गरबा शिकायचा तर.? स्वत:ला मोकळं सोडा
By Admin | Updated: October 8, 2015 20:58 IST2015-10-08T20:58:30+5:302015-10-08T20:58:30+5:30
अनेकांना गरबा शिकायचा असतो, नाचायचं असतं.

गरबा शिकायचा तर.? स्वत:ला मोकळं सोडा
अनेकांना गरबा शिकायचा असतो, नाचायचं असतं.
पण एकतर त्यांना नाचता येत नाही आणि दुसरं म्हणजे भीड. की आपण असं लोकांसमोर कसं नाचणार?
कसं जमणार?
खरंतर हा संकोचच आपल्याला अडवून ठेवतो. मुक्त सोडत नाही. मनावरचा ताण आणि जबाबदारीचं ओझं उतरवून ठेवत नाही.
शरीर हलकं होत नाही.
त्यामुळे गरबा शिकायचा असेल तर
विसराच या काही गोष्टी.
1) आपलं वय.
2) आपली पोङिाशन. तुम्ही कोण, कुठल्या पदावर काम करता.
3) आपलं वजन, उंची, डान्स न येणं.
4) लोक काय म्हणतील.
5) भीती आणि लाज.
6) सगळ्यात महत्त्वाचं. स्वत:ला! विसरून जा स्वत:ला.
तरच मनावरचा ताण पळेल आणि तुम्ही सापडाल त्या ओङयाखाली हरवलेले. तुम्हालाच. कदाचित!!