गरब्याचा फेर साल्साची गिरकी
By Admin | Updated: October 8, 2015 21:06 IST2015-10-08T21:06:28+5:302015-10-08T21:06:28+5:30
काउण्टडाउन सुरूझालंय. पाच दिवसांनी वाजायला लागतील आता ढोल. आणि सजतील गरब्याच्या, दांडियाच्या रात्री.

गरब्याचा फेर साल्साची गिरकी
काउण्टडाउन सुरूझालंय.
पाच दिवसांनी वाजायला लागतील आता ढोल.
आणि सजतील गरब्याच्या, दांडियाच्या रात्री.
त्या गिरक्या, त्या उडय़ा, ते ताल आणि तो माहौल.
दिवस उजाडला की डायरेक्ट संध्याकाळच व्हावी असं वाटायला लावणारे दिवस.
त्या दिवसांची अशी वेडी ओढ ज्यांना लागते,
ते मात्र आत्ताच तयारीला लागलेत.
***
गेल्या काही वर्षात गरबा-दांडिया बदलला.
इतका की, त्याचा ‘इव्हेण्ट’ झाला.
ैत्याला ग्लॅमर आलं, भपका आला
आणि पैसाही आला.
्रआणि हे सारं होत असताना दांडिया खेळणारेही बदलले.
त्यांच्यासाठी दांडिया खेळणं हे फक्त ‘नाचण्यापुरतं’ उरलं नाही,
त्यापेक्षा बरंच काही आता यानिमित्तानं घडतं आहे.
स्वत:ला अनेक जण त्यातून शोधताहेत,
क्रेझी होताहेत
आणि ट्रायआउट करण्याच्या नादात
स्वत:च्या चौकटीतून बाहेर पडण्याचाही प्रय} करताहेत.
***
त्या प्रय}ाचा भाग म्हणून तर गरब्याच्या शिकवण्या हाऊसफुल्ल होताहेत.
इतक्या वर्षात कुणी गरबा शिकायला असं ‘क्लास’ लावून जात नव्हतं,
पण गेल्या तीन-चार वर्षात क्लासेस सुरू झाले.
ते पारंपरिक गरबा शिकवू लागले.
पण आता तो पारंपरिक गरबा शिकणारे कमीच.
आता शिकवण्यांना जाणारे शिकताहेत
साल्सा गरबा, हीपहॉप गरबा, झुंबा गरबा
त्याला म्हणतात फ्युजन गरबा!
***
तो कशासाठी?
तर अनेकांना त्या वेस्टर्न डान्सप्रकाराचीही क्रेझ आहेच.
पण नाचताना जास्त एन्जॉय करायचंय.
कुणाला व्यायाम करून मनावरची आणि शरीरावरची चरबी कमी करायची आहे,
कुणाला रिलॅक्स व्हायचंय,
कुणाला स्वत:च स्वत:वर घातलेल्या बंधनातून बाहेर पडत नाचायचंय, मनसोक्त!
आणि कुठंकुठं कार्पोरेट टीम बिल्डिंगचा भाग म्हणूनही सारी टीम एकमेकांशी ताल जुळवून गरब्याचा फेर धरतेय!
***
प्रत्येकाची कारणं वेगळी.
पण आज गरब्याची इव्हेण्टी तयारी मात्र
अनेक पॅकेजेस विकतेय.
कुणी डान्स पॅकेज, तर कुणी मेकप, ड्रेसेस पॅकेज.
नऊ दिवस सलग गरबा खेळायला जायचं म्हणून
जी काही जद्दोजहद करताहेत तरुण मुलं,
ती नेहमीच्या वर्षापेक्षा वेगळी आहे.
त्यासाठी ब्यूटिपार्लर आणि युनिसेक्स सलोनच्या
अपॉईण्टमेण्ट आताच बुक झाल्या आहेत.
***
गरबा ग्लोबल होतोय.
आणि त्यातला आनंद जगण्यासाठी अनेकांनी ‘शिकवणी’ लावली आहे.
त्याच ट्रेण्डची या अंकात चर्चा.
आणि या सा:या माहौलचा तुम्ही भाग असाल तर
तुमचा ‘लूक’ ठरवण्यासाठी ‘चकटफू’
मदतीच्या काही ट्रेण्डी आयडियाही.
उलट पान.
- ऑक्सिजन टीम