गावात पाणी मुरेल कसं?

By Admin | Updated: July 14, 2016 23:47 IST2016-07-14T23:47:04+5:302016-07-14T23:47:04+5:30

‘श्रमदान’ असं काही आमच्याकडे होत नाही हो! असं म्हणणारेच मोठय़ा उत्साहानं हातात टिकाव-टोपलं घेऊन दुष्काळाशी दोन हात करायला भिडले

How to water the village? | गावात पाणी मुरेल कसं?

गावात पाणी मुरेल कसं?

> - इरफान शेख, बीड
 
पाणी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेसाठी
मराठवाडय़ातल्या 116 गावातली माणसं
झडझडून कामाला लागली
आणि श्रमदानातून त्यांनी
पाणी मुरवण्याची अनेक कामं केली,
त्या कामात सहभागी झालेल्या
तारुण्याला अनुभवापलीकडे काय मिळालं?
 
या एका प्रश्नानं गावात पाणी मुरवण्यासाठी कामाला लागलेल्या
तरुण हातांचा एक अनुभव.
 
‘श्रमदान’ असं काही आमच्याकडे होत नाही हो! असं म्हणणारेच मोठय़ा उत्साहानं हातात टिकाव-टोपलं घेऊन दुष्काळाशी दोन हात करायला भिडले आणि बघता बघता विकासाचं एक नवं मॉडेल, एक नवीन पद्धत सिद्ध झाली. 
निमित्त होतं, सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. जी वेगवेगळ्या 3 तालुक्यातील 116 गावात राबली आणि सिद्ध झाली. फक्त 45 दिवसात एखादं गाव कात टाकून, कसं अशक्य ते शक्य करतं हे पाहायच असेल तर या वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या राडी तांडा, खापरटोन, पाटोदा, कुंबेफळ, कोळ कानडी, शेपवाडी यांसारख्या गावांना भेटी देऊन पाहा. श्रमदानातून अनेक कामं झाली. त्यात सलग समतोल चर, अनघड दगडी बांध, शेताची बांध बांधणी, मातीचे नाला बांध अशी अनेक कामं उभी राहिली.
ही स्पर्धा आणि पाणी फाउण्डेशनच्या या उपक्रमानं तुम्हाला काय दिलं, या गावांना काय दिलं, अशी आम्हाला खूप वेळा विचारणा होते.
याचं उत्तर हेच की, या उपक्रमानं या गावांना, इथल्या माणसांना आत्मभान-आत्मविश्वास दिला. माङो मित्न दिलीप मोटे नेहमीच म्हणतात, ‘कुणाला काही द्यायचंच असेल तर आत्मविश्वास द्या!’ तसंच झालं इथंही. पाणी फाउण्डेशनने या गावातल्या तरुणांना, माणसांना हा आत्मविश्वास दिला की, ‘ भावा! तू लढ, समदं नीट होईल बघ, आन हे जर तू केलंस तर हामी बक्षीस बी देऊू!’ आपल्याला जमेल, करून तर पाहू हा आत्मविश्वास निर्माण झाला तर सामान्य माणसंसुद्धा असामान्य काम करू शकतात हे आपण ऐकत असतो. त्याचाच अनुभव यावेळी आला. 
या वॉटरकप स्पर्धेदरम्यान एकटय़ा अंबाजोगाई तालुक्यात सरासरी 42क्3 लोकांनी 45 दिवस श्रमदानातून जवळपास 1 कोटी रुपयांची कामं केली. त्या कामात साथ मिळाली ती समस्त महाजन ग्रुप, मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी व जलयुक्त शिवार अभियानाची. समस्त महाजन परिवाराचे गिरीशभाई शहा म्हणाले की,  ‘यह एक विकास यज्ञ है, हरकोई अपनी तरहसे इसमे आहुति देते रहे, यह अवश्य सफल होगा!’ आणि त्यांचे शब्द खरे ठरले. इथे एक विशेष पुन्हा अधोरेखित झाली की, चांगल्या कामांना सुरु वात केली तर देणा:यांचे हात हजारो पुढे येतात. अंदाजे जवळपास 13 कोटींहून अधिकची कामं या वॉटरकप स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या लोकवर्गणीतून पूर्ण झाली, ती फक्त अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. आणि याहून मोठी गोष्ट म्हणजे आता अब्जावधी लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.
पहिला पाऊस नुकताच बरसला आणि गावच्या गाव नदी-नाल्यांकडे धावू लागलं. सगळे पाहात होते की आपण जिथे घामाच्या धारा गाळल्या तिथं वरुणराजा मोत्यांच्या धारांनी भरभरून दान देतो आहे. उदहारणादाखल सांगतो, श्रीपतरायवाडीचं पाणी त्यातला थेंब वरपगाव शिवारात गेला नाही. वरपगाव परिसराचा थेंब शिव ओलांडून कोळकानडी परिसरात गेला नाही, असंच कोळकानडीचं माकेगावला गेलं नाही आणि माकेगावच पाटोदा शिवारात गेलं नाही. पाटोदाची होळणा देवळ्याला वाहिली नाही. प्रत्येकाच्या शिवरातील पाणी-त्याच्याच शिवारात मुरलं. ते पाहून तिथं आलेले एक आजोबा म्हणाले, ‘साहेब, मागच्या वर्षी पहिला पाऊस याच्याहून मोठा पडला होता, पण नदीत थेंब साचलं नव्हतं बघा, असं साठलेलं पाणी पाहून लई वर्ष झाली बघा!’ त्यांचा उत्साह, त्यांचे आनंदी चेहरे, त्यांचे शब्दांत वाहणारे अभिमान, सर्वच अतुल्य होतं.
आणि हे सारं होत असताना जलसंधारणाबाबतही गावात जागरूकता निर्माण झाली. लोक रोज पडणारा पाऊस मिलीमीटरमध्ये मोजतात आणि किती कोटी लिटर साचलं हे सांगतात. हीच माणसं मागे काही दिवसांपूर्वी हांडा-घागर, पाणी. पाणी. करत फिरत होती, टॅँकरची वाट पाहात दुस:यांना दूषणं देत होती की, ‘करते करविते काहीच करत नाहीत’. पण आता प्रत्येकाला आत्मविश्वास वाटतो आहे की, संकट कसंही असो आपण आता त्याच्याशी भिडू शकतो.
आणि या कामात गावोगावचे तरुण आघाडीवर होते. आता गावची तरुण पिढी विधायक कामात वेळ खर्च करताना प्रश्नाशी लढते आहे, जिंकते आहे. गाव-सामान्य नागरिक आणि प्रशासन यांचं नाते बदलतंय. जिल्हाधिका:यांपासून ग्रामसेवकार्पयत सगळे साहेब आपल्यात येतात, आपल्या सोबत श्रमदान करतात. ही मोठी दिलासा देणारी बाबा ठरते आहे. ग्रामसभा या विकासाचा केंद्रबिंदू पुन्हा ठरायला लागल्या. दिवसाच नव्हे तर रात्नी सुधा तांडा-पाडय़ावरील ग्रामसभा अगदी उत्तम व्हायला लागल्या. गावच्या महिला पूर्वी इतक्या मोठय़ा प्रमाणात दारूबंदीसाठी बाहेर पडल्या होत्या. आता त्या पाण्यासाठी एकत्न श्रमदान करायला बाहेर आल्या. या कामात प्रत्येक गावातील श्रमपूजक महिलांची संख्या लक्षणीय होती.
शाळकरी विद्याथ्र्याच्या आणि कॉलेजात जाणा:या तरुणांच्या उन्हाळ्याच्या सुटय़ा सत्कारणी लागल्या. अनेक विद्यार्थी या श्रमदानात सहभागी झाले. जिमला जाण्यापेक्षा श्रमदानातून कसदार शरीर बनवायला लागली.
धानो:याचे आमचे श्रमपूजक मित्न बापू पाटील म्हणाले ‘बक्षीस म्हणून आम्हाला पाणी तर मिळालंच, पण यात आम्हाला एक शिकायला मिळालं, संकट कितीही मोठं असो, आम्ही 4 पोरं उठून उभे राहिलो की कशाला बी भिडायला तयार आहोत हे कळलं’. आपण उठलो आणि कामाला लागलो की सगळं गाव आपल्या सोबत येतं हे लई पटलं बघा!
खरं होतं ते म्हणत होते ते. हे नुस्तय जलसंधारण नाही तर मनसंधारणही झालं.
जमिनीत पाणी मुरू लागलं, साचू लागलं आणि मनात श्रमाचं, जिद्दीचं आणि इच्छाशक्तीचं बीदेखील मूळ धरू लागलं!
 
( लेखक पाणी फाऊण्डेशनचे सदस्य आहे तालूका को ऑर्डिनेटर आहेत.)

Web Title: How to water the village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.