गाईज, जस्ट Shut up

By Admin | Updated: June 19, 2014 21:59 IST2014-06-19T21:59:18+5:302014-06-19T21:59:18+5:30

आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?

Guy, Just Shut up | गाईज, जस्ट Shut up

गाईज, जस्ट Shut up

>आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?
-----------
ऑनलाइन बोलघेवडेपणा कमी करत, जगण्याला खर्‍या आनंदाचा ‘चार्जर’ लावावा का?
 
भारतातले तुमच्या आमच्यातलेच ९0 %तरुण रोज रात्री आपला फोन उशाशीच घेऊन झोपतात.
त्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्यावर असं वाटतं की, आपली झोपच पूर्ण झालेली नाही.
उशिरा उठलं तरी आळस जात नाही.
रात्री फोन व्हायब्रेट झाल्यानं,फॉरवर्ड अँप्स येऊन पडल्यानं झोपमोड झालेली असते
हे मात्र सहजी कुणी कबूल करत नाहीच.
**
आकडेवारी उपलब्ध नाही पण संडासात मोबाइल घेऊन जाणार्‍यांची आणि तिथं बसून चॅट करणार्‍यांची संख्या आपल्या देशात झपाट्यानं वाढते आहे.
**
मोबाइल अँडिक्ट असणार्‍यांची संख्या गेल्या वर्षभरात या देशात फक्त १२३ % वाढली आहे. 
गेल्या वर्षी मार्च २0१३ मध्ये आपल्या देशात ७ कोटी ९0 लाख मोबाइल अँडिक्ट होते. 
यंदा म्हणजे मार्च २0१४ मध्ये त्यांची संख्या आहे, १७ कोटी ६0 लाख
**
खोटं वाटेल पण या देशातले ६0 % तरुण एसएमएस आणि अँप्स मिळून दिवसाला सरासरी फक्त १२५ एसएमएस /अँप्स एकमेकांना पाठवतात
**
आपल्यातले ८0 % तरुण असे आहेत जे  दर सेकंदाला आपला मोबाइल चाचपून पाहतात.
एखादा तरी नवीन एसएमएस,  नवीन अँप येऊन पडला असेल अशी त्यांना आशा असते.
आणि नसला तर.?
चिडचिड होते,  ते मनात म्हणतात, बोगस लोक, नाही त्या वेळेस धडाधड अँप मारतील, 
आणि आता पाच मिण्टं झाले तरी कुणीच काहीच सेण्ड केलेलं नाही.
-हे असं का होतंय त्यांचं?
 
 
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
 

Web Title: Guy, Just Shut up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.