जान्हवी कपूर सध्या पांढर्‍याशुभ्र अनारकली कुर्ता घालतेय, हा लूक कसा वाटतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST2018-07-05T03:00:00+5:302018-07-05T03:00:00+5:30

अनारकली विथ चांदबाली हा जान्हवी कपूरचा लूक आपणही ट्राय करु शकतो.

Janhavi Kapoor's white Anarkali kurta & chandbali, try this look | जान्हवी कपूर सध्या पांढर्‍याशुभ्र अनारकली कुर्ता घालतेय, हा लूक कसा वाटतो?

जान्हवी कपूर सध्या पांढर्‍याशुभ्र अनारकली कुर्ता घालतेय, हा लूक कसा वाटतो?

ठळक मुद्देसेलिब्रिटीजसारखा लूक दरवेळी करताच येईल, असं नसतं; पण जान्हवीसारखा असा लूक आपल्याला सहज शक्य आहे.

- श्रुती साठे

सलवार कमीज काय किंवा कुर्ता पायजमा काय.. नेहमीचा साध्या स्टाइलचा,  ए लाइन कुर्ता असे साधारण कुर्ते आपल्याकडे असतातच. इतर अनेक स्टाइलचे सेट आपल्याकडे असतात. आपण त्यांचे रंग, मॅचिंग ज्वेलरी, सॅण्डल्स कॉन्ट्रास्ट ओढण्या यांची जमवाजमव करून सलवार कमीज सेट्सची वर्गवारी लावून ठेवतो. कोणते ऑफिससाठी, कॅज्युअल डे आउटसाठी कोणते तर कोणते लग्नसमारंभासाठी, रिसेप्शनसाठी. 
अनारकली कुर्ता सेट हा पारंपरिक कार्यक्रमासाठी एक उत्तम पर्याय ठरतोय. लग्नसमारंभासाठी, रिसेप्शनमध्ये बर्‍याच तरुण मुली, महिला हल्ली सुटसुटीत म्हणून साडय़ा, लेहेंगा चोलीऐवजी अनारकली स्टाइल कुत्र्यामध्ये दिसतात. तुमच्या आमच्यातली ही अनारकली फॅशन बॉलिवूड सेलेब्ससुद्धा आवडीने वापरताना दिसतात. 


कॉलेज तरुणींची स्टाइल आयकॉन असलेली जान्हवी कपूर तिच्या आगामी पिक्चरच्या प्रोमोशनसाठी सध्या अनारकली कुर्ता घालून वावरताना दिसतेय.  प्रोमोशनसाठी सेलिब्रिटी डिझायनर सुकृती ग्रोव्हरने डिझाइन केलेला पांढर्‍या रंगाचा स्लिव्हलेस स्ट्रॅपी अनारकली जान्हवीने निवडला. या कुत्र्याची खासियत ही पांढर्‍या रंगावर केलेली मिल्ट कलर फुलांची एम्ब्रॉयडरी. अनारकलीला समोर आणि बॉर्डरवर असलेली नाजूक फुलांची एम्ब्रॉयडरी जान्हवीवर अतिशय खुलून दिसली. त्यावर वापरलेली ओढणी - तिच्यावर असलेल्या मोठय़ा ठसठशीत गोंडय़ामुळे जास्त खुलून दिसली. 
जान्हवीने चांदबाली प्रकारातले मोठे कानातलेही घातलेले दिसतात.
हे सारं आपणही वापरू शकतोच. सेलिब्रिटीजसारखा लूक दरवेळी करताच येईल, असं नसतं; पण जान्हवीसारखा असा लूक आपल्याला सहज शक्य आहे. नक्की वापरून पहा अनारकली विथ चांदबाली !

 

Web Title: Janhavi Kapoor's white Anarkali kurta & chandbali, try this look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.