दिल डिजिटल डिमाण्ड
By Admin | Updated: March 17, 2016 22:07 IST2016-03-17T22:07:40+5:302016-03-17T22:07:40+5:30
तुम्ही आॅनलाइन पडीक असता, तर तिकडे करता काय?
_ns.jpg)
दिल डिजिटल डिमाण्ड
आॅनलाइन तुम्ही का जाता? तिथे काय बघता? काय वाचता? काय काय आणि का फॉरवर्ड करता? आणि तिथे तुम्हाला सारखं खेचून नेणारं ‘कडक’ आणि ‘लय भारी’ असं नेमकं काय असतं? तुमचं तरुण दिल आॅनलाइन जाऊन डिजिटल दुनियेकडून नेमकी कसली डिमाण्ड करतंय...?
ते शोधण्यासाठी मदत म्हणून एक प्रश्नावली प्रसिद्ध करतो आहोत.
उत्तरं खरीखुरी द्या.
हे करून तुम्हाला काय मिळेल?
तमाम तरुण-तरुणींच्या आॅनलाइन वाचनाच्या सवयीची एक मस्त, कुणालाच माहिती नसलेली गोष्ट.. आणि हो, तुम्ही इतरांपेक्षा वेगळं, अधिक खरं असं काही सांगताय असं जाणवलं तर आम्ही तुमच्याशी अधिक गप्पा करायला फोन/ईमेल करू! आणि मग तुम्हाला ‘आॅक्सिजन’मध्ये झळकण्याची संधीही मिळूनच जाईल!
या पानावर छापलेली प्रश्नावली पूर्ण भरून तुम्हाला पोस्टाने आमच्याकडे पाठवता येईल. ‘लोकमत’च्या वेबसाइटवर जाऊन आॅनलाइन भरलीत, तर फारच मस्त!!
- पण हे पटापट करा मात्र!
- आॅक्सिजन टीम