शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

घरचे म्हणतात म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:01 IST

आयआयटीची स्वप्नं डोळ्यात ठेऊन सीईटीच्या क्लासेससाठी दहावीनंतर आता फक्त मुलंच पुण्यात येत नाहीत, त्यांचे आईबाबाही येतात. रजा घेतात, नोकºया सोडतात आणि मुलाला हवी ती ब्रॅँच, हवं ते कॉलेज मिळावं म्हणून जिवाचं रान करतात..

‘ढ’ ची आई : अहो ‘ट’ ची आई, आमचा हा काल सांगत होता, ‘ट’ ने आयआयटीची ट्यूशन लावल्ये म्हणून.‘ट’ ची आई : हो. म्हणजे आत्ता आयआयटी असं नाही. आत्ता आठवीचंच शिकवणार; फक्त सायन्स, मॅथ्स जरा डीटेलमध्ये. पुढे बेसिक कन्सेप्ट्स खूप इंपॉर्टण्ट ठरतात ना म्हणून आत्तापासूनच जरा सुरुवात.‘ढ’ ची आई : आमच्या पोराचं काय अजून काही कळत नाहीये. सध्या तरी सकाळी स्विमिंग आणि संध्याकाळी फुटबॉल!‘ट’ ची आई : ते ठीके, पण पुढं काय करणार ते ठरवा..एकूण ‘ढ’ चं काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात. ‘ट’ च्या पालकांच्या ओळखीमधल्या एकानं त्यांचा मुलगा दहावीमध्ये इंजिनिअर होणार असं ठरवलं आणि त्यामुळे ‘ट’ च्या पालकांनी इयत्ता आठवीमध्येच ‘ट’ इंजिनिअर होणार हे ठरवलं.डोळे-कान उघडून आजूबाजूला पाहिलं तर अक्षरांच्या ऐवजी निरनिराळी नावं घेऊन साधारण असाच संवाद ऐकायला मिळतो. पालकच ठरवून टाकतात, मेरा बेटा इंजिनिअर बनेगा! काही हरहुन्नरी पालक तर आपला मुलगा तासन्तास लॅपटॉपसमोरून हलत नाही म्हणून त्याला कंप्युटर इंजिनिअर बनवायच्या मागे लागतात. काही आपल्या मुलाला १५ विदेशी गाड्यांची नावं माहीत आहेत यानं सुखावून त्याला मेकॅनिकल इंजिनिअर बनवण्याचं स्वप्न बघायला लागतात. बाकी बरेचसे, ब्रॅँचचं नंतर बघता येईल पण आधी इंजिनिअर व्हायचं म्हणून महागड्या क्लासेसच्या मागे लागतात.हे आहे महानगरांतलं आणि तिथून खाली सरकलेलं छोट्या शहरांतलं चित्र.जागतिकीकरणाचं वारं आलं आणि देशात अनेक बदल घडले. गेल्या जवळपास २६ वर्षांत शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र त्यासाठी करावा लागणारा खर्चही वाढला. स्वत:ला सिद्ध करायच्या संधी वाढल्या पण त्याचबरोबर स्पर्धा प्रचंड वाढली. हातात पैसा खेळू लागला पण विनियोगाचे मार्गदेखील वाढले. शहरांमध्ये नव्या नोकºया मिळू लागल्या, स्थलांतरं घडू लागली, शहरं गच्च भरून वाहू लागली. या सगळ्यात कुटुंबव्यवस्था बदलली. कुटुंबाचा आकार कमी होत नातेसंबंधांमध्ये आमूलाग्र बदल झाले. छोट्या कुटुंबामुळे मुलाच्या/मुलीच्या निर्णयांमधला पालकांचा सहभाग वाढला, अपेक्षा वाढल्या.त्यामुळे आपल्या मुलांना उत्तम इंजिनिअर बनवू असं म्हणत पालकांनी अनेक गोष्टी स्वत:वर ओढवूनही घेतल्या. त्यात अनेकांची विलक्षण फरफट होतेय. मुलांइतकंच किंवा त्याहून जास्त स्वत:ला अपडेट ठेवण्याचा रेटा आणि नोकरी-व्यवसायातले व्याप यांचे ताणही वाढलेले दिसतात. मात्र वेळप्रसंगी स्वत:चा नोकरीधंदा बाजूला ठेवून मुलांवर ‘फोकस’ करणारे पालक आजूबाजूला भेटतात.चैताली यंदा बारावीला जाईल. तिच्यासाठी तिची आई एक वर्ष रजा घेणार आहे. त्यांच्याशी बोललं तर त्या म्हणतात, ‘खरं तर अकरावीपासूनच रजेचं चालू होतं पण शक्य नाही झालं. यावेळी कसंही करून घेणार; म्हणजे घ्यावीच लागणार. हिला क्लासला सोडा-आणायला जा, वेळच्या वेळी खाणं-पिणं, सगळं बघायचं म्हणजे नोकरी करणं शक्यच नाही.’आता त्या चैतालीला इंजिनिअरिंगच्या क्लासला सोडून जवळच एका वाचनालयात विरंगुळा म्हणून वाचत बसतात. मग नंतर पुन्हा इथून दुसºया क्लासला. अशी अनेक उदाहरणं पुण्यात बघायला मिळाली.‘महत्त्वाचं वर्ष आहे त्यामुळे तेवढी अ‍ॅडजस्टमेंट करावी लागणारच की!’ - हे इथं अनेक पालकांचं पालुपद आहे.हेच मत सुमितच्या आईबाबांचं. ते मूळचे सांगलीचे. सुमितची नुकतीच दहावी झाली. आयआयटीचे क्लासेस एप्रिलमध्येच सुरू झाल्याने आई आणि तो या एप्रिलपासूनच पुण्यात राहायला आलेत. ‘इंजिनिअरिंगचं मार्गी लागेपर्यंत मी राहीन इथेच,’ असं त्याची आई म्हणाली. त्याचे अनेक मित्र पुण्यात आणि काही कोल्हापूरला दहावीनंतरच्या शिक्षणासाठी गेले आहेत. त्यातल्या अनेकांबरोबर त्यांचे पालकदेखील गेले आहेत. त्यामुळे मोठं शहर असो वा लहान; परिस्थिती थोड्याबहुत प्रमाणात सारखीच आहे. सगळ्यांनाच अशाप्रकारे पैसा आणि वेळ दोन्ही खर्च करणं शक्य होत नसलं तरी इंजिनिअरिंगसाठी शक्य ते सारं करण्याचा अट्टाहास मात्र आहेच.गेल्या काही वर्षांत, दरवर्षी लाखो मुलांचे आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांचे लोंढेच्या लोंढे या अभियांत्रिकी मांडवाखालून जात आहेत.अनेक पालकांशी तसेच मुलांशी बोलताना एक गोष्ट लक्षात येते. अलीकडे पालकांचा फार मोठ्ठा सहभाग अभियांत्रिकी शिक्षण आणि त्यातील शाखा निवडण्यामागे आहे. प्रथमेशचंही असंच झालं. त्याला अभ्यासात फारशी गती नव्हती. त्याच्या दादाने कंप्युटर इंजिनिअरिंग केलं. पुढे अभ्यासात त्याची मदत होईल या विचारानं प्रथमेशच्या घरच्यांनी त्याला कंप्युटर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेऊन दिली. दुसरीकडे घरचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे अनेक पालक मुलांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायला लावतात असंही चित्र आहे.मात्र असंही दिसतं की अनेक पालकांना त्या शाखेची, त्यातील शिक्षणाची फारशी माहिती नसते. तशीच ती मुलांनाही नसते. सध्या इंजिनिअरिंग करत असणाºया आणि करू इच्छिणाºया काही मुलांना विचारलं की, आपण इंजिनिअर व्हायचं, अमुकच शाखेतून व्हायचं हा निर्णय कसा घेतला?उत्तरं काय मिळाली?‘यात स्कोप आहे’, ‘बाकीच्यांपेक्षा ‘स्टेबल’ फिल्ड आहे’, ‘इंजिनिअरिंग केल्यावर कुठला ना कुठला जॉब मिळतोच. पहिला थोडा स्ट्रगल असेल, पण नंतर ‘ग्रोथ’ चांगली आहे इथे.’त्यातही अनेकांनी ‘घरचे म्हणतात म्हणून’ असंही उत्तर दिलंच.आणि म्हणून मग आईबाबा म्हणतात ते करून आपलं चुकलंच असं अनेकदा रोहन आणि प्रथमेशसारखं अनेक मुलांना वाटतं. आज रोहनचं शिक्षण पूर्ण होऊन दोन वर्षं झालेली आहेत. तो बाबांबरोबर पूर्णवेळ घरचा व्यवसाय बघायला लागला इतकंच. प्रथमेशने डिप्लोमा, नंतर डिग्री केली. एक वर्ष कशीबशी नोकरी केली आणि आता मन रमत नाही म्हणून नोकरी सोडून हताशपणे बसलाय.‘माझ्या मनासारखं लाइफ जगण्याच्या लायनीवर आणायला माझी पाच वर्षं गेली. अजूनही स्ट्रगल चालू आहे. कदाचित आधी काही गोष्टी कळल्या असत्या तर आज एवढी वर्षं लागली नसती असं वाटतं..’ - आज एका जाहिरात कंपनीमध्ये ‘व्हिज्युअलायझर’ म्हणून काम करणारा नीरज सांगत होता. इंजिनिअरिंगच्या मांडवाखालून तोही गेलाय.तो म्हणतो, इंजिनिअरिंग करून आपण पस्तावलो. आपल्याला भलतंच करायचं होतं हे सांगणारे कितीजण आहेत आज. ‘पाचवी, सहावी, मग सातवी स्कॉलरशिप, मग आठवीपासून क्लास-शाळा-क्लासचं चक्र , नववी, दहावी बोर्ड, मार्कांची रेस, मग सायन्स, अकरावी, बारावी बोर्ड, क्लासेस, सीईटी क्लास आणि मग इंजिनिअरिंग! लहानपण म्हटलं की हेच, हे तुला भीतिदायक आणि निराशाजनक चित्र नाही वाटत?’निराशा, पालकांविषयी राग, पालकांनी पैसा खर्च करून केलेली वणवण आणि त्यातूनही सर्वांनाच मिळालेली अस्वस्थता असं हे एक भीषण चित्र आहे..आणि त्याच्या पायाशी आहे, पैसा-सुबत्ता-प्रतिष्ठा देणारं एकच स्वप्न..मेरा बेटा इंजिनिअर बनेगा !

१. पालकच ठरवतात अमुकला स्कोप आहे, तिकडं मुलांना पळवतात.२. पुण्यात सहकुटुंब स्थलांतर करणाºया पालकांचं प्रमाण वाढलं. आई नोकरी सोडते, मुलाला क्लासला घेऊन जाते. हवं तेवढे पैसे मोजते, कारण एकच इंजिनिअरिंग क्रॅक करायचं.३. अनेक मुलांना माहितीच नाही, आपण इंजिनिअरिंग का करतोय?४. आठवीपासूनच इंजिनिअरिंगच्या तयारीला वेग. प्रत्यक्षात अनेकांचं उत्तर एकच, घरचे म्हणतात म्हणून करतोय!