एक मुलगी दोन चाकं

By Admin | Updated: October 15, 2015 17:55 IST2015-10-15T17:55:59+5:302015-10-15T17:55:59+5:30

आपलाच देश पाहायचा म्हणून सारे समाजनियम तोडून एकटीनंच बाइकवर प्रवास करणारी एक पाकिस्तानी मुलगी. ज्या देशात महिलेवर हजारो बंधनं तिथं हे सीमोल्लंघनाचं धाडस झेनीथनं केलं कसं?

A girl two wheels | एक मुलगी दोन चाकं

एक मुलगी दोन चाकं

झेनीथ इरफान.
पाकिस्तानातल्या लाहोरची. वीस वर्षाची मुलगी.
तिचे वडील आर्मीत होते. ती जेमतेम दहा महिन्यांची असताना त्यांचं निधन झालं. पण मोठं होताना त्यांचं एक स्वपA ङोनीथबरोबर मोठं होऊ लागलं. त्यांना जग पाहायचं होतं, खूप फिरायचं होतं, प्रवास करायचा होता.
ङोनीथच्या मनात त्या इच्छेनं घर केलं होतं. तिच्या आईनं एकटीनं दोन मुलांना, म्हणजे ङोनीथ आणि तिच्या भावाला वाढवलं. ङोनीथ बारा वर्षाची होईर्पयत सारं कुटुंब शारजात होतं. तिथलं जग वेगळं आणि पाकिस्तानातल्या लाहोरचं जग वेगळं. पण तरीही कुठलेच समाजनियम, मुलगी म्हणून जगण्याची बंधनं यांनी ङोनीथच्या स्वपAांना बेडय़ा ठोकल्या नाहीत.
बारा वर्षाची असताना ङोनीथनं पहिल्यांदा बाइक चालवली होती. बाइक, तिच्यावरून बुंगाट जाणं, कानात वारं भरणं, तो वेग आणि त्या वेगाची नशा हे सारं ङोनीथनं अनुभवलेलं होतं. आणि तिच्या डोक्यातही एक विचार सुरू होता की, समजा आपण बाइकवरूनच जग पाहायला गेलं तर?
अर्थात जग पाहण्याचं स्वप्न खूप मोठं होतं आणि सध्याच्या परिस्थितीत आवाक्याबाहेरचंही. पण मग तिनं ठरवलं की, आपण निदान आपला देश का पाहू नये? बाइकवरून प्रवास करत निदान आपल्या देशाचा नितांतसुंदर असा उत्तर भाग का पाहून येऊ नये?
तिनं आईला विचारलं. आईचा पाठिंबा होताच. पण पाकिस्तानात कुणा मुलीनं असं डोंगराळ, अति उत्तर भागात जाणं, तेही बाइकवरून हे तसं धाडसाचं होतं. एकतर रस्ते फारसे चांगले नाहीत, त्यात समाज नजरा, एकटय़ादुकटय़ा मुलीनं असं फिरणं समाजाला मान्य होणं शक्य नव्हतं.
पण तरीही ङोनीथनं ठरवलं की हा प्रवास करायचाच. आणि बाइकवरून सात दिवसांच्या प्रवासाला ती 14 जून रोजी निघाली. साधारण तीन हजार किलोमीटर अंतर तिला कापायचं होतं आणि पाहायचा होता आपल्याच देशाचा आजवर न पाहिलेला पहाडी भाग !
ती लाहोरहून निघाली. पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डर्पयतचा हा प्रवास तिला एकटीनं बाइकवर करायचा होता. मुख्य म्हणजे ङोनीथसाठी हा प्रवास म्हणजे एक सरसकट रोड जर्नी नव्हती, तर बाईनं मोटारसायकल चालवणं हेच जिथं मान्य नव्हतं, कमी लेखलं जात होतं तिथं ‘स्वतंत्र’ असण्याची एक खूण म्हणून हा प्रवास तिला करायचा होता. 
अर्थात सोपं नव्हतंच हे. प्रवासात अनेक नजरा तिच्याकडे ‘पाहत’ होत्या. रस्ता नसलेल्या वाटांवरून, डोंगरातून, पहाडातून आणि लांबच लांब सुनसान भागातून बाइक चालवणं तुलनेनं सोपं होतं, पण त्या नजरांचा सामना अवघड होता. ङोनीथ सांगते, ‘पाकिस्तानी महिला म्हणून आजही आमच्यावर अनेक बंधनं आहेत. तोंड उघडण्यापूर्वी विचार करायला लागतो. मी माङो शब्दच नाही तर बॉडी लॅँग्वेजही अत्यंत जपून वापरत होते. सारा विचार, सारी कॅलक्युलेशन्स करत मी घर सोडलं आणि बाइकला किक मारली !’
पाठीवर सारं सामान बांधून ती निघाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. ङोनीथ सांगते, ‘या प्रवासापूर्वी मला वाटायचं की, मला माझा देश माहिती आहे. पण या प्रवासानं मला ख:या अर्थानं माङया देशाची ओळख करवली.  मला ग्रामीण भाग दिसला, तिथल्या माणसांचं जीवन दिसलं. आणि एकटीनं जगताना माणसं किती आपुलकीनं विचारपूस करतात हेही जाणवलं. खरं सांगायचं तर हा प्रवास म्हणजे मला माङयासाठी एक वरदान वाटला.’ 
हा प्रवास म्हणजे एका गावाहून दुस:या गावाला बाइक चालवत जाणं नव्हे, तर हा प्रवास म्हणजे स्वत:लाच शोधत जाणं. रोज उठून बदलणा:या भावना, उमजणारं जग, भेटणा:या गोष्टी या सा:या आपल्याबरोबर प्रवास करत राहतात. माणसं ओळखीपाळखीची नसतात, पण तरी त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी कनेक्ट आहे असं सारखं जाणवत राहतं. पूर्वी कधी न भेटलेली माणसं जन्माची ओळख असावी तशी तुम्हाला मदत करतात, अगत्यानं विचारपूस करतात आणि त्यातून जे मैत्रीचे धागे विणले जातात, हे सारं सांगणंही सोपं नाही, आणि समजणंही! जे प्रवासात घडतं, ते प्रवासातच उमजतं हेच खरं ! जाहीर नहीं कर पाती मैं, पर एक तरह का सुकून दिया इस सफरने मुङो !’
तिला विचारलं की, तुङया या प्रवासानं तुलाच नाहीतर पाकिस्तानात अनेकींना प्रेरणा दिली स्वत:च्याच मर्यादांना चॅलेन्ज करत मनासारखं जगण्याची असं नाही वाटतं?
ती म्हणते ‘तसं असेल तर आनंदच आहे. कारण आमच्याकडे अजूनही अनेकांना वाटतं की, आपल्या बायकोनं, बहिणीनं चार भिंतींच्या आतच राहावं. घरातल्या कुणी महिलेनं असं बाइक चालवतं फिरणं सहजी मान्य होण्यासारखं नाही. तरीही आता गोष्टी बदलताहेत. अनेक भाऊही आपल्या बहिणींना मदत करताहेत. माझा भाऊ माझा आधारस्तंभ होऊन उभा राहिला म्हणून मलाही हे जमलं ! आहिस्ताही सही कुछ बदलेगा, ऐसा लगता तो है !’
ङोनीथ एक गंमत सांगते तिच्या सा:या मित्रमैत्रिणींना, ज्यांनी कधी प्रवासच केला नाही अशा दोस्तांना! ‘कल्पना करून पाहा, तुम्ही थकला आहात, गुडघे दुखताहेत. आणि मग तुम्हाला वाटतंय की, तरुणपणीच फिरून  घ्यायला हवं होतं. पहाड बोलावत होते तेव्हा जायला हवं होतं. छोटं का होईना साहस करून पाहायला हवं होतं. त्याक्षणी स्वत:ला कसं फेस कराल?’
प्रवास करण्याचा ‘परफेक्ट टाइम’ असं काही नसतंच. हा जो क्षण आहे, तोच परफेक्ट आहे. त्यामुळे रुटीनचं चक्र थांबवा आणि छोटा का होईना, जो बोलावतोय तो प्रवास नक्की करा. कदाचित त्यातून तुम्हाला दुस:या कुणाच्या नाही तर निदान स्वत:च्या तरी हाका ऐकू येतील !
त्याच हाकांना ओ देत ङोनीथ आता अधिक पुढच्या साहस प्रवासाला निघणार आहे.
आणि तिची थीम आहे, वन गर्ल, टू व्हील्स
- ऑक्सिजन टीम 

Web Title: A girl two wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.