लिपस्टिक परफेक्ट शेड निवडाल कशी?
By Admin | Updated: February 5, 2015 18:25 IST2015-02-05T18:22:48+5:302015-02-05T18:25:00+5:30
दुकानात जा, सतराशे साठ लिपस्टिकच्या शेड्स मिळतात. मैत्रिणींच्या ओठांवरच्या शेड्सही खूप सुंदर दिसतात

लिपस्टिक परफेक्ट शेड निवडाल कशी?
लीना खांडेकर, ब्युटी एक्सपर्ट -
दुकानात जा, सतराशे साठ लिपस्टिकच्या शेड्स मिळतात. मैत्रिणींच्या ओठांवरच्या शेड्सही खूप सुंदर दिसतात. आणि तुम्हाला मात्र कळतच नाही की, आपल्याला कुठली लिपस्टिक चांगली दिसेल? काय लावलं तर आपला लूक बदलेल? आणि कुठली शेड परफेक्ट असेल आपल्यासाठी?
या अवघड प्रश्नाचं हे सोपं उत्तर हवं तर फक्त एवढं लक्षात ठेवा.
१) दिवसा उजेडी वापरायची असेल पिंक, बेबी पिंक, पीच, ब्राऊन, ब्राऊन ऑरेंज याच रंगाची लिपस्टिक लावावी.
२) लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर एखादा चांगला लिपबाम लावा. म्हणजे ओठ मऊ राहतात आणि लिपस्टिकही चांगली लागते.
३) ओठाला जास्त रेखीव आकार द्यायचा असेल तर लिपस्टिकला मॅचिंग लिपलायनर पेन्सिलने आधी रेखीव आकार ओठांभोवती कडेनं आखून घेणं उत्तम. त्यामुळं लिपस्टिक नीट लावता येते.
४) गोर्या मुलींनी गुलाबी राणी, ऑरेंज, पीच कलरची लिपस्टिक लावणं उत्तम.
५) मध्यम गव्हाळ वर्णाच्या मुलींनी पीच, पिंक, ब्राऊन कलर वापरावेत.
६) सावळ्या रंगाच्या मुलींनाही पीच, बेबी पिंक असे रंग वापरावेत.
७) आवडतात म्हणून लाल, मरून लिपस्टिक्स कधीही वापरू नयेत. फक्त संध्याकाळचे कार्यक्रम, इव्हिनिंग पार्टीसाठीच या शेड वापराव्यात. त्यावर साजेसे लीपग्लॉसही लावू शकतो. अन्य वेळी, ऑफिसला जाताना, कॉलेजात या कलरची लिपस्टिक लावून जाऊ नये. ते फार भडक दिसतं.