शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कुणाचं पासबुक कुणाचे हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 06:45 IST

सरकार योजना ढीग काढेल. मात्र व्यवस्थेचं आरोग्य आतून सुंदर असावं याकडे लक्ष देत नाही. ते काम आपल्याला करावं लागेल. सरकार नावाच्या नोकरावर सगळंच सोडून चालणार नाही.

ठळक मुद्देबॅँकांचे साधे व्यवहार; पण त्यातही घोळ होत असेल तर तुम्ही काय करणार?

- मिलिंद थत्ते 

सरकारनं ठरवलं सगळ्यांची खाती बॅँकेत काढायची.काढायची म्हणजे काढायचीच. योजनांना चमचमीत नावं द्यायला सरकारला आवडतं. त्यामुळे नाव दिलं ‘जन धन’! बॅँकांनी रडत खडत का होईना दिली काढून झिरो बॅलन्स खाती. मग शिष्यवृत्तीचे पैसे, निराधार योजनेचे पैसे, पीकविम्याचे पैसे, रोजगार हमीची मजुरी असा नुसता पाऊस पडायला लागला त्या खात्यात ! पाऊस म्हणजे धो धो पाऊस नाही, तर मराठवाडय़ातला पाऊस बरं ! आला तर आला अवचित आणि तीही  पिरपिर! एवढं करून भागलं नाही. खात्यावर खाती. घरकुलासाठी नवराबायकोचं जॉइण्ट खातं, मजुरीसाठी सिंगल, पोरीच्या शिष्यवृत्तीसाठी आजून येगळं ! इतकी खाती की नवीन म्हण आली, कुणाचा पासबुक कुणाचे हाती राहिला नाही ! आमच्या एका पाडय़ातला नवश्याकाका पासबुकांची चळत घेऊन तालुक्याला येतो. तिथे तीन बॅँका, प्रत्येकीत लाइन लावतो अन् समदी पासबुकं ठेवून म्हणतो साहेब बघा यात पैसे आलेत का? पैसे आलेले नसतात, त्यातली दोन खाती बॅँकेने गोठवलेली असतात. तिसरी बॅँक त्याला सांगते, प्रतिनिधीकडे जा. प्रतिनिधी दुकान थाटून बसलेला असतो. तो काकाला सांगतो, तुझं खातं बंद झालंय, केवायसी कराय लागंल. मग त्याचे आधार, त्याचा अंगठा घेऊन प्रतिनिधी त्याचे गोठलेले खाते चालू करतात. त्यातले 1200 रु पये स्वतर्‍च्या खिशात घालतात. आणि नवीन खातं म्हणून जुन्याचाच एक कागद छापून देतात. काकाचा दिवस बुडलेला असतो, भाडय़ाचे पैसे गेलेले असतात, एका नवीन खात्यात खडखडाट ही कमाई असते. अशा घटना घडतात का तुमच्याकडं? मग काय करता अशा वेळी? बघत बसता? की एक साधा उपाय करता? आम्ही वयम् चळवळीचे कार्यकर्ते काय करतो ते तुम्हाला सांगतो. पटलं तर करून बघा.1. त्या काकाकडे पासबुक आहे का पहायचं. काकाला सांगायचं, बॅँकेच्या पासबुकात प्रत्येक व्यवहाराची एंट्री मारत जा. आणि बॅँक पासबुक देत नसेल तर प्रतिनिधीकडे होणार्‍या प्रत्येक व्यवहाराची पावती (स्टेटमेंट) मागत जा. 2. आमच्या काकाने हे केलं. पावती मागितली. तसे बँक प्रतिनिधी म्हणाला, पावतीला 20 रुपये लागतील. काका म्हणाला देईन; पण त्याचीही पावती लागेल मला. प्रतिनिधी म्हणाला जाऊदे, तुला म्हणून देतो फुकट पावती. काका पावती घेऊन आमच्याकडे आला. आम्ही वाचून दाखवले. त्यावर 1200 रु. काढल्याचं लिहिलं होतं आणि त्याला दिले 1100 रुपये. काका तडकून उठला आणि भांडून ते 100 रुपये घेऊन आला.3. मित्नांनो, आपल्या देशांतल्या लाखो काकांना आपल्याला बॅँक व्यवस्थेत त्यांची न्याय्य जागा मिळवून द्यायचीय. बॅँकेत तक्र ार करणं, व्यवहार समजून घेणं हा अधिकार प्रत्येकाला आहे. अशा किमान एका काकांना तुम्ही मदत करू शकाल ना? तेवढा दम आहे ना?4. सरकार योजना ढीग काढेल; पण सरकारचा आटा ढिला असतो. व्यवस्थेचा चेहरामोहरा सुंदर करण्यावर सरकार जितकं लक्ष देतं, तितकं व्यवस्थेचं आरोग्य आतून सुंदर असावं याकडे लक्ष देत नाही. ते काम आपल्याला करावं लागेल. सरकार नावाच्या नोकरावर सगळंच सोडून चालणार नाही.     (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)