जी ले जरा!

By Admin | Updated: June 19, 2014 21:07 IST2014-06-19T21:07:59+5:302014-06-19T21:07:59+5:30

आपल्याला आपली लाइफस्टाइल बदलायला हवी हे आधी मान्यच करून टाका. आपलं चुकतंय, आपण जगणं सोडून आभासात गुरफटतो आहोत हे मान्य केलं तरच पुढची वाट सोपी होईल.

Just take it! | जी ले जरा!

जी ले जरा!

>अँडिक्शनच्या चक्रव्यूहातून सुटायचं कसं?
 
आपल्याला आपली लाइफस्टाइल बदलायला हवी हे आधी मान्यच करून टाका. 
आपलं चुकतंय, आपण जगणं सोडून आभासात गुरफटतो आहोत हे मान्य केलं 
तरच पुढची वाट सोपी होईल. पण उपाय म्हणून तातडीनं सगळी गॅजेट्स बंद करून 
टाकू नका. जरा स्लो डाउन करा.
**
तुम्हाला रिकामा वेळ केव्हा असतो, केव्हा नेटवर टाइमपास करण्याची उबळ 
जास्त असते हे तुमचं तुम्हीच ठरवा, त्यावेळेत करण्याचं तुमच्या आवडीचं काम 
प्लॅन करा. काहीच नाही तर सरळ मित्रांशी गप्पा मारत टपरीवर चहा प्यायल्7ा जा.
**
तुम्ही मित्रांबरोबर जेवायला जाता, गप्पा मारायला जाता, तेव्हा सतत मोबाइलला 
चिकटायचं नाही. सगळ्यांनी मोबाइल टेबलावर जमा करायचे. जो पहिल्यांदा 
मोबाइलला हात लावेल त्यानं सगळ्यांचं बिल द्यायचं, असा नियम करून टाका.
**
तुमच्या फोनचा जरा स्मार्ट वापरा करा, घरचे-गर्लफ्रेण्ड-बॉस यांच्या 
कॉलसाठी खास रिंगटोन ठेवा. तो वाजला तर फोन उचला. 
दुसरे फोन आपल्याला नको तेव्हा उचलायचे नाहीत.
**
व्हॉट्स अँपचे ग्रुप रोज काही तासांसाठी तरी म्यूट करून ठेवा. 
(कमीत कमी ग्रुप जॉइन करा.) जेव्हा फुरसत असेल तेव्हा नोटिफिकेशन्स पाहा.
**
फोनवर अलार्म लावा, अर्धा तास ऑनलाइन टाइमपास. 
अलार्म वाजला की साईन आउट करायचं म्हणजे करायचं. 
हे एवढं जरी जमलं तरी तुमचा कण्ट्रोल नक्की वाढेल.
**
विकएण्डला फोन-व्हॉट्स अँप-फेसबुकला सुट्टी 
देऊन टाका. नाही वापरायचं म्हणजे नाही वापरायचं. 
एक दिवस जरी हे जमलं तरी आपल्याला ‘जमतं’ ही 
भावना पुढची वाट सोपी करेल.
**
तुमच्या मनगटावर एखादं मस्त घड्याळ रोज 
बांधाच. म्हणजे मग वेळ पाहायची म्हणून 
सारखा मोबाइल चाचपून पाहायला नको.
**
तुमच्या आवडीचं एक काम रोज करा. काय वाट्टेल ते, 
कितीही फालतू वाटलं तरी करा, अगदी झाडांना पाणी 
घालण्यापासून टीव्ही सिरियल पाहण्यापर्यंत काहीही. 
फक्त फोन आणि कॉम्प्युटरपासून लांब रहायचं.
**
आपल्या जवळच्या माणसांशी बोला, भांडा, पण प्रत्यक्ष. 
‘मी फोन करतो, मग बोलू.’ हे वाक्यच तुमच्या आयुष्यातून डिलीट मारा.
**

Web Title: Just take it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.