शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

दशभुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 08:49 IST

सुंदर पिचाई हे गुगलचे प्रमुख. त्यांना बहुधा लहानपणी अनेक आघाड्यांवर लढणारी आई आठवत असेल! म्हणून त्यांनी एक अफलातून गोष्ट आणली. आता आॅर्डर सोडायचा अवकाश ती गोष्ट फोनवर अनेक कामं करायला हजर!

- भूषण केळकरलेखक आयटी तज्ज्ञ आहेत.bhooshankelkar@hotmail.com

‘आई, मला शाळेचा डबा दे!’‘परवाच हॉटेलचं विचारून पक्कं करून टाक फोनवर!’‘सुटीतली आपली ट्रिप- त्याचं बुकिंग करायचंय!’- सर्व दिशांनी केल्या जाणाऱ्या या मागण्यांवर घरोघरच्या आया एक वाक्य (आपल्या भाषेत, आपापल्या देशात) म्हणतात..‘अरे मी एकटीच आहे आणि मला दोनच हात आहेत. एकावेळी मी किती काम करणार?’कॅलिफोर्नियातून मागील आठवड्यात निघालो तेव्हा गुगलची google I/o 2018 ही कॉन्फरन्स होती. सुंदर पिचाईने या आपल्या इंडस्ट्री ४.० वरच्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित नवीन तंत्रज्ञान जाहीर केलं. एकाचं नाव आहे गुगल ड्युप्लेक्स. सुंदर पिचाई हा गुगलचा प्रमुख. त्याला बहुधा लहानपणाची भारतातली अनेक आघाड्यांवर लढणारी त्याची आई आठवत असेल! या ‘गुगल ड्युप्लेक्स’मधे तुम्ही आज्ञा दिलीत की तुमचा फोन आपोआप लावला जाईल. अपॉर्इंटमेंट घेतली जाईल. बुकिंग केले जाईल. अगदी नेहमीच्या फोनसारखं! आहे की नाही भारी? ‘मला दोनच हात आहेत’ म्हणणाºया आईला आता अजून हात मिळाले बघा! जणू दशभुजाच !‘गुगल लेन्स’ या नव्या प्रणालीमध्ये किंवा ‘गुगल मॅप्स’मध्येसुद्धा आता इंडस्ट्री ४.० मधले अजून दोन महत्त्वाचे घटक अंतर्भूत झाले आहेत. आपण आतापर्यंत रोबॉटिक्स व्हीआर/एआर, क्लाऊड, बिग डाटा, बॉट्स, सायबर सिक्युरिटी, थ्रीडी प्रिंटिंग मॅन्युफॅक्चरिंग हे घटक बघितलेत. गेल्या काही लेखांमधे या लेखात आणि पुढील काही लेखात आपण एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी म्हणजे इंटरनेट आॅफ थिंग्ज हे इंडस्ट्री ४.० चे उरलेले पण महत्त्वाचे घटक बघू.हे दोन्ही घटक स्वतंत्ररीत्या पण समजावून घेता येतील आणि एकत्रितरीत्यासुद्धा. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा अधिक प्रमाणात सॉफ्टवेअरशी संबंधित तर आयओटी हे अधिक हार्डवेअर/भौतिक गोष्टींकडे झुकलेले आहे. अर्थात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारित आहेत हे सहज समजण्यासाठी मी उदाहरण देतो.अमेरिकेतल्या एक घराचे उदाहरण घेऊ. अ‍ॅनिसोना हे राज्य कमालीचं गरम असतं. कोणी आॅफिसमधून निघालं असेल आणि घरी पोहोचेपर्यंत ए/सी चालू नसेल तर भट्टी होईल एवढं गरम. तर हा घरी जायला निघाल्याचं, गाडी चालू झाल्यानं आणि मोबाइलच्या लोकेशनवरून कळलं, की आयओटीमधील घरचा तपमापक हे मोजेल की घरी भट्टी आहे, गार करणं आवश्यक आहे. आॅफिस ते घर हा नेहमी लागणारा वेळ, आता असणारं ट्रॅफिक यातील ताळमेळ लावून, घरच्या या मालकाला नेहमी किती तपमान आवडतं ही माहिती वापरून, कूलर केव्हा चालू करायचा व किती तपमानाला आणायचा, किती वेळात हे ठरवणार, हा सगळा भाग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). अर्थात मधे बिग डाटा, क्लाइड इ. लागेल बरं का. आता ते एकदा एआयनी ठरवलं की प्रत्यक्ष कू लरचं सेटिंग करणं, बटणं चालू होणं हा भाग परत आयओटी आणि त्याच्या मागची संगणक प्रणाली प्रोग्राम, त्यातलं पृथक्करण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तसं प्रोग्राम/ संगणक प्रणाली हा भाग गेली ६० वर्षे आहे, पण मानवी मेंदूसारखं काम करू शकणारा संगणक म्हणजे एआय.तुमच्यापैकी काही विद्यार्थी, शिक्षक हे संगणकावर प्रोग्राम लिहित असाल. त्यातले यम-नियमांचा तुम्हाला कंटाळासुद्धा येत असेल तर तुमच्यासाठी छान बातमी आहे. स्वर चौधरी या भारतीय माणसाच्या Bayou नावाच्या कंपनीने टेक्सासमधील राईस युनिव्हर्सिटीमध्ये एआय बेस्ड कोडिंगची यंत्रणा काढली आहे. तुम्ही फक्त तुम्हाला काय करून हवंय त्याचे काही सांकेतिक शब्द द्यायचे की तुम्हाला झटक्यात संगणक प्रणाली कम्प्लीट कोड लिहून मिळेल! भारी ना?अजून एक भारतीय- पराग हवालदार. त्याने २०१७ चं आॅस्कर अवॉर्ड फॉर टेक्नॉलॉजी मिळवलं. त्यात त्यांनी एआय व मानवी भावनांवर आधारित हावभाव देणाºया अ‍ॅनिमेशनवर सोनी पिक्चरसाठी काम केलं होतं. मी तर वाचलं की गेल्या आॅस्कर अवॉर्डचे विजेते कोण असतील हे एआयनी ९४ टक्के अचूकतेने सांगितलं होतं.काय सांगू राव, हेच एआयवालं सॉफ्टवेअर कर्नाटक निवडणुकीत वापरायचं राहून गेल्याची हळहळ मात्र वाटली!!