रोज मेकप तर करायचा नाही, पण सुंदर तर दिसायचंय, मग काय करायचं? फक्त १0 गोष्टी
By Admin | Updated: July 24, 2014 18:19 IST2014-07-24T18:19:25+5:302014-07-24T18:19:25+5:30
हल्ली कॉलेजात किंवा ऑफिसात कुणी मेकप करून जातं का? किती लाऊड दिसतं ते, त्यात बजेट पण पहावंच लागतं

रोज मेकप तर करायचा नाही, पण सुंदर तर दिसायचंय, मग काय करायचं? फक्त १0 गोष्टी
>
हल्ली कॉलेजात किंवा ऑफिसात कुणी मेकप करून जातं का?
किती लाऊड दिसतं ते, त्यात बजेट पण पहावंच लागतं. आईबाबांकडून किती पैसे उकळणार यालाही लिमिटेशन असतातच. मात्र अगदीच सिम्पल राहूनही नाही ना चालत, पर्सनॅलिटी तर उत्तम दिसली पाहिजेच. सुंदर दिसायची हौस असतेच. मग कशी सांभाळायची ही कसरत, कमीत कमी वेळ, कमीत कमी पैसे आणि अजिबात भडक न वाटणारा मेकप हे कसं जमवायचं?
खरं तर सोप्पंय, त्यासाठीच या काही गोष्टी आपल्याला जमायला हव्यात.
1. तुम्ही रोज चेहरा डीप क्लिनिंझ करणं मस्टच आहे. त्यामुळे आपल्या त्वचेवरील छिद्र मोकळे होतात व चेहर्यावरील मळ व तेलकटपणा निघून होतो. त्यासाठी तुम्ही एखादा चांगला डीप क्लिन्झिंग फेसवॉश किंवा क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता.
2. क्लिन्झिंग बरोबरच महत्त्वाचं ठरतं ते टोनिंग. क्लिन्झिंगमुळे मोकळे झालेले छिद्र त्यामुळे बुजतात व त्वचेचा पीएच लेवल बॅलन्स होतो. सध्या बाजारात खूप प्रकारचे टोनर्स आहेत पण जर बजेटमध्ये टोनर हवं असेल तर चेहर्याला गुलाबपाणी मस्त कापसाच्या बोळ्यानं लावायचं.
3. तिसरी पायरी म्हणजेच मॉयश्चरायझिंग. ते अत्यंत महत्त्वाचं, मेकपबेस त्यामुळे त्वेचशी चांगला ब्लेंड होतो. त्वचेचं टेक्श्चर सुधारतं. तुमच्या स्कीन टाइपनुसार मॉयश्चरायझर निवडा.
4. किन्सलर हा आणखी एक प्रकार. पण तो फक्त मुलींनीच वापरा, विशेषत: ज्यांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल किंवा अग्ली स्पॉट्स आहेत त्यांनी किन्सलर वापरणं योग्य. किन्सलर प्रामुख्याने ब्रश किंवा बोटानं डोळ्य़ाच्या कडेला आतून बाहेर अशा पद्धतीनं लावावा.
5. मिनरल फाउंडेशन लावायलाही हरकत नाही. त्यानं नैसर्गिक लूक येतो. लिक्विड फाउंडेशनपेक्षा लावताना वेळही कमी लागतो.
6. नॅच्युरल स्कीन कलर, आय श्ॉडोज मधल्या बोटानं लावता येतात. त्यामध्ये क्रि मी आय श्ॉडोज निवडणं चांगलं.
7. ज्या मुलींच्या जाड पापण्या असेल त्यांनी पारदर्शक किंवा ब्राऊन मस्करा वापरावा व ज्यांच्या पापण्या बारीक असतील त्यांनी काळा मस्करा वापरावा.
8. डोळे पाणीदार दिसण्याकरता ब्राऊन किंवा काळा आय लायनर अप्पर लॅश लाइनवर अगदी बारीक लावावा. खालच्या लॅश लाइनला कोहल काजळ वापरावं.
9. लिपिस्टक ऐवजी तुम्ही डायरेक्ट टिंटेड लिप ग्लॉस पिंक, ब्राऊन किंवा पिच कलरमध्ये वापरल्यास कुठल्याही ड्रेसवर ते चालू शकतं, नॅचरलही वाटतं.
- धनश्री संखे
ब्युटी एक्स्पर्ट