चेहर्‍याला तकाकी

By Admin | Updated: November 20, 2014 17:55 IST2014-11-20T17:55:56+5:302014-11-20T17:55:56+5:30

तुकतुकीत आणि टवटवीत त्वचेसाठी काही ‘मस्ट’ गोष्टी

Glance of face | चेहर्‍याला तकाकी

चेहर्‍याला तकाकी

आपली त्वचा तुकतुकीत दिसत नाही, ग्लो जातोय, पुरळ, पिंपल्स, काळे डाग हे तर नेहमीचेच प्रश्न. त्यात सतराशेसाठ फंडे चांगल्या स्किनसाठीचे. त्यातलं नेमकं आपल्याला काय सूट होईल हे कळत नाही. आपल्याबरोबर आपल्या त्वचेचा ग्लोही वाढत जावा म्हणून काही करता येईल का, असा प्रश्न पडतोच ! सुंदर-तुकतुकीत-चमकदार त्वचेसाठी आपण घरच्याघरी बरंच काही करू शकतो.

च्आत्ता आपण तरुण आहोत, आत्ताच कशाला त्वचेची काळजी घ्यावी. असं अनेकांना वाटतं. ते चूक 
आहे. टीनएजपासूनच आपण आपल्या त्वचेची काळजी 
घ्यायला सुरुवात करायला हवी.
- चेहर्‍यावर पिंपल्स, पुरळ, फोड, चेहर्‍यावरच्या त्वचेवर बारीक ओरखडे हे सारं जेव्हा सुरू होतं त्याचकाळात त्वचेला जपायला हवं. फ्रुट क्लिनप, टीनएज फ्रेण्डली  फेशियल्स नियमित करायला हवेत. दर २२ दिवसांनी एकदा फेशियल-क्लिनप करायला हवं.
 
- आपल्या आहारातून लोह म्हणजेच आयर्न पुरेसं मिळतं आहे की नाही, हे तपासायला हवं. ज्यातून लोह मिळतील अशी फळं म्हणजेच सफरचंद खायला हवं. बिटही खाता येईल. व्हिटॅमिन- सी साठी आंबट चवीची फळं खाता येतील.
 
- त्वचेवरची छिद्र अर्थात रंध्र उघडी पडणं, हे वाढत्या वयाचं लक्षण. तसं होऊ नये म्हणून चांगल्या दर्जाचे पीएच बॅलन्स टोनर नियमित वापरा.
 
- तुम्ही नियमित व्यायाम केला तर ही रंध्र उघही पडत नाहीत, ते करा.
 
- स्मोकिंग करत असाल तर ते तातडीनं बंद करा.
 
- त्वचा घट्ट रहावी म्हणून आंघोळीच्या पाण्यात अरोमा तेल टाकता येईल. 
 
- त्वचेची उत्तम देखभाल केली तर तुमची त्वचा कायम तुकतुकीत,  टवटवीत दिसेल.
 
- धनश्री संखे  ब्यूटी एक्स्पर्ट

Web Title: Glance of face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.