केस हायलाइट केले तर?
By Admin | Updated: March 26, 2015 20:18 IST2015-03-26T20:18:53+5:302015-03-26T20:18:53+5:30
हल्ली हेअर कलर करण्याची खूप फॅशन आहे. तसं पाहता आता खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केस कलर करता येतात; मात्र जो कलर दुसर्याच्या केसावर चांगला दिसतो तो आपल्या केसांवर दिसेलच असं नाही.

केस हायलाइट केले तर?
लीना खांडेकर
आपण रोज एक नवीन फॅशन कुठं ना कुठं पाहतो. ते पाहूून आपल्यालाही वाटतं की लूक चेंज करायचं तर आपणही असंच काहीतरी करायला हवं. त्या उत्साहात आपण स्वत:ला हे विचारतच नाही की, आपल्याला हे चांगलं दिसेल का?
आता हेच पहा ना, हल्ली हेअर कलर करण्याची खूप फॅशन आहे. तसं पाहता आता खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केस कलर करता येतात; मात्र जो कलर दुसर्याच्या केसावर चांगला दिसतो तो आपल्या केसांवर दिसेलच असं नाही.
आपण आपला हेअर कलर निवडताना आपल्या त्वचेचा रंग, आपल्या केसांचा पोत, आपली आवड, आपलं काम आणि आपली लाइफस्टाइल यासगळ्याचा विचार करायला हवा.
आणि मुख्य म्हणजे आपल्याला सगळेच केस कलर करायचे आहेत की, फॅशन म्हणून काहीतरी छोटूसं करून पहायचं आहे हेदेखील ठरवा.
त्यासाठी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि केस कलर करायचा निर्णय घ्याल तेव्हा ही माहिती तपासून घ्या.
१) फॅशन म्हणून केस कलर करायचे असतील तर हायलाइट्स, स्ट्रीप कलर असे प्रकारही करता येतात. त्यातही ब्लॉण्ड, लाल, निळा असे रंग वापरता येतात.
२) ज्यांचे केस पांढरे झालेत आणि ते झाकण्यासाठी जे कलर करतात त्यांनी मात्र जास्त खबरदारी घ्यायला हवी.
३) अमोनिया फ्री असे कलर्स बाजारात मिळतात. ते वापरता येतात पण ज्यात अमोनिया असतो ते रंग जास्त काळ केसांवर टिकतात.
४) जे पांढरे केस झाकण्यसाठी केस कलर करतात त्यांनी एकदा ग्लोबल कलर ही थेरपी करून मग एक ते दीड महिन्यांनी रूट टचअप केलं तरी चालतं.
५) हायलाइट्स किंवा स्टायकिंग केलं तर अशा गोष्टी ८ ते १0 महिने खूप छान राहतात. त्यानंतर मात्र त्यांना रिफ्रेश करावं लागतं. ते केलं नाही तर असे हायलाइट्स डल दिसू लागतात.
६) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलरिंगनंतर योग्य तो एसटी कलर श्ॉम्पू, कंडिशनर, हेअर स्पा हे सारं करणं फार गरजेचं असतं. तरच तुमचे कलर्ड केस चांगले दिसतात.
७) आपलं व्यक्तिमत्त्व आणि त्याला शोभेल असा रंग हे गणित जर जमलं तर केस कलर केल्यानं तुमचा लूक खरंच बदलू शकतो.