शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

टॅलण्ट + कौशल्य यांना 'ह्या ' गोष्टीची  जोड देताय तुम्ही? देत असाल  तर  जिंकाल .. नाहीतर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:32 IST

काय एकाच ठिकाणी एकाच जागी चिकटून बसलाय नोकरीत? काय एकच काम वर्षानुवर्षे करतोय? काय एकाच गोष्टीच्या मागे लागलाय जीव तोडून? स्विच का मारत नाहीस? - असं तुम्हाला कुणी विचारलंच, किंवा कितीही अडचणी आल्या तरी डोळ्यासमोरचं ध्येय सोडू नका. कारण यशातच त्याचा वाटा मोठा असतो.

ठळक मुद्देनकारात्मक, निराशावादी आणि कठीण काळांत टिकून राहणं महत्त्वाचं.

- जुई जामसांडेकर,

स्थळ : कोणतेही इंजिनिअरिंग/पदवीधर कॉलेज.कॉलेजचा साधारण डिसेंबर आणि मे असा वर्षातील दोन वेळा परीक्षेचा काळ असतो आणि त्याआधी काही दिवस हे पीएलचे असतात. सगळा अभ्यास त्या पीएलमध्येच करणो अपेक्षित आहे नाहीतर तुम्ही इंजिनिअर कसले? हा प्रश्न वारंवार ऐकायला मिळतो. अर्थात हा वेळ इतका कमी असतो की, त्यात परीक्षेपुरता जरी अभ्यास झाला तरी खूप झालं. याला आपण क्रायसिस मॅनेजमेण्ट म्हणूया यशस्वी व्हायचं असेल तर फक्त टॅलेण्टचीच गरज आहे आणि ते असेल तर तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही. आणि टॅलेंट जर नसेलच तर बाकी काही करून उपयोग तरी काय? असा सार्वत्रिक समज कॉलेजमध्ये आहे. पण असं जर असतं तर फक्त अत्यंत हुशार असणारे लोकच यशस्वी झाले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सारख्या प्रमाणात हुशार असणारे लोकं सारख्याच प्रमाणात यशस्वी झाले असते. पण या दोन्ही गोष्टी आपल्या आजूबाजूला पाहण्यात येत नाहीत. म्हणजेच हुशारी सोडून अजून काहीतरी आहे जे आपल्या यशस्वी होण्यात मोलाची भूमिका बजावतात.आता कल्पना करा की तुम्ही प्रायव्हेट कंपनीत काम करत आहात  आणि तुम्हाला तिथे काम करून नुकतीच 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता भविष्याचा विचार करताना तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी कुठला प्रश्न येतो? बहुतेकांचं उत्तर असं आहे की, कंपनी बदलणं, स्विच मारणं. काही वैध कारणं सोडता एका ठिकाणी साधारण दोन वर्षापेक्षा जास्त राहणं म्हणजे जणू एकतर त्या व्यक्तीला दुस:या गोष्टी जमत नाहीत अथवा बाहेर त्या व्यक्तीसाठी दुस:या संधी उपलब्ध नाहीत असे नाहक संशय घेतले जातात. सारखी नोकरी बदलत राहणं नाहीतर वेगवेगळ्या गोष्टी फक्त एक्सप्लोरच करत राहणं हे त्या व्यक्तीच्या यशात/भरीव कामगिरी करण्यात कितपत परिणाम करत असतील? टॅलण्ट आणि अॅपॉच्यरुनिटी सोडून असं काय आहे की, ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती बाकीच्यांपेक्षा जास्त यशस्वी होते? याचा एक निर्धारक सेल्फ-कंट्रोल म्हणता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर, सेल्फ कंट्रोल म्हणजे समोर कितीही आकर्षणं, मोहमाया असली तरी आपले लक्ष, भावना आणि वर्तन त्या मोहापायी न वळवणं.आणि दुसरा महत्त्वाचा निर्धारक म्हणजे ग्रिट! जगप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट अँजेला डकवर्थच्या मते तुम्ही कुठल्याही क्षेत्नात असा, कुठलेही काम करा, यशस्वी होण्यासाठी सर्वासाठी एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ग्रिट!ग्रिटला आपण चिकाटी आणि आवड यांचं संयोजन म्हणूया. वरवर सारखेच वाटणारे सेल्फ-कंट्रोल आणि ग्रिट हे वस्तुत: एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. फक्तच सेल्फ कंट्रोल असणारी व्यक्ती मोहापायी विचलित होणार नाही; पण सातत्याने एकाच ध्येयामागे लागेल का हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, वजन कमी करायचं ठरवल्यानंतर समोर जंक फूड आल्यावर सेल्फ-कंट्रोल असणारी व्यक्ती ते खाणार नाही; पण ती व्यक्ती वर्षानुवर्षे वजन कमी करणं यावर सातत्याने काम करेलच असे नाही. याउलट, ग्रिटी व्यक्ती हेच ध्येय समोर ठेवून वर्षोनुवर्षे निश्चयाने त्यासाठी काम करेल.टॅलेण्ट, आयक्यू, तुमची सद्यपरिस्थिती या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; पण त्या असणं हे कुणाच्या हातात नाही. त्या जन्मत: मिळालेल्या आहेत, काही काळार्पयत ठरावीक मर्यादेर्पयत त्या वाढतात. पण ग्रिट नक्कीच वाढते!  वाढवता येते!Achievement = Talent + Effort‘एफर्ट’ हे यशाची सखोलता, योग्य दिशा आणि कालावधी याचं फंक्शन आहे. प्रत्यक्षात असं दिसतं की, एफर्ट्सला-कष्टांना-प्रयत्नांना खूपच कमी लेखले जातं.आपण ते पहिल्या उदाहरणातही पाहिले. गोल्स अर्थात ध्येय, त्यामध्ये सातत्य आणि एकाच ध्येयासाठी सातत्याने काम करणं हे कमी ऑबियन आहे/याचं प्रमाण कमी आहे/अशी उदाहरणो कमी आहेत.आपल्याकडे एकूणच मेहनत करण्याला कमीपणाचं समजलं जातं.मी निर्माण सोबत काम करते. आपलं टॅलण्ट आणि कौशल्यं वापरून समाजातील विविध प्रश्नांवर अनेक तरु ण निर्माणी काम करत आहेत. अशा तरुणांसोबत काम करताना एक गोष्ट समजते ती म्हणजे सामाजिक प्रश्नावर काम करताना ग्रिट खूप मोठी भूमिका बजावते नाहीतर ते काम फक्त तात्पुरती सोशल अॅक्टिव्हिटी उरते.सुदैवाने सामाजिक क्षेत्नांत ग्रिट वापरणा:या व्यक्ती बघायला मिळतात. कुठल्याही क्षेत्नात मास्टरी प्राप्त करण्यासाठी त्यांत सलग किमान 10-12 वर्षे सतत मेहनतीने काम करावं लागतं. पॉङिाटिव्ह सायकॉलॉजीचे भीष्मपितामह डॉ. मार्टिन सेलिगमन यांच्या रिसर्चवरून हे सिद्ध झालेलं आहे.म्हणूनच आता पुढच्यावेळी जेव्हा तुमच्या आजूबाजूला कुणी ‘काय हार्ड वर्क करतोय उगीच?’ असं तुम्हाला कुणी म्हणोलही तेव्हा किंवा अडचणी आल्या म्हणून काम थांबवू, बंद करू असं तुम्हाला वाटेल तेव्हा ग्रिट हा शब्द, चिकाटी, सातत्य लक्षात ठेवा.

 ***

अँजेलाचे ग्रिटविषयीचे बरेच शोधनिबंध संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातले काही महत्त्वाचे निष्कर्ष ..* ग्रिटीअर व्यक्ती या सारख्याच वयाच्या नॉन-ग्रिटीअर व्यक्तींपेक्षा जास्त उच्च शैक्षणिक पातळी पूर्ण करतात.* ग्रिटीयर व्यक्ती खूप कमी वेळा जॉब बदलतात.* ग्रिटची पातळी वयानुसार वाढते.* अगदी उत्तमोत्तम युनिव्हर्सिटीजमध्येसुद्धा ग्रिट असलेल्या पदवीधर विद्याथ्र्याचा स्कोर जास्त आहे.

 

ग्रिट वाढवण्यासाठी काय करता येईल?*  ग्रिट वाढवण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही सद्यस्थितीत कुठे आणि का आहात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.* सतत सरावाने आणि स्वयंशिस्तीने दिवसेंदिवस तुम्ही कामाचा दर्जा वाढवू शकता “Whatever it takes, I want to improve.”

* लांब पल्ल्याच्या उद्देशाशिवाय आवड दीर्घकाळ टिकणं अशक्य आहे. म्हणून कुठलेही काम फक्त स्वत: पुरतं मर्यादित न राहता ते इतरांना मदत होईल असं असावं.“My work is important - both to me and to others.”

* तुमच्या कामामध्ये कायम उत्कृष्ट दर्जाच्या संदर्भाचा (पुस्तके, व्हिडिओ, रोल मॉडेल्स) वापर करा.* तुमच्या अर्थपूर्ण प्रवासात मधेमधे स्वत:चं परीक्षण करत राहा.* जीवनातील मार्गदर्शक तत्त्वं आणि मूल्यं ग्रिट वाढवण्यास मदत करतात.* नकारात्मक, निराशावादी आणि कठीण काळांत टिकून राहणं महत्त्वाचं.