Hot Job | हॉट जॉब
हॉट जॉब

- आॅक्सिजन टीम

डोकं आणि हात उत्तम चालवता येणा-यांसाठी कधी नव्हत्या अशा नव्या संधी..


समजा एखाद्या कंपनीला आपल्या नूडल्सची किंवा लोणच्याची जाहिरात करायची आहे, अशा वेळी कॅमेºयासमोर हे नूडल्स किंवा लोणचं अत्यंत आकर्षक दिसावं लागेल. वाफाळलेले, मऊ नूडल्स किंवा लालबुंद खाराचं लोणचं ‘बघताच’ प्रेक्षकांची भूक चाळवावी लागेल.
ज्यांचे फोटो काढायचे आहेत किंवा शूटिंग करायचं आहे, असे पदार्थ कॅमे-यासमोर आकर्षक दिसावेत म्हणून क्लृप्त्या लढवतो, त्यासाठीची क्रोकरी, रंगसंगती, आजूबाजूची सजावट हे सगळं ठरवतो, तो फूड स्टायलिस्ट!
पायल गुप्ता सध्याची लीडिंग ‘फूड स्टायलिस्ट’ आहे.

कोणती कौशल्यं लागतात?
१. स्वयंपाकाची आवड हवी.
२. कलेची आवड, रंगसंगती, रेषा, रुप, आकार यांची चांगली समज अत्यावश्यक.
३. अत्यंत तणावाच्या परिस्थितीत डोकं शांत ठेवून उत्तम काम करता येणं मस्ट!
४. जगभरातल्या फूड फोटोग्राफीचे बदलते टेÑण्ड्स, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्यातली प्रयोगशीलता याकडे बारीक लक्ष हवं.

नेमकं काम काय असतं?
उत्पादक कंपनी आणि त्यांच्यासाठी काम करणारी जाहिरात एजन्सी किंवा डिझायनर्स या दोघांच्याही कल्पनेतला अन्नपदार्थ त्याच रंगरुपात तयार करून आकर्षकपणे सजवून शूटिंगसाठी ठरल्या वेळेत उपलब्ध करणं हे मुख्य काम.
अनेकदा कॅमेºयासाठी लागणाºया प्रखर लाइट्सच्या उष्णतेमुळे अन्नाचा पोत बिघडतो (उदाहरणार्थ आइस्क्रीम वितळून जाणं). असं होऊ नये यासाठी युक्त्या लढवणं हेही फूड स्टायलिस्टचं काम आहे.
हवा तो रंग आणि पोत मिळण्यासाठी अनेकदा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवावे, सजवावे लागतात. आपण जे करू त्यात नावीन्य शोधावं लागतं.
कधी कधी १६-१७ तास खपून एखादी असाइनमेण्ट पूर्ण होते. कधी कधी रात्री उशिरापर्यंत शूट चाललेलं असतं. दुपारी केलेला, सजवलेला पदार्थ रात्री उशिरापर्यंत तसाच कसा दिसेल? त्याचं टेक्श्चर बदलतं. तेव्हा पुन्हा अवघ्या काही मिनिटांत पदार्थ करायची आणि सजवायची कसरत करावी लागते.
क्लायंटसाठी फूड स्टायलिस्ट हा एक जादूगार असतो. साध्याशा, नेहमीच्या पदार्थाला पाहताक्षणी घ्यावासा, खावासा वाटेल असं सुंदर रुप देण्याची जादू त्याला अवगत असावी लागते.

भविष्यात ‘स्कोप’ किती आहे?
सोबतच्या फोटोत दिसते ती पायल गुप्ता सध्याची लीडिंग ‘फूड स्टायलिस्ट’ आहे. पायल सांगते, ‘या अनोख्या करिअरच्या जगात मी काम सुरू केलं, तेव्हा आम्ही पाच-सहा जणच होतो. आता मुंबईतच ही संख्या अडीचशेच्या वर आहे. या करिअरमध्ये उत्तम पैसा आणि खूप संधी आहेत, कारण भारतीय लोक जसजसे जगभरात फिरू लागले आहेत, तसतशी त्यांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची, त्यांच्या मांडणी आणि सजावटीची ओळख होऊ लागली आहे. म्हणूनच आपल्याकडच्या जाहिरातीत दिसणारे पदार्थ, पेयं, मसाले, लोणची यांचं रुप किती बदललंय पाहा.

फूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. साध्या मसाल्यांचेच किती ब्रॅण्ड आहेत. प्रत्येक ब्रॅण्डला त्यांचा मसाला आकर्षक दाखवायचा असेल तर तो पदार्थ वेगळ्या आणि आकर्षक स्वरूपात दाखवणाºया फूड स्टायलिस्टची गरज लागणार आणि वाढणारच!’
अगदी सिनेमा, सिरियल्स, वेबसिरीज, खाद्यपदार्थांसाठीच वाहिलेली चॅनल्स, यू ट्यूब सिरीज अशा असंख्य क्षेत्रात यापुढे फूड स्टायलिस्टना संधी मिळेल.

ट्रेनिंग कुठे मिळेल?

फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना हा वेगळा मार्ग धरणं जास्त सोपं जाऊ शकेल.
बाकी आवश्यक स्किल्स असलेल्या कुणालाही या क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतील. फूड स्टायलिस्ट बनू पाहणाºयांनी सतत कुकिंगमध्ये प्रयोग करायला हवेत. त्याचे फोटो काढून बघायला हवेत. कारण साध्या डोळ्यांनी दिसणारा पदार्थ कॅमेºयाच्या डोळ्यातून वेगळा दिसतो. तो कॅमेºयाच्या डोळ्याला आकर्षक वाटेल असा बनवण्याची धडपड सतत करायला हवी.
फूड स्टायलिस्टला फक्त पदार्थ बनवता आणि सजवता येऊन चालत नाही, त्याला क्रोकरीचीही उत्तम जाण हवी.
 


Web Title: Hot Job
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.