होशवाला सेलिब्रेशन

By Admin | Updated: December 24, 2015 17:47 IST2015-12-24T17:43:48+5:302015-12-24T17:47:11+5:30

सेलिब्रेशची सुरुवात करणारा हा नवा आठवडा! जगण्यात उत्साहानं आनंदाचे रंग भरत जगणंच साजरं करणारा.

Hoshwala Celebration | होशवाला सेलिब्रेशन

होशवाला सेलिब्रेशन

 - ऑक्सिजन टीम

सेलिब्रेशची सुरुवात करणारा हा

नवा आठवडा!
जगण्यात उत्साहानं 
आनंदाचे रंग भरत
जगणंच साजरं करणारा.
त्या सेलिब्रेशनची
ही एक खास मैफल!
 
 
 
जुनं हातातून सुटत असतं,
आणि नवं अगदी नजरेच्या टप्प्यात येऊन उभं राहतं.
जुन्याचा हात हातातून सोडवत नाही, 
आणि नव्याशी शेकहॅण्ड करायची 
आतूर धडपड स्वस्थ बसू देत नाही, असे हे दिवस!
सेलिब्रेशनचेआणि हिशेबांचेही!
जे सुटून गेलं हातातून, जमलंच नाही,
असं बरंच काही या दिवसात छळतं, खूपत राहतं.
हे जमलं नाही, ते राहून गेलं,
तमकं तर निव्वळ आळस म्हणून केलं नाही,
अशी आरोपपत्रं स्वत:वर दाखलही केली जातात.
आणि त्या आरोपांपुढे बिनशर्त माफी मागून
लोटांगण घालणं आणि नव्या वर्षी असं मुळीच वागणार नाही 
म्हणत कान पकडणं, एवढंच तर आपल्या हातात असतं!
दरवर्षीप्रमाणं हेही आपण करतोच.
आणि मनावरचं ओझं एकदा खाली उतरवलं की,
नव्या वर्षाला भेटायला सज्ज होतो!
मनाशी घोकतो, बास्स! आता हा एवढाच शेवटचा आठवडा,
एक तारखेपासून असं काही शिस्तीत वागू की, बदल जाएगी जिंदगी!
बदलाची, बदलण्याची, उमेदीची  ही ऊर्जादायी प्रेरणा.
म्हणून या अंकात आहे ही खास सेलिब्रेशन पार्टी.
नवीन वर्षाच्या स्वागताचा एक वेगळा,
डोळस आणि होशवाला विचार!
आणि आज ख्रिसमस.
त्यानिमित्तानं ख्रिसमसचं एक सुंदर सेलिब्रेशनही!
तेव्हा भेटू,
पुढच्या वर्षी.
मेरी ख्रिसमस
आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!
 
 

Web Title: Hoshwala Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.