या घराला अजून खिडक्या-दरवाजेही बसवलेले नव्हते. आणि आता तर घरातल्या होत्या - नव्हत्या त्या सर्व वस्तू बाद झाल्या होत्या, भिंतीही पडायला आल्या होत्या. अशी अनेक कुटुंबे आम्हाला भेटली. सरकारनं छावण्या बंद केल्यामुळे ही कुटुंबं आपल्या पडक्या, गाळानं माखलेल्या घराभोवती घुटमळताना दिसत होती. घरांमध्ये अजूनही चुली पेटल्या नव्हत्या; बसायला, झोपायला जागा तर नव्हतीच. आपल्या मनातली खिन्नतेची भावना बाजूला ठेवून परिस्थितीकडे पहायला शिकावं हा आमचा आजवरच्या मदतकार्यातून घेतलेला अनुभव. आमच्या सोबत असलेले जिबू आणि  रणजीत मात्न भांबावून गेले होते. दोघेही कुळ्ळूर गावचेच. आमचे दुभाषे. रणजीतसह त्याच्या कुटुंबाला पूरपरिस्थितीत वाचवण्याची वेळ आली होती. त्या दोघांची परिस्थितीच अशी होती की राजम्मा, अशोकन यांच्यासारख्यांना आपण काय मदत करावी हे त्यांना सुचत नव्हते.मदतकार्य करणारा स्वयंसेवक अत्यंत खंबीर मनाचा असावा लागतो; पण त्याच वेळेस तो अतिशय संवेदनशीलही असायला हवा. दुर्‍ख समजून घेण्याची ताकद तर त्याच्यात हवीच, आपत्तीग्रस्तांना त्याचा आधारही वाटायला हवा; परंतु भावनेच्या भरात हताश होऊन न जाता मदतीची नेमकी गरज ओळखण्याचं कौशल्यही त्याच्यात हवं.तेच आमच्यासोबतच्या शिरीषनं केलं. अशी पडायला आलेली घरे शोधून काढून नेमकं काय करायला हवं हे शिरीषला चांगलंच माहीत आहे. त्यानं अमलदासच्या घराची कौलं उतरवून काढायला हवी म्हणजे ती पुन्हा वापरता येतील असं सुचवलं. थोडीफार डागडुजी करून ते घर राहतं कसं करता येईल हे शिरीषने सुचवलं आणि अमलदासने ते लगेच प्रत्यक्षातही आणलं.अशा अनेक कहाण्या.आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून नेमकं काय द्यायचं हे कळणं, तसा विचार करणं, त्यांना जे हवं ते पोहचवणं, हे महत्त्वाचं आहे.केरळात काम करताना आम्ही, आमचे स्वयंसेवक पुन्हा हेच शिकलो. 

***

 

मेळघाटच्या कोरकू आदिवासींची केरळला मदत

पंपा नदीच्या खोर्‍यात असताना आम्हाला एक फोन आला आणि आमच्या अंगावर रोमांच उठले! तो होता मेळघाटच्या भुत्नूम गावातील गंगारामचा. गंगाराम आमच्यासोबत असणारा ’मेळघाट मित्न’ आहे. तो आणि त्याचे मित्न अमरावतीला आले असताना केरळच्या पुराबद्दल त्यांनी ऐकलं. त्यांनी विचार केला की, ‘‘बाहेरून येऊन कितीतरी लोक आम्हाला मदत करतात तर आम्ही सुद्धा त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांना मदत केली पाहिजे’’. गंगाराम व त्याच्या मित्नांनी गावाकडे परत गेल्यावर ग्रामसभेपुढे हा विषय मांडला. चार गावच्या लोकांनी घरटी 10 रुपये आणि 3 किलो धान्य द्यायचं ठरवलं. कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या मेळघाटच्या कोरकू आदिवासींनी आपत्तीग्रस्तांना अशा प्रकारे मदत करणं ही कदाचित पहिलीच घटना असेल. भूस्खलनामुळे पीडित असलेल्या वायनाडच्या आदिवासींना ही मदत पोचवण्यासाठी या गावांचे काही प्रतिनिधी स्वतर्‍ जाणार आहेत. 

चला, घराकडे परत जाऊ!

‘‘मैत्नी’’ने ‘‘चला, घराकडे परत जाऊ!’’ अशी हाक देऊन कुळ्ळूर गावातील 740 कुटुंबांना घरात स्थिरस्थावर होण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं आहे. यातली काही कुटुंबे मजुरी करणारी आहेत, एकट्या राहणार्‍या महिला आहेत. या कुटुंबांचे हातावर पोट आहे. या कुटुंबांना त्यांची घरे साफ करायला मदत करणं, त्यांची घरं राहती करून तिथे चूल पेटेल, झोपण्यापुरेशी तरी जागा मिळेल यासाठी घरांची दुरूस्ती करणं, तात्पुरत्या निवार्‍याची सोय करणं, ज्यांना गरज असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला लागणारी हत्यारं, केळीची रोपं देणं असं पुनर्वसनाचं काम ‘‘मैत्नी’’ने करायचं ठरवलं आहे. त्याकामी  मदतीसाठी Maitri1997@gmail.com या इमेलवर संपर्क करता येईल.