शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय आणि चिनी सोशल मीडियाचा रांगडा रिजनल अवतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:00 IST

फेसबुक म्हातार्‍यांसाठी आहे असं उघड सांगणारी पिढी इन्स्टाग्रामवर गेली; पण तो मामला जरा चकाचक, सोफिस्टिकेटेड. बाकी प्रादेशिक भाषेत आपल्याच स्टाइलने बोलणारी 14 ते 22 वयोगटातली तरुण मुलं नव्याच सोशल माध्यमांत सरकली. शेअर चॅट आणि हॅलो ही त्याची दोन रूपं. तिथला धुमाकूळ काळजीत पाडणारा आहे.

ठळक मुद्देआधीच आपल्याकडे माध्यम साक्षरता नाही. सोशल मीडिया कसा वापरावा हे लोकांना कुणीही सांगत नाहीये. त्यातून निर्माण होणारी व्यसनं हा एक काळजीचा विषय आहे.

- मुक्ता चैतन्य 

‘गर्लफ्रेण्ड संशय घेत असेल तर रागावू नका’‘हिला बघितलंत का?’‘हा आहे तरणाबांड.’‘या दोन गोष्टी सोडून मैत्नी करा.’‘यश मिळवण्यासाठी करा अशी सुरु वात.’***- तुम्ही विचाराल हे सगळं काय आहे?तर या आहेत नोटिफिकेशन्स. कशाच्या?तर शेअर चॅट आणि हॅलो या सोशल नेटवर्किग साइट्सच्या. कदाचित तुमच्यापैकी काहीजण या सोशल प्लॅटफॉर्मवर असतीलही! फेसबुक आलं तेव्हा अनेकांना वाटलं होतं आता झालं, याहून वेगळं आता फारसं काही नसेल. मुळात फेसबुक असताना त्याच्यासारखंच दुसरं माध्यम कुणी तयार केलं तर त्यावर लोक का जातील? मनात येईल ते लिहिण्याची, फोटो, व्हिडीओ, ऑडियो सगळं टाकायची, लाइक मिळवत फेमस होण्याची, मित्न-मैत्रिणी जोडण्याची, सेलिब्रिटींपासून कुणाशीही एका क्षणात जोडलं जाण्याची सगळी शक्यता फेसबुकवर असताना कोण कशाला जाईल नव्या माध्यमात?पण शेअर चॅट आणि हॅलो या दोन सोशल नेटवर्किग साइट्सनी हे समज पार पुसून टाकले. शेअर चॅट ही भारतीय तरुणांनी सुरू केलेली कंपनी आहे. तर हॅलो ही चायनीज तरुणांनी सुरू केलेली कंपनी. या दोन्ही सोशल नेटवर्किग साइट्सची गंमत अशी आहे की हे प्लॅटफॉर्म फक्त स्थानिक भाषेत चालतात. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये हे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही अ‍ॅपवर गेलात की तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आणि बोलणं/वाचणं सुरू. फेसबुकपेक्षा हे वेगळं आहे, कारण हे दोन्ही ओपन प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे आधी मित्न बनवा, मग त्यांना फॉलो करा ही सगळी प्रक्रि या इथे करायलाच हवी हे बंधन नाही. स्वतर्‍चं प्रोफाइल न बनवताही तुम्ही या साइट्सवर लोक काय काय लिहित आहेत हे बघू शकता. फेसबुकपेक्षा इथं चाललेला धुमाकूळही जबरदस्त वेगळा आहे.वय वर्षे 14 ते 22 हा या सोशल नेटवर्किग साइट्सचा वापरकर्ता आहे. फरीद एहसान (24), अंकुश सचदेव (23), भानू प्रताप सिंग (24) या आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या तीन तरुणांनी तीनच वर्षापूर्वी प्रयोग म्हणून हे शेअर चॅट सुरू केलं. तर पस्तीस वर्षीय झान्ग इर्मिग या चिनी तरुणाच्या चायनीज स्टार्टअप कंपनी टौटीओचा सोशल नेटवर्किग प्लॅटफॉर्म आहे हॅलो. भारतात 2018 मध्येच म्हणजे यंदाच तो सुरू झाला आहे. आजच्या घडीला भारतात शेअर चॅटचे 5 कोटी, तर हॅलोचे 50 कोटी यूझर्स आहेत. आणि हे वापरकर्ते हे मध्यम आणि लहान गावातले आहेत. सुविचारांपासून एडल्ट कंटेण्टर्पयत सगळ्या गोष्टी इथे सर्रास पोस्ट होता. शेअर चॅटवर मैत्नी-प्रेम, टीव्ही मनोरंजन, माय मराठी बाणा वगैरे विभाग तर आहेतच, पण थेट नॉनव्हेज नावाचा विभाग आहे आणि त्यात 18 + म्हणून टॅग आहे. शेअर चॅटवर स्क्र ीनशॉट्स काढता येत नाहीत, पॉलिसी म्हणून त्यांनी त्यावर बंदी आणली असली तरी ‘सॉफ्ट पॉर्न’ प्रकार तिथे सर्रास बघायला मिळतोय. हाच प्रकार हॅलोवरही आहे. अर्थात सॉफ्ट पॉर्न प्रकारातल्या गोष्टी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही आहेत. फक्त फेसबुक आणि इन्स्टावर इतक्या उघड पद्धतीने त्याचे विभाग नाहीयेत, इथे ते आहेत. बरं या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर असणार्‍या प्रोफाइल्सवर गेलं तरी त्यांच्या नावावरून काहीही पत्ता लागत नाही हा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे समोर दिसणार्‍या सोनिया, मीनल, दिनेश, कार्तिक या नावांना काही हजार फॉलोअर्स असतात; पण त्यांच्या प्रोफाइल्समध्ये ते खरे कोण आहेत याचा काही आतापता नसतो. काही प्रोफाइल्स तर नावाऐवजी फक्त विशिष्ट क्रमांक आहेत. तरीही त्याला हजारो फॉलोअर्स आहेत. सुविचार, विनोद, चावट विनोद, गाणी, विनोदी व्हिडीओज, मीम या सगळ्या गोष्टी इथे भरपूर आहेत. मात्र अतिशय काळजी वाटावी अशी एक गोष्ट या प्लॅटफॉर्मवर सर्रास बघायला मिळते म्हणजे कुणीही कुणाचाही फोटो आपल्या वॉलवर त्यावर वाट्टेल ते लिहूनही डकवू शकतं. काहीबाही लिहिलेलं असतं. त्या फोटो खाली येणार्‍या कमेण्ट्स अतिशय गलिच्छ असतात. शरीराच्या आकारांबद्दल अतिशय घाणेरडय़ा भाषेत लिहिण्यापासून रेट किती एका रात्नीचा विचारण्यार्पयत काय वाट्टेल ते लिहिलेलं असतं. ज्याचा/जिचा फोटो डकवलेला आहे तिचंच/त्याचंच ते प्रोफाइल्स असेल असं नाही. मग हे फोटो डकवणारी मंडळी कुठून ते फोटो घेतात हे कळत नाहीत. कारण इथं स्क्र ीनशॉट काढता आले नाहीत तरी बाकी इंटरनेट खुलं आहे. कुठूनही काहीही डाउनलोड करून कुठेही अपलोड करता येऊ शकतं. अशावेळी भलत्याच मुलीचा फोटो घेऊन त्यावर फोटोशॉपने काहीतरी उद्योग करून या सोशल नेटवर्किग साइट्सवर डकवले जात असणार हे उघड आहे. ज्या मुला/ मुलींचे फोटो वापरले जातात त्यांना या गोष्टीचा पत्ताही नाही असं होऊच शकतं.फेक न्यूज आणि चुकीची माहिती पोहोचवण्यासाठी या सगळ्या माध्यमांचा प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय, सॉफ्ट पॉर्नचा या प्लॅटफॉर्मवरचा धुमाकूळ चिंताजनक आहे. त्यात ही दोन नवी कोरी माध्यमं 14 ते 22 या वयोगटाच्या हातात आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वापरणारी जनता सोशल मीडियाच्या विश्वासाठी जुनी, आउटडेटेड व्हावी अशी परिस्थिती आहे. या सार्‍याला आपण कसे सामोरे जाणार आहोत, हाच तर खरा प्रश्न आहे. 

****

व्यसन आणि छळ

हा सारा प्रादेशिक भाषांतला म्हणजे सर्व भारतीय भाषांतला मोकळाढाकळा पसारा इथं दिसतो. ना इंग्रजी येण्याचा काही संबंध, ना भाषेचं व्याकरण आणि काही शिष्टाचार पाळण्याचा संबंध. त्यातून एक मोठाच भयंकर बडबडा फुगा इथं दिसतो. आधीच आपल्याकडे माध्यम साक्षरता नाही. सोशल मीडिया कसा वापरावा हे लोकांना कुणीही सांगत नाहीये. त्यातून निर्माण होणारी व्यसनं हा एक काळजीचा विषय आहे. आभासी जगातला छळ ही एक मोठी समस्या आहे. 

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)