शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राणीची हॉकी टीम ‘ते’ स्वप्न पूर्ण करेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 07:30 IST

आता येत्या टोक्यो ऑलिम्पिकचा बिगूल वाजेल तेव्हा राणीच्या या संघाकडे लक्ष ठेवा. त्या वेगळी कहाणी लिहायच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देभारतीय महिला हॉकी संघानं ऑलिम्पिक पात्रता फेरी ओलांडून आता ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगितली आहे.

-चिन्मय लेले

तशा अपेक्षा ‘त्यांच्या’कडूनही असतात, आहेतच, मात्र त्यांनी अतिभव्यदिव्य यश मिळालं तरच त्यांचं कौतुक होणार.एरव्ही मात्र एवढं तर करायलाच पाहिजे होतं असा एकूण माध्यमांसह समाजाचाही अ‍ॅटिटय़ूड असतो.अर्थात या मुलींची कप्तान असलेल्या राणी रामपालला मात्र यासार्‍याचं आताशा काहीही वाटत नाही. तिला सवय झाली आहे. भारतासाठी ती 241 सामने खेळली आहे आणि आजवर तिने 124 गोल केले आहेत. एवढा दीर्घकाळ भारताकडून खेळणारी आणि सर्वाधिक गोल करणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू.तर तिची आणि तिच्या संघाची ही गोष्ट. जी एकमेकांपासून आपण वेगळी काढूच शकत नाही.आणि आता तर त्या गोष्टीत टोक्यो ऑलिम्पिक 2020चं एक नवीन स्वपA हाका मारत उभं आहे.या भारतीय तरुण हॉकीपटू ऑलिम्पिक क्वॉलिफाय करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. यावेळी काय ते रिओ ऑलिम्पिकच्या वेळीही वाटलं नव्हतं. मात्र तरीही चार वर्षापूर्वी म्हणजे 36 वर्षाच्या दीर्घकाळानंतर भारतीय महिला हॉकी संघानं ऑलिम्पिकर्पयत धडक मारली. मात्र रिओत त्यांचं अक्षरशर्‍ पानिपत झालं आणि पुन्हा तोच एक राग आळवला गेला की येतं काय या मुलींना? करतात काय?त्याचं उत्तर त्यांनी चार वर्षात शब्दानं दिलं नाही. कप्तान राणी स्वतर्‍ही कायम संयत शांत होती. मात्र नव्या कोचसह त्यांनी जोरदार सराव सुरू केला. तो हॉकीचा तर होताच; पण फिटनेसचाही होता. अगदी यो यो टेस्ट देणं आणि त्याचा 17च्या आसपास स्कोअर आणून दाखवणंही या मुलींना जमलं. मात्र प्रश्न फक्त हॉकीच्याच सरावाचा नव्हता तर भाषांच्या सरावाचाही होताच.अनेकजणी भारताच्या विविध भागातून आलेल्या. इंग्रजी-हिंदीचा प्रश्न. काही ज्युनिअर मुली मात्र जिद्दीच्या त्यांनी इंग्रजी-हिंदीही शिकून घेतलं. राणी सांगते, मी त्यांना सांगत होते. इंग्रजीचा सराव करा, परदेशात इतर खेळाडू, पंच, अधिकारी यांच्याशी इंग्रजी बोलण्याचा ताण त्यातून कमी होईल.परदेशी अनेक सामने या मुली गेल्या 4 वर्षात खेळल्या. बाहेरच्या वातावरणाचा आता त्यांना अंदाज आहे.  त्यांच्या गावातलं वास्तव मागे ठेवून त्या हॉकीचा ग्लोबल अंदाजही मोठय़ा कष्टानं घेत आहेत.ओरिसाच्या तिघी एक्का, लिलीमा मिंझ आणि नमिता टोप्पो या मुली तर आदिवासी भागातून थेट राष्ट्रीय हॉकी संघात आपलं हुनर दाखवत आहे.राणी सांगते, ‘रिओमध्ये फार काही हाती लागलं नाही कारण आमची टीम नवखी होती. आता आमची तयारी पूर्ण आहे. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे आमची पूर्ण शक्यता आहे. कारण आमची क्षमता आहे आणि त्यासाठीची तयारी आणि जिद्दही.’ती जिद्द काय असते हे त्यांनी अमेरिकन संघाला क्वॉलिफायरमध्ये हरवून दाखवून दिलं आहेच. मात्र विशेष असं की आम्ही आमच्या क्षमतांवर जिंकू शकतो हे सांगण्याइतपत तयारी महिला हॉकी संघाची कप्तान करते हा खरा हॉकीतला बदल आहे.आता येत्या जुलै 2020 मध्ये जेव्हा ऑलिम्पिकचा बिगुल वाजेल तेव्हा राणीच्या या संघाकडे लक्ष ठेवा..त्या वेगळी कहाणी लिहायच्या तयारीत आहेत..

टॅग्स :Hockeyहॉकी