होला

By Admin | Updated: December 11, 2014 20:11 IST2014-12-11T20:11:00+5:302014-12-11T20:11:00+5:30

अनेकवेळा तुमच्या स्मार्टफोनवर अनोळखी नंबरवरून कॉल येतो किंवा सारखे- सारखे मिस कॉल येतात.

Holla | होला

होला

 

अनिल भापकर 
anil.bhapkar@lokmat.com - 
 
अनेकवेळा तुमच्या स्मार्टफोनवर अनोळखी नंबरवरून कॉल येतो किंवा सारखे- सारखे मिस कॉल येतात. अशावेळी तुम्ही त्या नंबरवर फोन केला असता बर्‍याचवेळा समोरून रिस्पॉन्स येत नाही. वैताग येतो, पण तुमच्याकडे गप्प बसण्याशिवाय काही पर्याय नसतो, यामुळे मानसिक त्रास तर होतोच, पण एखाद्या वेळेस तुम्ही खूप महत्त्वाच्या कामात असता किंवा गाडी चालवित असता अशावेळी तुम्ही काम सोडून किंवा गाडी थांबवून हा कॉल घ्यायला जाता तर तो अनेकवेळा स्पॅम कॉल असतो. अन्नोन् नंबरवरून मिसकॉल असतो. अशावेळी प्रचंड मन:स्ताप होतो. अशावेळी तुमच्या मोबाइलवर एखादे कॉलर आयडी अँप असावे, असा विचार येतो. त्यात पहिले नाव येते ते प्रामुख्याने ट्र कॉलरचे. आता मात्र ट्र कॉलरच्या जोडीने होला कॉलर आयडी अँण्ड ब्लॉक हे भारतीय बनावटीचे कॉलर आयडी अँपही तुम्ही वापरू शकाल.
निंबज या कंपनीने होला नावाने कॉलर आयडी सेवा नुकतीच सुरू केली आहे. ट्र कॉलरचा भारतीय अवतार म्हणून सध्या होलाकडे बघितले जात आहे. भारतात प्रिपेड धारकांसाठी हे सेवा महत्त्वाची ठरू शकते. कारण प्रिपेड मोबाइलवर येणार्‍या दहा कॉलपैकी चार कॉल हे अन्नोन् नंबरवरून आलेले असतात, त्या चार अन्नोन् नंबरपैकी एक कॉल हा स्पॅम असतो, असा दावा होला बनविणार्‍या कंपनीचा आहे. होला हे पूर्णपणे भारतीयांनी बनविलेले अँप असून, भारतातीलच तेरा तरुण डेव्हलपर्सनी ते बनवले आहे. 
होला काम कसं करतं ?
अन्नोननंबर शोधणं
होला या अण्ड्रॉईड अँपचे पहिले महत्त्वाचे काम म्हणजे तुम्हाला येणारे अन्नोन् कॉल कोणाचे हे शोधणं. होलाचा स्वत:चा असा फोन नंबरचा प्रचंड मोठा डेटाबेस आहे शिवाय दररोज हा डेटाबेस ते अपडेट करीत आहेत. याच अतिप्रचंड डेटाबेसचा वापर करून तुम्हाला येणारे अन्नोन् कॉल्स कोणाचे हे शोधण्याचं काम हे अँण्ड्रॉइड अँप करतं.
ब्लॉक अनवाण्टेड कॉल्स
कधी-कधी एखाद्या नंबरवरून तुम्हाला नेहमी कॉल येत असतात. काहीवेळा समोरच्याला कॉल करू नका, असं तुम्ही सांगू शकत नाही. त्यावेळी हे अँप तुम्हाला मदत करतं. नको असलेले कॉल ब्लॉक करण्याची सुविधा हे अँप देतं. त्याचप्रमाणे एखादा नंबर तुम्ही काही काळापुरता ब्लॉक केला, तर नंतर तो पुन्हा अनब्लॉकसुद्धा करता येतो. यासाठी मॅनेज ब्लॉक लीस्टमध्ये जाऊन तो नंबर तुम्हाला अनब्लॉक करावा लागेल.
स्मार्ट सर्च
होला अँपच्या टॉप मेनूमध्ये सर्च हे ऑप्शन आहे. यामध्ये कंट्रिकोडसह जो नंबर सर्च करायचा तो टाकला की, तो नंबर सर्च होतो. त्या सोबत त्याची अँक्टिव्हीटी हिस्ट्री म्हणजे यापूर्वी तुम्ही कितीवेळा बोलतात शिवाय आता कॉल करायचा, मेसेज पाठवायचा की तो नंबर ब्लॉक करायचा किंवा शेअर करायचा आदि अनेक ऑप्शन तुम्हाला मिळतात. 
सोशल अकाउंट सपोर्ट
तुमचा फोनबुक अधिक आकर्षक करण्यासाठी सिंक सोशल अकाउंट हे एक ऑप्शन यामध्ये आहे. हे अपडेट केल्यास तुमच्या फेसबुक आणि गूगल प्लस फ्रेंड्सचे प्रोफाइल, फोटो तुमच्या फोनबुकमध्ये अपडेट होतात, म्हणजे यापैकी कोणाचा कॉल आल्यास स्क्रीनवर त्याचा फोटोसुद्धा दिसतो.
९ मिसकॉल अलर्ट
जर एखादा कॉल मिस झाला, तर होला तुम्हाला त्या कॉलचे काय करायचे असा ऑप्शन स्क्रिनवर दिसतो.
 
 

Web Title: Holla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.