शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

सुखी रहा..या दिवाळीत अंगणात दिवे लावताना, सांगू ना स्वत:लाच की, पुरे मनात नकारघंटा वाजवणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 04:00 IST

या दिवाळीत अंगणात दिवे लावताना, सांगू ना स्वत:लाच की, पुरे मनात नकारघंटा वाजवणं.. सतत नाही नाहीचा गजर करणं आता भिडूच जगण्याला हसत हसत..

“In order to carry a positive action we must develop here a positive vision.” - दलाई लामांचं हे वाक्य काय सांगतं?ते म्हणतात, काही चांगलं करायचं तर आधी तसा विधायक, सकारात्मक विचार आपल्याला करावा लागतो.तोच नसेल, म्हणजे सकारात्मक विचारच नसेल तर आपण चांगलं काम कसं करणार?वर वर पटतं आपल्याला हे वाक्य.पण कळत नाही, कळलं तर वळत नाही.म्हणजे काय पहा, आपण उशिरा उठतो, मग चिडतो स्वत:वर म्हणतो रोजचंच हे नाटक, रोज उशीर होतो, रोज उशिरा उठतो. काही उपयोग नाही, आपल्याच्यानं काहीच होणार नाही..असं म्हणत स्वत:वर खूप चिडचिड करतो..उपयोग काय?रोज तेच.मग स्वत:लाच म्हणतो की, मी नाही सुधारणार, मला नाहीच जमत वेळ पाळणं..पण याउलट जर आपण असं मान्य केलं की, मला रोज झोपेतून उठायला उशीर होतो; पण आजपासून मी सकाळी लवकर म्हणजे ६ वाजता उठेन.. उठेन..बघा किती सोपंय..चिडचिड करण्यापेक्षा, एका वाक्यात स्वत:ला सांगणं की,मी सकाळी ६ वाजता उठेन!आपण आपल्या मेंदूत एक फिक्स्ड प्रोग्रॅम सेट करून टाकतो.सहाची वेळ पक्की करतो.त्याला लवकर, उशिरा वगैरे कळत नाही.त्याला वेळ कळते आणि तो डोक्यात गजर लावतो,आपली मानसिक-शारीरिक ऊर्जा ती वेळ पाळण्यासाठीएका दिशेनं कामाला लागते..हे साधं गणित.पण आपण असं साधं, सरळ, सकारात्मक जगत नाही..तसा विचारच करत नाही..आपण सकाळी उठल्यावर कधी म्हणतो का,आज माझ्या आयुष्यात काहीतरी भारी घडेल..आजचा दिवस मी भन्नाट काम करेल..नाही.उठल्यापासून आपली चिडचिड.काम फार आहे.उशीर झाला आहे.काय ती पावसाची रिपरिप.आजही ट्राफिक जाम.खिशात पैसे नाहीत फार.घरातली माणसंपण अशी,एक धड बोलत नाही.आजही नास्त्याला पोळीचा कुस्कराच.धड खायला वेळ नाही..सतत नन्नाचा पाढा..आणि असं नकारात्मक आपण रोज बोलतो..तेच आपल्या डोक्यात चालतंआणि घडतंही तेच..या दिवाळीत अंगणात दिवे लावताना,सांगू ना स्वत:लाच की,पुरे हे नकारघंटा वाजवणं..सतत नाही नाहीचा गजर करणं..यंदा दिवाळीत एक दिवा मनात उजळवू..आणि म्हणून की,हा माझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश..मी ठरवेन तेच होईन..माझ्या अवतीभोवती सारं चांगलं घडेल,मी ते घडवीन,आणि म्हणेन स्वत:लाच..यशस्वी भव !सुखी रहा..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017