शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

आयपीएलमध्ये ‘यूपी’ची टीम!

By admin | Updated: April 4, 2017 17:34 IST

देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशानं नेहमीच सत्तेचं समीकरण जुळवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतही ते प्रकर्षानं नजरेस आलं आणि सत्तेची

- राजकारणानंतर मैदानातील सत्तेतही वर्चस्व राखणार?देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशानं नेहमीच सत्तेचं समीकरण जुळवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतही ते प्रकर्षानं नजरेस आलं आणि सत्तेची सारी समिकरणंही झर्रर्रकन बदलून गेली. सत्ताकारणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशानं यावेळी क्रिकेटच्या मैदानातही आपली गाडी सुसाट सोडली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या संग्रामात याची प्रचिती येईल.यंदाच्या आयपीएलमध्ये विविध संघांतून खेळताना तब्बल दहा खेळाडूंनी मैदानात उडी घेतली आहे. यातले अर्थातच काही जुने आहेत, तर काहींनी नव्यानंच एंट्री घेतली आहे. काही असलं तरी आपलं संख्याबळ त्यांनी इथेही दाखवून दिलं आहे. 

१. ‘चायनामॅन कुलदीप यादव-आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत कुलदीपनं धरमशाला कसोटीत पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात कांगारुंना सळो की पळो करून सोडलं. देशाचा हा पहिला ‘चायनामॅन’ खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला बळ पुरवतो आहे.२. अंकित राजपूत-अंकित हे नाव रसिकांच्या फारसं परिचित नसलं तरी त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि चार विकेट घेतल्या आहेत. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाकडून यंदा कोलकाता नाईट रायडर्सला बऱ्यापैकी अपेक्षा आहेत.३. रिंकू सिंह-उत्तर प्रदेशचा रिंकू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण करतोय. किंंग्ज इलेवन पंजाबला त्याच्याकडून ‘सरप्राईज’ खेळीची अपेक्षा आहे.४. प्रवीण कुमार-आयपीएलमध्ये प्रवीण कुमारनं नेहमीच चांगलं प्रदर्शन केलं आहे. गुजरात लायन्स संघाकडून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर गुरकावताना तो यंदा दिसेल.५. सुरेश रैना-सुरेश रैना भारतीय संघातून कायम आतबाहेर होत असला तरी आयपीएलचा तो हुकमी एक्का आणि गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत १४७ सामन्यांत जवळपास पाच हजार धावा लुटल्या आहेत आणि २४ विकेट्सही घेतल्या आहेत.६. एकलव्य द्विवेदी-नवोदित एकलव्य महेंद्रसिंह धोनीची गादी चालवू पाहतो. तो विकेटकिपर आणि चांगला फलंदाजही आहे. तथापि आयपीएलमध्ये त्याला अद्याप फारशी चमक दाखवता आलेली नाही. आयपीएलच्या चार सामन्यांत त्याला केवळ २४ धावा जमवता आल्या आहेत.७. पियूष चावला-आपल्या लेग स्पिनची जादू दाखवायला पियूष फारच उत्सुक आहे. बॉलिंगबरोबरच गरजेच्या वेळी आपली बॅटही तो फिरवू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सच्या या खेळाडूनं आयपीएलच्या १२३ सामन्यांत ५१३ रन्सही काढल्या आहेत.८. मोहम्मद शमी-या उभरत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उभरतीला येत असताना अचानक दुखापतीमुळे त्याला भारतीय संघाबाहेर व्हावं लागलं आणि त्याच्या कामगिरीलाही अचानक ब्रेक लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धर्मशाला कसोटीसाठीही त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं, पण अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना तो पुन्हा मैदान गाजवण्याची अपेक्षा करतोय.९. भुवनेश्वर कुमार-आपल्या तेज गोलंदाजीनं फलंदाजांची भंबेरी उडवण्यात तो पटाईत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत ८५ विकेट्स त्यानं घेतल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना पहिल्याच मॅचमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी तो उत्सुक आहे.१०. अक्षदीप नाथ-गुणी फलंदाज. आयपीएलमध्ये तो अगोदर खेळलाही आहे, पण अजूनही चाहत्यांसाठी तो अपरिचितच आहे. या डावऱ्या फलंदाजानं आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत कसेबसे वीस रन जमवले आहेत, पण गुजरात लायन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

- प्रतिनिधी