मुलीही अॅडिक्ट

By Admin | Updated: October 1, 2015 18:10 IST2015-10-01T18:10:46+5:302015-10-01T18:10:46+5:30

फक्त तरुणच नाही तर तरुणींमध्येही वाढतेय तसलं काही पाहण्याची चटक.

Girls too addicted | मुलीही अॅडिक्ट

मुलीही अॅडिक्ट

 फक्त तरुणच नाही तर

तरुणींमध्येही वाढतेय
तसलं काही पाहण्याची चटक.
 
‘तसलं’ बघण्याचं प्रमाण फक्त तरुणांमध्ये जास्त आहे, तरुणींच्या गावीही ही सगळी भानगड नसते असा एक सर्वसाधारण समज.
मात्र वास्तव तसं नाही. ‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत आणि ई-मेलमध्ये अगदी खेडय़ापाडय़ातल्या मुलामुलींनी सांगितलं की, काही मुलीही सर्रास तसले व्हिडीओ पाहतात. आणि ‘तसल्या’ क्लिप्सची देवाणघेवाण फक्त मुलांमध्येच होते असं नाही तर मुलींमध्येही होते. मुलींमध्येही आपापसात तसल्या क्लिप्स मोठय़ा प्रमाणात फिरतात. अनेकदा त्यांचे मित्रच त्यांना हे सारं पुरवतात.
विशाखा सांगते, ‘माङो काही मित्र पोर्नोग्राफी बघायचे, मला ते समजल्यावर आपणही ते सारं काय असतं हे एकदा बघावं असं कुतूहल वाटलं. मी गूगल सर्च केल्यावर भसाभस साइट्स समोर येऊन पडल्या. त्यातलं काय बघावं आणि  काय नाही काहीच कळत नव्हतं. हळूहळू लक्षात आल खास स्त्रियांसाठीच्या साइट्सपण असतात. आम्ही काही मैत्रिणी जमून तसलं बरंच काही बघू लागलो.’
 
यासंदर्भात अनेक मुलींशी बोलल्यावर कळलं की ‘तसलं काही’ पाहण्याची त्यांचीही काही कारणं आहेत. 
नैसर्गिक उत्सुकता हा तर मुद्दा होताच; पण त्याचबरोबर वाढत्या वयाबरोबर शरीरातून निर्माण होणा:या अगणित स्पंदनांना प्रतिसाद म्हणूनही त्यातल्या अनेकजणी पोर्नोग्राफीचा आधार घेत होत्या. तर काहींचं म्हणणं होतं की, लगAाआधी काही गोष्टी समजून घ्यायला त्याचा उपयोग होतो.
तिचं म्हणणं कितीही खरं असलं तरी मुली पोर्नाेग्राफी बघतात हे सारं एकीकडे असं सुरू असतानाच मुलींच्याही हाती स्मार्टफोन आले. त्या स्मार्टफोनमुळे सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या. त्यासाठी निराळा वेळ आणि कारणं काढण्याची आवश्यकताच उरली नाही. आणि ज्या मुलींना ‘तसं’ काही पहायचंय त्या कुणाला काहीही न सांगता ते सारं बघू लागल्या. 
मात्र मुली असं काही बघत असतील यावर विश्वास ठेवायला मात्र अजून समाज तयार नाही. तसं पाहता, सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू या व्यसनांसारखं हे व्यसनही सगळ्याच व्यक्तींच्या शरीराला आणि मनाला घातक आहे. स्त्रियांनी केलं तर जास्त हानी पोचते आणि पुरु षांनी केलं तर कमी असं काही असत नाही. पण ज्यावेळी या सगळ्या व्यसनांचा संबंध स्त्रियांशी येतो तेव्हा व्यसनातून बाहेर पडण्याची चर्चा करण्यापेक्षा संस्कृती रक्षणाशी त्याचा संबंध जोडला जाऊन मूळ प्रश्नच मागे पडतो. वस्तुस्थिती मान्य करण्यापेक्षा भीती घालण्याकडे कल वाढला की घोळही वाढतो. 
तरुणींच्या आयुष्यातल्या या नाजूक विषयाचंही असंच काहीसं  झालं आहे. 

Web Title: Girls too addicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.