शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जपानमधला सेफ पिरिएड उपक्रम का वादात सापडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:52 IST

जपानमधल्या एका भल्या मोठय़ा डिपार्टमेण्टल स्टोअरने एक प्रयोग राबवला. मासिक पाळीच्या काळात विश्रांती हवी असेल, तर महिला कर्मचार्‍यांनी एक बॅज वापरावा.. मात्र झालं भलतंच.

ठळक मुद्देजपानमध्येही मासिक पाळी ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल स्रिया उघडपणे क्वचितच बोलतात.

- कलीम अजीम 

जपानचं एक डिपार्टमेण्टल स्टोअर सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण त्यांनी महिला कर्मचार्‍यांसाठी राबवलेला एक उपक्रम. त्याचं नाव ‘सेफ पिरिएड’. मासिक पाळीच्या त्नास होत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना या स्टोअरने विशिष्ट रंग व डिझाइनचे ‘पिरिएड बॅजेस’ दिले होते. त्नास होत असेल तर महिला कर्मचार्‍यांनी आपल्या शर्टवर तो बॅज चिकटवायचा अशी ही कल्पना. तो बॅज लावलेला असेल तर त्या महिलेला त्या दिवसात कामातून थोडी विश्रांती मिळावी आणि सेवेतून सूटही मिळावी हा त्यामागचा उद्देश होता; परंतु झालं भलतंच. या प्रयोगाची ‘दहशत माजवणारा’ आणि  ‘वेडसर’ म्हणत भरपूर टिंगल झाली. त्यावर टीकाही झाली. शेवटी त्या सार्‍याला कंटाळून त्या स्टोअरने हा निर्णय मागे घेतला. मात्र सोशल मीडियाच्या जगात भरपूर चर्चा मात्र याविषयाची झालीच. टोक्यो शहरातलं डैमारू नावाचं हे स्टोअर. भलंमोठं डिपार्टमेण्टल स्टोअर. महिनाभरापूर्वी स्टोअरने 500 महिला कर्मचार्‍यांना बॅज देत हा प्रयोग राबवला होता. संबंधित बॅजेसवर ‘सीरी चान’ नामक लोकप्रिय मान्जा कॅरेक्टरचं कार्टून आहे. त्या चित्नातून मासिक पाळीचा बोध होतो. जपानमध्ये या चित्नाला ‘मिस पिरीएड’ म्हणून ओळखलं जातं.डैमारू स्टोरचे प्रवक्ता योको हिगुची यांचं म्हणणं आहे की, ‘आम्ही हा उपक्रम महिला कर्मचार्‍यांबद्दल सहानूभुती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवला होता. या बॅजेसचा हेतू ज्या महिला हा बॅज लावतील त्यांना कामातून जरा ब्रेक मिळावा. तो सहज मिळावा. आणि लोकांनी समजून घ्यावं की, आज तिला जरा बरं वाटत नाहीये.’ अर्थात या बॅजेसची कुठलाही सक्ती करण्यात आलेली नव्हती. महिला कर्मचार्‍यांना गरज लागली तर तो त्यांनी हक्कानं वापरावा, संकोच करू नये एवढंच त्यात अभिप्रेत होतं. आणि ग्राहकांनीही संमजसपणे ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा होती.स्टोअरचं म्हणणं आहे की, पिरिएड सुरू असतील तर त्या महिलेनं वजनदार वस्तू न उचलणं, जास्त श्रमाचं काम न करणं हे साहजिक आहे. सहकारी कर्मचारीही ते समजून सहानुभूती बाळगू शकतात. या प्रयोगातून स्टाफमध्ये परस्पर संमती व सहकार्याच्या भावनेमुळे क्र यशक्तीही वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणचं वातावरण आनंददायी होईल.मात्र या अनोख्या निर्णयावरून बर्‍या-वाईट आणि सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. काहींचं म्हणणं होते की, ही ट्रिटमेंट महिलांसाठी भेदभावाला बळकटी देणारी आहे. काहींनी म्हटलं की, महिलांच्या पिरिएडकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. याउलट सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक जागतिक मीडिया संस्थांनी या बातमीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहत विशेष वृत्तलेख लिहिले.मासिक पाळीच्या दरम्यान महिला सेवेतून सूट मिळावी, पगारी रजा मिळावी, सेवेत सवलत मिळावी, हाफ डे लागू असावा, अशा विविध मागण्या जगभरातून होत आहेत. अनेक मानवी हक्क व महिला संघटनांनी या मागणीला व्यापक स्वरूप दिलेलं आहे. काही देशांनी सकारात्मक बदल केले आहेत; पण पूर्णपणे या मागणीला बळकटी देणारा बदल अजून घडलेला नाही. जपानमध्येही मासिक पाळी ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल स्रिया उघडपणे क्वचितच बोलतात. त्यामुळे अशा प्रयोगांवर उलटसुलट चर्चा तिथं होणं अपेक्षितच होतं. मात्र एक प्रयोग म्हणून त्याची चर्चा झाली हे नक्की.