किती छळाल?
By Admin | Updated: November 13, 2014 21:21 IST2014-11-13T21:21:58+5:302014-11-13T21:21:58+5:30
पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं.

किती छळाल?
>समीर,(चिंचवड) -
पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं. दहावीला असताना, त्यावेळच्या आमच्या अभ्यासक्रमाची शेवटची बॅच होती. त्यामुळे सर्व पेपर अतिशय सोपे निघाले आणि गणिताला तर सर्वाना बोर्डानीच (प्रश्नपत्रिके- तल्या घोळामुळे) 3क् मार्क वाढून दिले. मला 8क् टक्केच्या वर मार्क पडले.
घरच्यांना वाटलं पोरगं खूपच हुशार आहे. आता याला सायन्सलाच घालू. पण मलाच माहीत होत की मला 81.7 टक्के मार्क कसे पडलेत!
मात्र घरच्यांपुढे बोलण्याची सोय नव्हती. घेतलं सायन्सला अॅडमिशन. पहिल्याच दिवशी पुस्तकाची साईज, सर्व काही इंग्रजीमध्ये बघून माङो डोळेच फिरले. अकरावी-बारावी कसाबसा कॉपी करून पास झालो. नंतर सीईटीला मार्क कमी पडले. मला खरं तर अॅग्रीकल्चर बिझनेसमध्ये खूप रस होता. पण लोक काय म्हणतील, घरचे ऐकणार नाहीत असं वाटून काहीच केलं नाही. एक वर्ष गॅप घेतला. जॉब केला. नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला. तीन वर्षात चांगला अभ्यास करून कॉपी न करता पूर्ण केला.
पण मनात अजूनही अॅग्रीकल्चरचं होतं. डिप्लोमा झाल्यावर सगळे घेतात म्हणून मीही इंजिनिअरिंग सेकंड इयरला प्रवेश घेतला. नापास झालो, ते होणारच होतं. पण मला आता प्रश्न पडलाय की किती दिवस हे असं चालवू? जे व्हायचं ते होवो, मी आता जे मनात आहे तेच करीन, इंजिनिअरिंग नको आता, मी शेतकरी होईन!
घरच्यांना गर्व वाटेल असा शेतकरी होऊन दाखवीन!
मन मारून जगणं नको आता!