शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पुण्यात एचआर, पण लॉकडाउनमध्ये त्यानं गावात केलं पाणीदार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 4:30 PM

पुण्यात एचआर म्हणून तो काम करत होता, गावी आला आणि लॉकडाउनमध्ये पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागे लागला. गावकऱ्यांच्या  मदतीनं कसं झालं हे काम, त्याची गोष्ट.

ठळक मुद्देलॉकडाउनच्या काळात अशीही एक पाणीदार कहाणी आकार घेत राहिली.

स्वप्नील  शिंदे

लॉकडाउन. अनेक उद्योगधंदे बंद. बहुतेक कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. तसाच दहिगावचा योगेश चव्हाण. पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर अर्थात मनुष्यबळ विभागात तो काम करतो.लॉकडाउननंतर शहरातील नोकरदारांनी आपापलं गाव गाठलं. तसाच योगेशनेही कुटुंबासह आपल्या गावाकडे मुक्काम हलवला. या काळात काय करायचं हा प्रश्न होताच. पाणीटंचाई तो पाहत होता.त्यानं मग काही उद्योजकांशी संपर्क केला आणि जलसंधारणाचं काम गावात करायचं ठरवलं.  त्यासाठी आर्थिक मदत मिळवून वॉटर रिसोर्सचं काम उभं करण्याचा प्रयत्न सुरूकेला.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी तालुका. सप्टेंबरमधील परतीचा पाऊस येथे प्रामुख्याने चांगला पडतो. परंतु हा पाऊसही वेळेवर पडला नाही तर दुष्काळ पडतोच. पाण्याच्या टॅँकरची वाट पाहणं इथं गेल्या दहा वर्षात बदललं नाही.गावामध्ये शिक्षण घेत असताना योगेशनेही पाण्याचे हंडे वाहिले होतेच. योगेशने एमबीए केलं आणि तो पुण्यात रहायला गेला.गेली दहा - बारा वर्षे नोकरी करत तो तिकडे होता, गावचा पाणीप्रश्नही तसाच होता. दहिगावला तो यायचा तेव्हा या पाण्याचं काहीतरी करायला पाहिजे म्हणत होता. दरम्यान, त्यानं विनोद चव्हाण, प्रमोद धुमाळ, दत्तात्नय खराडे या दोस्तांना बरोबर घेऊन गावात जलसंधारणाची कामं करण्यास सुरुवात केली. गावातील काही लोकांनीही गावाशेजारील वसना नदीचं खोलीकरण आणि रुंदीपरणाचं काम हाती घेतलं होतंच. त्यासाठी ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या कल्पना साळुंखे, प्रशांत बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली पाणलोट क्षेत्न विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार त्यांनी नदीतील वाळू आणि इतर कामे करण्यापेक्षा शेती शिवारातील ओढे-नाले, माती, सिमेंट बंधायातील गाळ काढण्याचं काम केलं. त्यामुळे पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. तसेच गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. दहिगाव शेजारी असलेल्या आसनगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.दरम्यान, कोरोना लॉकडाउन झाल्यानं योगेश त्याच्या कुटुंबासह गावात मुक्कामाला आला. त्याने आसनगावमधील निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्नय शिंदे यांच्या मदतीने गावच्या शिवाराची पाहणी करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाझर तलाव दुरुस्ती कामाचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी आर्थिक निधीची गरज होती. म्हणून योगेशने त्याच्या ओळखीच्या काही उद्योजकांशी संपर्क साधून पैशांची व्यवस्था केली. दुसरीकडे पाझर तलावासाठी लोकवर्गणी गोळा करणं आणि शासकीय मंजु:या घेण्याचं काम सुरू होतं. या सर्व कामासाठी दीड महिन्यांचा कालावधी गेला. मे महिन्याच्या दुस:या आठवडय़ात काम सुरू झालं. पावसाळा जवळ आल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होतं. त्याचवेळी गावात मीटिंग, कामाची आखणी, शेतक:यांना प्रकल्प समजावणं अशीदेखील कामे समांतर सुरू होती. लॉकडाउनमुळे मशीन व वाहनं उपलब्ध होण्यासाठी अडचणीत येत होत्या. मशीन उपलब्ध झाल्यानंतर पाझर तलावाकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. एक अडचण आल्यानंतर दुसरी, दुसरी झाली तिसरी अशी अनंत अडचणीत येत होत्या. पण योगेश आणि आसनगाव गावक:यांच्या प्रयत्नांमुळे नियोजन करून जोरात काम सुरूझालं. सध्या हे काम अंतिम टप्प्यावर असून, पावसाळ्यापूर्वी जर काम पूर्ण झालं तर गावाला त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी सर्वाना खात्री आहे.गावातील तरुणही या कामात सहभागी झाले. गाळ वाहून नेण्याचे काम शेतक:यांनी स्वखर्चाने केले. या गाळातून त्यांच्या जमिनीही सुपिक झाल्या, काही पाणंद रस्तेही तयार झाले. लॉकडाउनच्या काळात अशीही एक पाणीदार कहाणी आकार घेत राहिली.

( स्वप्नील  लोकमतच्या सातारा आवृत्तीत वार्ताहर आहे.)