शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

IPL : कोरोनाकाळात तिवोतियाची सिक्सरवाली इनिंग काय सांगते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 6:02 PM

जिंकण्याची शक्यता 2 % असेल तर ती महत्त्वाची, हरण्याच्या 98 % शक्यतेचा विचार करूनका.

-अभिजित पानसे

अगदी परवाचीच गोष्ट. 27 सप्टेंबर. किंग्स इलेव्हन पंजाब विरु द्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना.रात्नीचे 11 वाजून 30 मिनिटं झाले होते. 16.3 ओव्हर. ओव्हरमधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला, ‘इस वक्त आधा भारत राहुल तिवोतिया को दोषी मान रहा होगा के ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते.’ओव्हरचा चौथा चेंडू पडल्यावर आकाश चोप्रा पुन्हा म्हणाला, ‘सनीभाई मुङो आपसे एक बात पुछनी हैं अगर बल्लेबाज इतना स्ट्रगल कर रहा है तो उसे रिटायर्ड आउट क्यों नहीं घोषित कर देते! इसको इतना क्यों बुरा समजा जाता हैं! अगर कोई बॉलर अच्छी बॉलिंग नही कर रहा है तो उसे अगले ओवर नही देते. वैसेही राहुल तिवोतिया को राजस्थान रॉयल्सने ही रिटायर्ड आउट देने में क्या दिक्कत है. ऑलरेडी तिवोतिया को रॉबीन के पहले भेज कर रॉयल्स राजस्थानने गलती कर दी हैं!’

तोवर पुढचा चेंडू पडतो, सुनील गावसकर म्हणतात, बहोत अच्छा सवाल है! हाँ ऐसा हो सकता हैं! अगर राहुल तिवोतिया को कोई संदेसा भेजे की भई तुम वापस आ जाओ! कोई बहाना कर लो!’सतरावी ओव्हर संपली. जिंकण्यासाठी हवा असलेला रनरेट अशक्यरीत्या 17 वर पोहोचला. दोन बॉल खेळलेला नवा बॅट्समन रॉबिन उथप्पा पिचवर होता व त्याक्षणी ज्याची निर्भत्सना होत होती तो राहुल तिवोतिया गेल्या तासाभरापासून चाचपडत खेळत होता. सामना राजस्थान रॉयल्सने जिंकण्याची तसूभरही आशा उरली नव्हती. तिवोतिया पिचवर आल्यापासून एकदाही बॉलसोबत नीट  टायमिंग साधू शकला नव्हता. वीस बॉल्स खेळून एकसुद्धा चौकार किंवा षट्कार खेचला नव्हता. तोवर सर्व मोठय़ा नावाजलेल्या क्रि केट वेबसाइट्सवर तिवोतियाची सौम्य शब्दांत टीका सुरू होती. तर ट्विटरवर राहुल तिवोतियावर तीक्ष्ण ट्विटबाण बरसत होते. दर सेकंदाला त्याच्यावर हजारो जोक्स सुरू होते. स्पोर्ट्स वेबसाईटवर सामना सुरू असताना दोन्ही टीमची सामना जिंकण्याची शक्यता टक्के प्रमाणात दाखवतात, राजस्थान रॉयल्सची जिंकण्याची शक्यता 6क् टक्क्यांपासून प्रत्येक बॉलसोबत कमी होऊन सतरावी ओव्हर संपल्यावर किंग्स इलेव्हन पंजाब : 98 टक्के तर राजस्थान रॉयल्स : 2 टक्के जिंकण्याची शक्यता दाखवत होते.अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्यूट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला. चाचपडणारा राहुल तिवोतिया स्ट्राइकवर. त्याच्याकडून शून्य आशा. डावखु:या कॉट्रेलच्या पहिल्या चार बॉलवर चार सिक्स आणि सहाव्या बॉलवर पुन्हा सिक्स हाणून राहुल तिवोतियाने राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये परत आणलं.सदर ओव्हरमधील पहिल्या सिक्सनंतर आकाश चोप्रा म्हणाला, इस मॅच की कहानी अभी बाकी है मेरे दोस्त!  कॉट्रेलच्या एक ओव्हरमध्ये 3क् रन्स काढले त्यानंतर मोहम्मद शमीला सिक्स मारून शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स काढायचे शिल्लक तिवोतीयाने बाकी ठेवले. यावेळी त्याच प्रसिद्ध वेबसाइटवर किंग्स इलेव्हन पंजाब जिंकण्याची शक्यता दाखवली जात होती 2 टक्के आणि राजस्थान रॉयल्स जिंकण्याची शक्यता दर्शवली जात होती 98}समीकरण उलट झालं होतं, केवळ 12 बॉल्समध्ये. हरलेल्या राहुल तिवोतियाने सामना फिरवला होता. आकाश चोप्रा म्हणाला त्याप्रमाणो राहुल तिवोतियासाठी  पिक्चर अभी बाकी थी.शेवटी हॅपी एंडिंग राहुल तिवोतियाला मिळालंच. सामना जिंकलाच.पण ती इनिंग बघितल्यावर वाटलं की फक्त एक खेळी नाही. ही इनिंग 2020 या वर्षातील सध्या आजूबाजूलाला असलेल्या परिस्थितीसाठी अगदी चपखल बसत आहे. राहुल तिवोतियाच्या ते एकतीस बॉल्स, पहिले चाचपडवणारे 20 बॉल्स हे चित्र 2020 ची परिस्थिती व वास्तव आहे.आजूबाजूला चहुबाजूला कोरोना पसरला आहे. अर्थव्यवस्थेची शकलं झाली आहेत. दररोज लाखो नोक:या जात आहेत, तर कोटींच्या वर जाण्याची टांगती तलवार आहे. आपल्याला सतत आतून भीती पोकळ करत आहे. वर्कफ्रॉम होमचा गोंडस फुगा कधीच फुटला आहे. नातेसंबंधांमध्ये, व्यवहारांमध्ये अनिश्चितता, कटुता निर्माण झाली आहे. लॉकडाऊन-अनलॉकिंग प्रक्रि येत लोक घरात बसून त्यांची मनंही आंबली आहेत. विद्यार्थी घरी अडकून त्नस्त झाली आहेत. एकंदर कोणाशीही बोललं तरी तो मनाने निराश किंवा चिडका वाटतोय. सोशल मीडियावर उसनं अवसान आणलं जात आहे. सगळीकडे चिडचिडेपणा वाढला आहे. प्रेमसंबंध, मैत्नीसंबंध, कार्यालयीन संबंध सगळीकडे नकारात्मकता, कटुता, अनिश्चितता पसरली आहे. समोर आहे तो फक्त अनिश्चिततेचा गडद अंधार. आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे.अशाचवेळी स्वत:हून हरून रिटायर्ड आऊट होण्याची शक्यता वाढते. पण राहुल तिवोतियाची ही इनिंग सांगतेय, की थांबा मॅच संपलेली नाही.आपण शेवटच्या क्षणी ती मॅच फिरवू शकतो. विकेटवर उभे राहा.मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे तिवोतियाला समजलं नसेल का? सगळं जग ब्लेमगेम खेळत होतं. पण तो ठाम होता, आल्या चेंडूला न्याय देत होता, आणि संधी मिळाली ती त्यानं चोपून काढली. कदाचित त्यालाही हे माहीत नव्हतं की आता अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत; पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली.तिवोतिया गेमचेंजर बनला. त्याची इनिंग एकच गोष्ट सांगतेय,पिच सोडू नका, स्वत:हून रिटायर्ड आऊट होऊ नका. 2 टक्के जिंकण्याची शक्यता 100 टक्क्यांवर आणणारा तिवोतिया.2 टक्के ही सही, जिंकण्याची शक्यता आहे हे तो विसरला नाही.ती मॅच पाहूून, त्याचे ते सिक्स आठवून आपणही कधी ते विसरूनये.