शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

बोअर झालं यार, चेंज हवा आता !- असं म्हणता, म्हणजे नेमकं काय हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 1:43 PM

चेंज हवा म्हणजे नेमकं काय हवं? ते कळलं तर या बोअर होण्याच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकेल.

ठळक मुद्देचेंज मंगता है क्या?

- प्राची पाठक

गेले काही महिने लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने आपल्याला घरात कोंडून ठेवल्यासारखं झालं आहे. त्यात घरात जागा कमी आणि माणसं जास्त असतील तर सतत तेच ते लोक आणि तेच ते वाद-संवाद असा कंटाळादेखील आलेला आहे. एरवीही जेव्हा आपण सतत म्हणत असतो की चेंज हवा, चेंज हवा, त्यात अशा परिस्थितीत इतके महिने गेल्यावर काहीतरी वेगळं करणं हवंसं वाटेल, हे ओघानं आलंच.मग आपण काय करतो? नेटवर काही मजेदार मिळतं का ते सर्च करतो. खाण्यापिण्यासाठी काही वेगळं शोधत राहतो. घरी कितीही वेगवेगळ्या डिशेस केल्या तरीही आपल्याला बाहेरचं काही खावंसं वाटत असतंच. जणू घरच्या अन्नाने तोंडाची चवच उडाली आहे, अशी फिलिंग आलीये अनेकांना. नेहमीचे हॉटेल्स, फूड जॉइंट्स, कट्टे खुणावत असतात. मनात कोरोनाची भीती घेऊनसुद्धा आपल्या नेहमीच्या फूड जॉइण्टवरून जरासं काहीतरी तरी मागवूच, असं आपल्याला वाटत राहतं. त्या निमित्ताने आपण नेट सर्फ करायला लागतो. एक शोधता शोधता आणखीन काय काय आपल्याला हवंय, ते आठवून आठवून ऑर्डर करत राहतो. कुठे काय कोणत्या स्कीममध्ये मिळतं आहे, कुठे कसला सेल सुरू आहे, हेही सर्व घरी बसून ‘चेंज हवा, चेंज हवा’ करत आपण शोधत राहतो. घरातल्या वाण सामानापासून अनेक गोष्टी नेटवरून ऑर्डर करता येतात. एरवीही आपण ते करतच असतो कधीमधी. परंतु, यावेळी मात्न एकीकडे आपण घरात बर्‍यापैकी अडकून पडलो आहोत. दुसरीकडे मात्न बाहेर गेलं की कोरोनाची भीतीही वाटतेय. त्यामुळे, घरबसल्या काही वस्तू मिळणं ही सोय नक्कीच आहे. फक्त ती सोय म्हणजे आपलं मन रमवायचं साधन होऊन बसली आहे का, ते स्वतर्‍ला विचारायचं. या ऑनलाइन खरेदीवर आपण किती वेळ रेंगाळलेले असतो, ते शोधायचं. त्यावर आपण जास्त वेळ घालवू लागलो आणि गरज नसलेल्या अनेक गोष्टीदेखील उगाच ऑर्डर करत बसलो, तर अपने अंदर कि घंटी बजनी चाहिये. आपल्याला आलेल्या प्रचंड कंटाळ्यामुळे आपण नुसतीच अनावश्यक खरेदी करत सुटलो आहोत का? घरी बसून मी कसं सगळं ऑर्डर केलं, हे कोणाला दाखवून देण्यासाठी असं होत आहे का? सतत काहीतरी विकत घ्यावं, ऑर्डर करावं असं आपल्याला का वाटतं आहे, ते स्वतर्‍ला विचारायचं. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍याही  गेलेल्या आहेत. कोणाचे कामाचे पैसे मिळालेले नाहीत. कॉलेजला परीक्षा पास करून नवीन नोकरीला लागू, असं स्वप्न पाहणार्‍यांनादेखील मोठा ब्रेक लागला आहे. परीक्षा होणार की नाही? आपल्या नोकरीचं काय? असे अनेक प्रश्न समोर आहेत. असं असताना हातात भरपूर पैसा असो की बेताचाच पैसा असो, आपण भान विसरून चेंज हवा करत शॉपिंग करत सुटलो आहोत का, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. 

चेंज हवा, या कुरकुरीखाली आपल्याला नेमकं काय काय बदलायला हवं आहे, त्याची चक्क एक यादीच करायला घ्यायची. तशी सध्याची परिस्थिती आहे का, तो चेंज आपल्या आवाक्यातला आहे का, हेही पाहणं गरजेचं आहे. आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींचा ध्यास घेऊन बसलो, तर चेंज हवा असं करत करत आपण निराशेच्या गर्तेत लोटले जाऊ शकतो. चेंज हवा करत वेगवेगळं असं सतत खायला लागलो, तरी तब्येत बिघडू शकते. तिच्या लहानसहान कुरबुरी निर्माण होऊ शकतात. रूटीन हे काही इतकंही वाईट नसतं, हे आपल्याला कळेल. रूटीन सुरू राहण्यात बजेट हा फॅक्टरदेखील असतोच. चेंज हवा करत आपल्याला एरवीही दूर कुठे जावंसं वाटत असतंच. आता तर घरातच अडकल्यामुुळे ते वाटणं आणखीनच टोकदार झालेलं आहे. अशा वेळी ‘बाहेर पडलो तर कोरोना आहेच’, ही भीती मनात ठेवूनच आपण गरजेला बाहेर पडतोय.तरीही, हे सर्व नियम आणि भीती देऊ झुगारून आणि मस्तं भटकून येऊ, असंही एक मन सांगतं. त्याला जोड म्हणून कोरोना कसा जैविक युद्ध म्हणून वापरला गेलेला व्हायरस आहे, ते सगळं कसं प्लॅन केलेलं आहे, अशा अनेक थिअरीज आपल्याकडे तयार असतात. आपल्याला हवी ती थिअरी हवी तशी बाहेर काढून आपणच आपलं वागणं कसं त्या त्या वेळी बरोबरच असतं, हे जस्टीफाय करत राहतो. हे सर्व एरवीही होत असतंच. फक्त यावेळी त्याला काही गडद छटा आहेत. म्हणूनच, आपल्या मनातल्या कंटाळ्याशीच आपल्याला जरा बोलावं लागेल. कंटाळा आलाय, चेंज हवा करत तो आपल्याकडून नेमकं काय काय काढू पाहत आहे, ते नीट बघावं लागेल. कंटाळ्याशी गप्पा मारायला शिकावं लागेल. तेव्हाच आपल्याला ज्या गोष्टींचा जामच कंटाळा आलेला असतो, त्यात नवीन काही सापडू शकेल. नवीन काही करून बघण्यात एक सहजता येईल. वेळ जात नाही म्हणून कर शॉपिंग, जा कुठेतरी हे प्रकार कमी होतील. 

चेंज हवा, चेंज हवा म्हणत जगण्यात चेंज होत नसतो, त्यासाठीही एक उत्तम रूटीन लागतं.ते आहे का आपलं, विचारा स्वतर्‍ला!

* आपल्याला नेमका कंटाळा आला आहे म्हणून चेंज हवा आहे की, आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, असा आळस आला आहे, हा फरक समजून घेता येईल. *चेंज हा जरा वेळच असतो. चेंज म्हणून काही करून झाल्यावर पुन्हा आपल्याला रूटीनच्या पटरीवरच धावायचं असतं. *कुठेतरी फिरायला जाऊन परत आल्यावर आपण शेवटी त्याच वातावरणामध्ये, त्याच घरात, त्याच माणसांमध्ये राहणार असतो, तर परिस्थितीपासून निव्वळ पळ काढण्यासाठी जर असा चेंज शोधला, तर त्यातून निराशाच पदरी पडेल. *त्यापेक्षा समजून-उमजून आणि सर्वांना सामावून घेतलेला चेंज आपल्याला खरोखर रिफ्रेश करू शकेल. शेवटी काय की आपल्या कंटाळ्याशी बोलायला शिकायचं. * चेंज हवा म्हणजे नेमकं काय हवं, कसं आणि  कधी हवं, याचंसुद्धा नीट प्लॅनिंग करायचं. तरच या बोअर होण्याच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकेल. 

(प्राची मानसशास्रसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)