ग्रीन टीचा होतो प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम

By Admin | Updated: July 12, 2016 15:46 IST2016-07-12T15:36:45+5:302016-07-12T15:46:05+5:30

ग्रीन-टी प्यायला अनेकांना आवडतं. काहीजण तर स्टाईल मारतच सांगतात की, मी फक्त ग्रीन टीच पितो.

Green Teach Contains Fatal Impact on Fertility | ग्रीन टीचा होतो प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम

ग्रीन टीचा होतो प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम

>- रवींद्र मोरे 
ग्रीन-टी प्यायला अनेकांना आवडतं. काहीजण तर स्टाईल मारतच सांगतात की, मी फक्त ग्रीन टीच पितो. आतापर्यंत आपल्याला हेच माहित होतं की, ग्रीन-टी साधारण चहाच्या तुलनेने आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे, मात्र एका नव्या संशोधनानुसार असं लक्षात आलंय की ग्रीन टीच्या सततच्या सेवनाने प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाएका समुहाने  माशांवर केलेल्या एका प्रयोगातून असं आढळून आले की, ग्रीन-टीच्या जास्त खपानं तिचा विकास आणि प्रजनन क्षमता प्रभावित झाली आहे. 
फार्मास्युटिकल सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक महताब जाफरी सांगतात की, ‘ग्रीन-टीच्या योग्य सेवनाने आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो, मात्र अति सेवन आरोग्यासाठी खूपच घातक होऊ शकते. अर्थात  कोणताही ठोस निर्णय देण्याअगोदर अजून आम्हाला या संशोधनावर खूप काम करायचे आहे, मात्र सल्ला असा आहे की, अती प्रमाणात सेवन करणं टाळा.

Web Title: Green Teach Contains Fatal Impact on Fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.