समझ नहीं आता, आखीर पुछना क्या चाहते हो?- मुलाखतीला गेल्यावर असं होतं तुमचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:56 PM2019-12-12T15:56:23+5:302019-12-12T15:56:57+5:30

आत्मविश्वास आणि उर्मटपणा यात फार लहानसं अंतर असतं, त्याचं भान ठेवून आपल्या बलस्थानांविषयी प्रश्न मुलाखतकार विचारेल, असा प्रयत्न करा.

how to crack a interview? here is the secret | समझ नहीं आता, आखीर पुछना क्या चाहते हो?- मुलाखतीला गेल्यावर असं होतं तुमचं?

समझ नहीं आता, आखीर पुछना क्या चाहते हो?- मुलाखतीला गेल्यावर असं होतं तुमचं?

Next
ठळक मुद्देएका प्रश्नाच्या उत्तराचा शेवट तुम्ही कसा करता यावर पुढचा प्रश्न बव्हंशी वेळा अवलंबून असतो.

-डॉ. भूषण केळकर

मागील संवादात आपण मुलाखतीची यंत्रणा समजावून घेतली होतीच. आता आपण मुलाखतीची तंत्रं बघणार आहोत. 
पहिलं म्हणजे ज्याला एचआर  व तांत्रिक (टेक्निकल) असे दोन प्रकारचे इंटरव्ह्यू असतात. त्यात मूलभूत फरक आहे. तांत्रिकमध्ये अर्थातच तुमच्या विषयासंबंधीची माहिती खूप महत्त्वाची ठरते. परंतु त्यातही तुम्ही ती माहिती/उत्तरे ‘कशी’ देता यालाही महत्त्व असते. एचआर म्हणजे व्यक्तिमत्त्व व वागणुकीबद्दलची मुलाखत. यामध्ये तर तुम्ही उत्तरे ‘कशी’ देता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
आता तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, मुलाखत कशी द्यायची हेच नेहमीचं सांगताय का? तर नाही.
ती तुम्हाला खुर्चीत कसे बसा, कपडे कोणते घाला, टाय घाला किंवा वापरू नका अशा प्रकारच्या दुय्यम गोष्टींबाबत सांगून तुमचा वेळ घालवू इच्छित नाही!
त्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुमची मुलाखतीच्या वेळची उत्साही मनर्‍स्थिती आणि तुम्ही मुलाखतीत स्वतर्‍ रस घेणं हे फारच महत्त्वाचं असतं. 
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. उर्मटपणा आणि आत्मविश्वास यातील सूक्ष्म सीमारेषा समजलेली असणं फार महत्त्वाचं आहे.  ज्याला इंग्रजीमध्ये ‘हाउ यू कॅरी युअरसेल्फ’ असं म्हणतात. त्याची उत्तम जाणीव ठेवणं उत्तम!
सॉफ्ट स्किलमध्ये आपण सकारात्मक ( पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड)चं महत्त्व बघितलं आहे. एखाद्या  प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल तर ‘क्षमा करा, मला उत्तर माहीत नाही.’  एवढंच म्हणून थांबू नका. उलट म्हणा की, ‘मला आत्ता माहीत नाही, पण मी याचे उत्तर नक्की जाणून घेईन.’ हे नुस्त म्हणू नका आणि तसं खरंच वागायला  विसरू नका. यामध्ये तुमची सकारात्मकता तर दिसतेच, पण ‘शिकण्याची’ ऊर्मीपण (लर्न अ‍ॅबिलिटी) दिसून येते, जी महत्त्वाची असते. 
तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो. माझा जगभर हजारो मुलाखती घेऊन हा अनुभव आहे की, अशा काही मुलाखती झाल्यात ज्यात उमेदवारांनी सर्व उत्तरे ‘बरोबर’ दिली आहेत; पण त्यांची निवड झाली नाही. उलट ज्यांची काही मुलाखतीत 3-4 उत्तरे सपशेल चुकली आहेत तरीही त्यांची निवड झाली आहे. हे होण्याचं कारण कुठला तरी वशिला किंवा ‘हे कलयुग आहे’ असं नसून, त्या उमेदवाराने दिलेली बरोबर/चूक उत्तरे ‘कशी’ दिली आहेत हेपण महत्त्वाचं ठरतं. 
मुलाखतीत अजून एक महत्त्वाचं तंत्र म्हणजे स्वतर्‍ला ओळखून आपली बलस्थानं सहजगत्या आणि योग्य ठिकाणी मुलाखतीत सांगणं. समोरच्या पॅनलला नेमकं काय हवंय ते कळणं आणि ते त्यांना पटकन देता येणं, हे महत्त्वाचं. 2ं6ा व 263 अशा आणि करिअर क्लॉकसारख्या तंत्राचा वापर करून जसा रेझ्युमे उत्तम लिहिता येतो तसाच मुलाखतीतही त्यांचा वापर करता आला पाहिजे. 
अजून एक तंत्र म्हणजे आपल्या बलस्थानांच्या दिशेने मुलाखतीची दिशा वळवता येणं. हे तंत्र फार महत्त्वाचं आहे. एका प्रश्नाच्या उत्तराचा शेवट तुम्ही कसा करता यावर पुढचा प्रश्न बव्हंशी वेळा अवलंबून असतो. म्हणून उत्तराचा शेवट विशेषतर्‍ नीट विचारपूर्वक व सकारात्मक करणं गरजेचं आहे.
सामान्यज्ञान व विशेषतर्‍ ज्या कंपनीत/संस्थेत तुम्ही काम करू इच्छिता त्यांचा इतिहास, पाश्र्वभूमी इ. तुम्ही अभ्यासलेलं असणं महत्त्वाचं. प्रचलित घडामोडींचेही ज्ञान वर्तमानपत्रातून वाचलेलं हवं. 
हे सारं फार अवघड नाही. सरावानं येतंही. 
नव्या वर्षाला सामोरं जाताना मुलाखतीची यंत्रणा आणि तंत्र लक्षात ठेवा; मग 2020 मध्ये करिअरची 
20-20 व्हिजन तुम्हांला मिळेलच.
शुभेच्छा.!


 

Web Title: how to crack a interview? here is the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.