मी काहीच करत नाही !
By Admin | Updated: September 4, 2014 17:21 IST2014-09-04T17:21:15+5:302014-09-04T17:21:15+5:30
कुणी जग बदलयाचा प्रयत्न करतय , कुणी समाज. कुणी व्यवस्था आणि आम्ही ?

मी काहीच करत नाही !
>
विनोद कटारे, औरंगाबाद
देशात सगळीकडे बरंच काही, ब-याच जणांसाठी बदलतंय. पण आमच्यासाठी काहीही बदलत नाहीये. म्हणायलाच तरुणांचा देश, तरुणांचा संताप, 50 टक्के जनता तरुण, पण इथं आमच्या आयुष्यात बदलत काही नाही.
काहीजण करतातही बदलांसाठी प्रयत्न. रस्त्यावर उतरतात, जाब विचारतात, माहिती मिळवतात, हक्क मागतात. पण काहीजण मात्र फक्त शांत बसतात. सहानुभूती व्यक्त करतात.
त्या शांत बसणा-यातला मी ‘एक’.
काय करतो मी, मला देशातले बरे वाईट बदल दिसतात. बलात्काराच्या घटना दिसतात. दलितांवरचे अत्याचार दिसतात. शोषण दिसतं. गरिबी, लाचारी दिसते. ते सारं नुस्तं दिसत नाही, तर जाणवतंही.
पण हे सारं दिसूनही मी रस्त्यावर नाही उतरु शकतं. मी नुस्ता पाहतो. माङयासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीची माहिती आहे. पण त्या परिस्थितीला विरोधही ते करु शकत नाहीत. ते काहीच करु शकत नाहीत.
कारण जग बदलायच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ¨हंमत लागते ती आपल्यात आहे हे आम्हाला पक्कं माहिती आहे. पण त्या हिमतीचं करायचं काय, आम्ही पार अडकलोय आमच्याच जबाब दा-यांमध्ये.
जगाचा विचार मग करू, आधी स्वत:चे प्रश्न सोडवू, आधी आहे त्या कटकटी निस्तरू म्हणत आम्ही आमच्याच आयुष्यातले गुंते सोडवतो आहोत. काही गोष्टी ऐकायला, बोलायला ब:या वाटतात. पण प्रत्यक्षात कोणी त्या करत नाहीत, कारण आपले प्रश्न सोडवू लागायला, मदतीलाही कुणी येत नाही. आपलं आयुष्य एका वतरुळासारखं, त्यातून बाहेर पडण्याचाच मार्ग सापडत नाही.
आम्ही आमच्या जगण्याचे, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यातच इतके दमतोय की बाकी काही करायला त्रणच उरत नाही.
मग आम्ही काय समाजात बदल घडवणार? काय देश बदलणार ? आम्ही फक्त सहानुभूतीच दाखवतो, जे कुणी आमच्यासारखे पिचलेले आहेत, त्यांच्यासाठी !
आणि पुरे पडतोय अपेक्षांना. घरच्यांच्या नोकरीच्या, करिअरच्या, चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अपेक्षा पु-या करता करताच जीव जातोय. काय रस्त्यावर उतरता आणि व्यवस्था तोडतामोडता?
घरच्यांची जबाबदारी आहेच, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहेत, बहीण-भावाची जबाबदारीही आहेच अनेकांवर. हेच सारं धड जमत नाही म्हणून अवतीभोवतीची माणसं नाराज असतात. त्यांच्या नाराजीलाही उत्तरं सापडत नाहीत. मग सांगा, कितीही वाटलं तरी कसं सामील व्हायचं बदलाच्या प्रक्रियेत. कसं नी काय सांगायचं स्वत:ला?