किती जोरात हसताय?
By Admin | Updated: October 8, 2015 20:47 IST2015-10-08T20:47:16+5:302015-10-08T20:47:16+5:30
ऑफिसमधे तुम्ही हसता का? कसं हसता? - आता हा काय प्रश्न झाला.

किती जोरात हसताय?
ऑफिसमधे तुम्ही हसता का?
कसं हसता?
- आता हा काय प्रश्न झाला.
कुणी मोठमोठय़ानं हसतात, कुणी सतत हसतात. कुणी खदाखदा हसतात,
कुणी फोनवर बोलताना हसतात,
तर कुणी असे की हसतच नाहीत. कुणाला साधी स्माईलही देत नाहीत.
कुणी हसलं तरी हसत नाहीत.
म्हणजे काय तर काहींचं हे टोक, काहीचं दुसरंच.
पण आपलं हसणं हेसुद्धा जरा ‘बॅलन्स’ असावं..
त्यासाठी हे काही नियम.
1) तुमचा मूड असो नसो, ऑफिसमधे प्रसन्नच असलं पाहिजे. चेहरा पाडून बसायचं नाही.
2) कुणी स्माईल केलं तर आपणही हसून प्रतिसाद द्यावा. आपलं आणि त्या माणसाचं पटत नसलं तरीही.
3) मोठमोठय़ानं हसू नये. अकारण तर अजिबात हसू नये. जोरजोरात हसणं तर वाईटच.
4) त्यामुळे हसा, मनमोकळं हसा. मनापासून हसा. पण अति मोठय़ानं नाही आणि विनाकारण तर नाहीच नाही.
5) सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या हसण्यानं कुणालाही त्रस होऊ नये आणि कुणाचा अपमान होऊ नये, एवढी खबरदारी घ्यायला हवीच.
- मृण्मयी सावंत