शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

HIt Refresh -हा मंत्र नव्या काळात का इतका महत्त्वाचा झाला आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 2:50 PM

एक डिग्री घेतली, झालं शिक्षण. एक नोकरी लागली, जमलं करिअर असं आता होणार नाही. कधी काम बदलेल आणि कधी नारळ मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यावर उपाय एकच.

ठळक मुद्दे.ताजा हो ले!

- विनायक पाचलग

जॉब कसा मिळवावा ही समस्या फक्त नुकतीच डिग्री घेतलेल्या फ्रेशर्सनाच असते असं नाही! सध्या नोकरी करणार्‍या प्रत्येकालासुद्धा ती असते. कधी कोणाला प्रमोशन पाहिजे असतं म्हणून तो नवा जॉब शोधत असतो, तर कधी कंपनीनं त्यांना ‘कागद टाका’ म्हणजेच नोकरी सोडा असं फर्मान दिलेलं असतं. अशावेळी अंगावर इएमआयचं ओझं असतं आणि समोर मात्न पटकन नवी नोकरी दिसत नसते. ही परिस्थिती सर्वात अवघड कारण. निदान नव्या लोकांना तरी असे काही आर्थिक व्याप नसतात सुरुवातीला. त्यांची शून्यापासून सुरुवात असते; पण करिअरच्या मध्येच असं काही झालं की परत नवी सुरुवात करणं टफ जातं, असा एकूण अनुभव आहे.या परिस्थितीचे अगदी अचूक वर्णन मायक्र ोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला यांनी केलं आहे. फक्त व्यक्तीच नव्हे तर संस्थांनापण कधी कधी अशी स्टॅग्नन्सी येते, पुढचा मार्ग स्पष्ट दिसत नाही. अशावेळी काय करायचं याचं उत्तर  नादेला देतात. ते म्हणतात, ‘हिट रिफ्रेश’. थोडक्यात काय तर जसं आपण संगणकाला रिफ्रेश कमांड देतो तशी आता स्वतर्‍लाही द्यावी लागणार आहे.  पण, रिफ्रेश व्हायचं म्हणजे काय करायचं? तर त्यात दोन-तीन गोष्टी येतात. 1. पहिलं म्हणजे लर्न टू अनलर्न’, म्हणजेच आपल्या डोक्यात ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या काही आपल्या धारणा आहेत. मग त्या आपल्या कामाबद्दल असोत वा आजूबाजूच्या जगाबद्दल किंवा स्वतर्‍बद्दल त्या आपल्याला पटकन सोडता यायला हव्यात. नव्या जगाच्या नव्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. याला कार्पोरेट भाषेत ‘आजाईल’ असं नाव आहे. त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असते की नव्या गोष्टी आपण पटकन शिकायला हव्यात. पद, वय, प्रतिष्ठा हे सारं त्याच्या आड येता काम नये. हे बोलायला सोपं असलं तरी करायला फार अवघड असते.2. यालाच जोडून अजून एक गोष्ट सध्या ‘इन’ आहे ती म्हणजे आपल्याला आपल्याहून 5 वर्षे वयाने लहान असा एकतरी मेंटर असायला हवा. कारण आज दर 5 वर्षाने पिढी बदलते. प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा स्मार्ट असते. आज मोठय़ा मोठय़ा एम एन सीचे सीइओ हा फॉम्यरुला वापरत आहेत.  हा प्रत्येकाला वापरता येणं शक्य आहे. आपला छोटा भाऊ, मित्न किंवा एखादी ओळखीची व्यक्ती हा आपला असा न कळत मेंटर होऊ शकतो. फक्त असा माणूस पटकन पारखायला हवा. ती नजर असायला पाहिजे इतकेच.3. पण असे बदल करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ ऐकायची क्षमता’. एखादी गोष्ट शांतपणे ऐकून घेणं हे आजच्या कोलाहलात अवघड झालं आहे. आज एकतर आपण लगेच वाद घालायला लागतो, प्रतिक्रिया देतो किंवा ‘माझंच कसं खरं’ म्हणतो, नाहीतर मग ऐकून न ऐकल्यासारखं करतो. आजूबाजूला एवढा कण्टेंट आदळत आहे की त्यामधून नक्की शांतपणे ऐकणं हे स्किलच आपण विसरलो आहोत. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू, एखाद्या माणसाचा वेगळा अँगल जर का आपण नीट ऐकू लागलो तर स्वतर्‍ला अपग्रेड करणं खूप सोपं जातं. आजच्या जगात कोणालाच सगळं माहीत नसतं, जे ज्याला माहीत आहे त्याच्याकडून ते ऐकायला काहीच हरकत नाही हे मनापासून मान्य केलं की मग ‘रिफ्रेश’ बटन दाबणं खूप सोपं जातं.मध्यंतरी एक रिपोर्ट आला होता की नव्या जगात एका माणसाला त्याच्या आयुष्याच्या 40 वर्षात कमीत कमी 7 वेळा नोकरी किंवा प्रोफेशन बदलावं लागेल. आणि तसं होणार असेल तर मग आपल्याही आयुष्यात ‘रिफ्रेश’ बटन दाबणं मस्ट आहे. आणि त्यासाठी आतापासून तयारी करणंही गरजेचं आहे.

(विनायक मुळात इंजिनिअर असून, आता एक स्टार्टअप कंपनी चालवतो)