इम्युनिटी बुस्टर - या  नव्या मार्केटमोहात  तुम्हीही अडकताय  का ?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:52 PM2020-07-09T18:52:23+5:302020-07-09T18:58:09+5:30

तरुणांना मोहात पाडणारे आणि चटकन खा, झटकन तब्येत कमवा प्रतिकारशक्ती वाढवा म्हणणारे प्रयोग. ते तपासून स्वीकारले म्हणजे बरं.

Immunity Booster - new market in covid 19 & new normal | इम्युनिटी बुस्टर - या  नव्या मार्केटमोहात  तुम्हीही अडकताय  का ?  

इम्युनिटी बुस्टर - या  नव्या मार्केटमोहात  तुम्हीही अडकताय  का ?  

Next
ठळक मुद्देइम्युनिटी बूस्टर

- नितांत महाजन

तरुण मुलांना घरात कोंडून घालणारं एक संकट  जगावर आलं.
आपल्याकडे तर परीक्षा होणार की होणार नाहीत इथून घोळ आहेत, हाताला काम, मनाला समाधान, शिखात पैसा, उत्तम तब्येत हे सारं तर लांबच.
त्यात जीम बंद, जॉगिंगला जायला परवानगी; पण जायचं तर मास्क लावावा की नाही याविषयावर भरपूर ज्ञान वाटप होतं.
दिवसभर हातात मोबाइल असतोच. आपल्या सगळ्यांच्याच व्हॉट्सअॅपवर कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक कुठले मेसेज आले?
- सहज नजर घाला, आपल्याला आलेले किंवा आपण फॉरवर्ड केलेले अनेक मेसेज एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहेत की, ‘प्रतिकारशक्ती’ वाढवा.
दुसरं आपल्या हातात काहीच उरलेलं नाही. 
्रआपणही मोठय़ा भरवशाने अनेकांना सांगतो, काही नाही रे आपली इम्यून सिस्टिम तगडी आहे. आपल्याला काय होतंय, तरुण मुलांना झालाच कोरोना तरी लवकर बरा होतो.
पण म्हणून काही इथंच ही गोष्ट संपत नाही.
हातातल्या मोबाइलला एकदम बाळसं आल्यासारखं हळद, सुंठ, मिरे-जिरे-ओवा-लवंग-आले-तुळस हे सारे सुपरहीरो ‘कोरोनासे दुनियाको बचाने’ धावल्यासारखे समाजमाध्यमांत धावत असतात.
रोज काढा आवश्यक आहे, रोज लिंबू पिळून पाणी अवश्य प्या, रोज सुंठगोळी खा, आर्सेनिक घ्या असं तर अनेकजण आपण स्वत:च डॉक्टर किंवा तज्ज्ञ असल्याचं परस्परांना सांगतात.
त्यासाठी त्या त्या पॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आपल्या प्रकृतीप्रमाणो आवश्यक तीच औषधं घ्यावीत असंही अनेकांना वाटत नाही.
जो तो इम्युनिटी वाढवायच्या मागे लागल्यासारखा सोशल मीडियातलं ज्ञान सॅनिटायझरसारखं सतत हातानं उचलून घेत आहे.
अस्वस्थ काळात असं होणं साहजिकही आहे; पण ते केवळ माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यापुरतं आता उरलेलं नाही. 
कोरोनापूर्व काळात ‘इम्युनिटी बूस्टर’ नावाचा एक व्यवसाय होताच; पण त्याकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपुरताच तो मर्यादित होता.
कोरोनाकाळात या व्यवसायाचा भाव जगभर वधारला. जगभरातली माणसं ‘इम्युनिटी बूस्टर’ अर्थात प्रतिकारशक्ती कशाकशानं वाढू शकेल असं ऑनलाइन शोधू लागले, वाचू लागले, समाजमाध्यमात चर्चा सुरू झाल्या. ‘काही अपाय तर नाही ना’ म्हणत अनेकांनी स्वत:वर प्रयोगही सुरूकेले. वेलनेस इंडस्ट्रीच्या पोटातून हा नवा उद्योग आता एकदम जोरदार वेगानं पुढे येतो आहे.
पर्सिस्टन्स मार्केट रिसर्च या पोर्टलने दिलेल्या वृत्त-आकडेवारीनुसार प्रतिकारशक्ती वाढवणा:या औषधांची (हेल्थ सप्लिमेण्ट्स)ची बाजारपेठ वाढते आहे. या औषधांना जगात सर्वाधिक मागणी अमेरिकेत आहे. व्हिटॅमिन्स, हर्बल न्युट्रिशन हे सारं सध्या तेजीत आहे. येत्या दशकभरात म्हणजेच 2क्2क् ते 2क्3क् या काळात अनेक उत्पादनं बाजारपेठेत येतील आणि त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध असेल असा या पोर्टलचा अंदाज आहे.
डब्ल्यूआरसी नावाच्या एका वेबसाइटनुसार याकाळात भारतातील लोकांनीही भरपूर ऑनलाइन शोधाशोध करत कशानं प्रतिकारशक्ती वाढते याची माहिती घेतली. आपण काढा घ्यायला बहुसंख्य लोकांनी सुरुवात केली आहे, असं हे वृत्त म्हणतं.
इतकंच नाही तर आता बंगळुरूमध्ये हॉटेल्स उघडत असून, तिथं अनेक हॉटेल्सनी हळद दूध, ओवासुंठ चहा, च्यवनप्राश आइस्क्रीम हे पदार्थ आपल्या मेन्यूकार्डमध्ये नव्यानं सामील केली आहेत.
लोकांच्या मनात असलेली भीती, आपली प्रतिकारशक्ती कोरोनाला पुरून उरेल ना ही शंका यावर आता हा नवा व्यवसाय पोसला जाणार आहे हे उघड आहे.
वेट लॉस, विविध प्रकारची डाएट, यांनी जसं तरुणाईला मोहात पाडलं होतं, तसं हे इम्युनिटी बूस्टरही तरुण ग्राहकांच्या शोधात तर नाहीत ना, हे तपासून, ताडून पाहिलं पाहिजे.


कोरोनाकाळात जगभरातल्या माणसांना हे लक्षात आलं की, बाकी सगळं नंतर आपलं आरोग्य महत्त्वाचं. त्यातून आरोग्य भान वाढलं तर ते उत्तमच आहे, व्यायाम-तंदुरुस्ती याचे आग्रह वाईट नाहीच.
मात्र पी हळद- कमव प्रतिकारशक्ती इतकं सोपं हे गणित नसतं, नसेल हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, शरीराची गरज याशिवाय असे प्रयोग कितपत सुरक्षित असतील याचाही विचार करायला हवा. समाजमाध्यमातून आपल्यार्पयत येणारे सल्ले तज्ज्ञांचेच आहेत ना याचीही खात्री या नव्या बाजारपेठेच्या उत्साही काळात करून घेतलेली बरी!
नाहीतर लेने के देने पडेंगे.

 

Web Title: Immunity Booster - new market in covid 19 & new normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.