हेअर कलर निवडायचा कसा?
By Admin | Updated: September 11, 2014 16:54 IST2014-09-11T16:54:45+5:302014-09-11T16:54:45+5:30
लाल-पिवळा-हिरवा- तांबडा. नक्की कुठल्या रंगाचे केस मस्त दिसतात?

हेअर कलर निवडायचा कसा?
>नवरात्र जवळ येतंय, त्यापूर्वी आपल्या केसांचं काहीतरी करावं, अशी हुक्की अनेकांना येते. त्यात हेअर कलर करून घ्यावा, असं वाटू लागतंच. पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं की आणखी काही असं बरंच काही वाटतं.
हेअर कलर करणार असाल, तर तुमचा हेअर कलर निवडताना या काही गोष्टी नक्की चेक करा, लक्षात ठेवा.
तुमचा हेअर कलर नक्की परफेक्ट दिसेल!
तुमचा चेहरा कसाय, त्याचा आकार कसा आहे त्यानुसार कलर निवडायला हवा आणि त्याही आधी तुमचं व्यक्तिमत्त्व कसंय, तुम्ही काय काम करता, हे सुद्धा महत्त्वाचं. त्यानुसार रंग निवडा.
अनेक जण फॅशन कुठल्या रंगाची आहे ते पाहून रंग लावून घेतात. मात्र ट्रेण्ड प्रमाणं जाऊ नका, तुम्हाला कलर का करायचाय आणि कुठला रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देईन, हे तपासा. त्यासाठी कलर करणार्या एक्सपर्टशी बोला.
सेलिब्रिटी लावतात तेच कलर लावायचे असं अनेकांना वाटतं. ते कलर स्क्रिनवर चांगले दिसतात. प्रत्यक्षात चांगले दिसतीलच, असं नाही. असे कलर फार बोल्ड असतात. आपण लावले तर भयानक दिसू शकतात.
इंडियन स्किनसाठी खरं तर चेस्टनट कलर आणि डार्क चॉकलेट शेडचे मिक्स हा कलर चांगला दिसतो. तो फॅशनेबलही आहेच.
तुमचा रंग जर काळासावळा असेल, तर तुमच्या केसांची टोकं कलर करा.
भारतीय त्वचारंगाबरोबर फायरी रेड, कॉपर रेड, पर्पल या रंगांच्या शेड्स हायलाईट्ससाठी उत्तम दिसतात. स्ट्रिक्स, बन्र्ट हायलाईट्स या शेड्सनी करावं.
तुम्ही एकदम गोरेच असाल तर चॉकलेट, कॉपर ब्राऊन, हनी ब्लॉण्ड, खाकी ब्राऊन या रंगांच्या शेड्स वापराव्यात.
ज्यांचे ७0 टक्के केस पांढरे झालेले आहेत, त्यांनी हायलायलाईट्स करू नयेत. मात्र ज्यांना थोडा फॅशनेबल टच द्यायचाय त्यांनी ब्राऊन रंगाच्या शेड्स वापरून थोडंसं हायलायटिंग करावं. ते रंग सूर्यप्रकाशात चकाकतात, चांगले दिसतात.
गोर्या रंगाच्या व्यक्तींना स्ट्रिक्स करायच्या असतील, तर स्पायसी रेड, ब्ल्यू, सन गोल्ड या रंगांच्या फ्रण्ट स्ट्रिक्स, बॉटम हायलाईट्स कराव्यात.
सावळ्या रंगासाठी ग्लोबल कलर्स, महागनी, कॉफी, कॅरॅमल शेड्स स्ट्रिक्स मस्त दिसतात.
हेअर कलर तर उत्तम कराल पण त्यानंतर त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं. उत्तम कलर प्रोटेक्टिंग श्ॉम्पू आणि कंडिशनर वापरा. दर २५ दिवसांनी एकदा सलूनमधे जाऊन हेअर स्पा करून घ्यायला हवं, तरच हेअर कलर चांगले टिकतात.
- धनश्री संखे,
ब्युटी एक्सपर्ट