अॅडिक्शन सोडायचं कसं?
By Admin | Updated: October 1, 2015 17:37 IST2015-10-01T17:37:11+5:302015-10-01T17:37:11+5:30
आजकालच्या तरुण आणि किशोरवयीन पिढीत एक सिंड्रोम हमखास दिसतो, ‘डीजीपी’ सिंड्रोम! म्हणजे काय?

अॅडिक्शन सोडायचं कसं?
आजकालच्या तरुण आणि किशोरवयीन पिढीत एक सिंड्रोम हमखास दिसतो,
‘डीजीपी’ सिंड्रोम!
म्हणजे काय?
ड्रग्ज, (व्हिडीओ) गेम्स आणि पोर्नोग्राफी!
मेडिकल फिल्डमध्ये ‘डीजीपी’ नावानं तो प्रचलित आहे.
का दिसतोय हा सिंड्रोम?
त्याचं मुख्य कारण आहे इंटरनेट.
मोबाइलच्या माध्यमांतून मुलांच्या हातात आता अख्खं जगच आलं आहे आणि त्यातूनच हा सिंड्रोम पसरला आहे.
या इंटरनेटनंच जन्माला घातलेलं आधुनिक बाळ म्हणजे ‘व्हॉट्सअॅप’!
‘डीजीपी’ सिंड्रोम वाढवण्यात या बाळाचाही खूप मोठा वाटा आहे.
भारतातल्या 98 टक्के अॅण्ड्रॉइड मोबाइल युजर्सनी व्हॉट्सअॅपला पसंती दिली आहे, ‘व्हॉट्सअॅप’च्या ‘अॅक्टिव्ह’ युजर्सची दरमहा संख्या आहे 8क् कोटींच्या पुढे आणि जगात सर्वाधिक ‘व्हॉट्सअॅप’ वापरणारा देश आहे, भारत!
पोर्नोग्राफी पसरवण्यात, त्याचं वेड लावण्यात आणि तरुणांना वेडं करण्यात या ‘व्हॉट्सअॅप’नं कुठलाही कसूर केलेला नाही.
पोर्नोग्राफीची लक्षणं मुलांमध्ये साफ दिसताहेत, बरेच जण त्याचे अॅडिक्टही झाले आहेत. मग काय करायचं?
मुलांना त्यापासून कसं दूर राखायचं?
अॅडिक्शनमधून सुटायचं कसं?
- मुलं पोर्नोग्राफीची अॅडिक्ट झाली असली तरीही पहिलं मुख्य सूत्र म्हणजे मुलांना लगेच घालूनपाडून बोलू नका. त्यांचा अपमान करू नका. ते असं का करताहेत, तसल्या क्लिप्स पाहिल्याशिवाय त्यांना ‘बरं’ का वाटत नाही, या कारणांचा शोध घ्या. मुलांना विश्वासात घेतलं, विश्वासाचं वातावरण घरात तयार केलं, तर मुलं मनातलं बोलतात, सांगतात असा अनुभव आहे.
- मुलांना कुणाची संगत आहे, कशात त्यांना अपयश आलं आहे का, त्यामुळे ती फ्रस्ट्रेट झालीत का? त्यांच्यात नॉर्मलपेक्षा थोडा अधिकच शायनेस आहे का? ती एकलकोंडी आहेत का?. मूळ कारणाचा शोध घ्या.
- अर्थातच यासंदर्भात ‘रामबाण’ आणि प्रत्येकाला एकच एक उपाय लागू होत नाही. पोर्नाेग्राफीपासून त्यांना एकदम थेट बंद करूनही उपयोग नसतो. मग टप्प्याटप्प्यानं त्यांचा ‘डोस’ कमी करावा लागतो. रोज चार तास पाहतो, एकच तास पाहा, नंतर अर्धाच तास. असं करून ही सवय घालवता येऊ शकते.
- जी मुलं खूपच अॅडिक्ट झालेली आहेत, त्यांच्यातल्या काहींसाठी मात्र ‘बंद म्हणजे बंद’, त्यांचा मोबाइल आणि इंटरनेटचा अॅक्सेसच थेट बंद करून टाकावा लागतो. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येही भरती करावं लागतं.
- आपली मुलं रोज रात्री व्यवस्थित झोप घेतात का? नसतील तर त्यांच्या ‘जागरणा’वर नियंत्रण आणा. त्यानंही बराच फरक पडतो.
- आपली मुलं आधीच औदासीन्य, नैराश्यानं त्रस्त आहेत? ते घालवण्यासाठी ते पोर्न क्लिप्सचा आधार घेतात? - तसंही असू शकतं.
- आणखी एक महत्त्वाचं. आई-बाबांनो, पोर्न साइट्स पाहाणं, मोबाइलवर तसल्या क्लिप्स पाहणं अगोदर तुम्ही स्वत: तातडीनं बंद करा. मुलांचं अॅडिक्शन तुमच्यामुळेच सुरू झालेलं असू शकतं.
- आपल्या घरी कोणती मॅगङिान्स येतात? सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत पालक म्हणून तुम्ही किती जागरूक आहात? मुलांशी जर याबाबतीत स्पष्टपणो पालकांचं बोलणं होत असेल, तर मुलं असल्या मार्गाना लागणार नाहीत याची खात्री.
- या अडनिडय़ा वयातल्या मुलांची ही ‘पासिंग फेज’ही असते. त्यामुळे ‘पाप-पुण्य’, ‘चांगल,-वाईट’ अशी लेबलं लावणं अगोदर बंद करा.
- मुलांची संगत कोणती आहे, याबरोबरच कोणत्या ‘व्हॉट्सअॅप’च्या संगतीत ती आलेली आहेत, त्याचा ‘म्होरक्या’ कोण, हे पाहून त्यांची संगत तोडली तरी ब:याचदा ‘पुरेसं’ होऊ शकतं.