शिकायचं म्हणून नोकरीतून ‘गॅप’, पैसे कमवायचे म्हणून शिकण्यातून ‘गॅप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:45 PM2019-01-10T14:45:40+5:302019-01-10T14:49:28+5:30

हवं ते शिकायचं म्हणून नोकरीतून गॅप घेणं, शिक्षणासाठी पैसे साचवायचे म्हणून गॅप घेऊन नोकरी करणं, सेवाक्षेत्रात पडेल ते काम करणं असं करणारे तरुण नक्की काय करत असतात?

'Gap' in job as a learner, 'Gap' by learning as to earn money! | शिकायचं म्हणून नोकरीतून ‘गॅप’, पैसे कमवायचे म्हणून शिकण्यातून ‘गॅप’!

शिकायचं म्हणून नोकरीतून ‘गॅप’, पैसे कमवायचे म्हणून शिकण्यातून ‘गॅप’!

Next
ठळक मुद्देटेढ़ा हैं, पर मेरा हैं!

प्राची  पाठक 

आजकाल सभोवार कुठेही नजर टाका. 
काय करत आहेत तरुण मुलंमुली? 
सगळीच मुलं काही मेरिट होल्डर्स नसतात. डॉक्टर, इंजिनिअर या ठरावीक क्षेत्रांचं आकर्षण कोणाला असतं, कोणाला नसतंही. तसं अनेकजण स्पष्ट सांगतात.
नेहमीच्या दोन-चार स्ट्रीम्सपलीकडे खूप काही वेगवेगळं मुलं-मुली करताना दिसतात. एकदम कडेकोट भिंत घातल्यासारखं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं फारसं विद्यापीठांमध्येही आता सुदैवानं राहिलेलं नाही. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकतात.
विचार करा का केली असेल शिक्षणसंस्थांनी ही नवीन सोय?
कारण या शिक्षण क्षेत्रातल्या वॉटर टाइट भिंती चुकीच्या आहेत, हे त्यांच्याही लक्षात येत चाललं आहे. बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते, हे त्यांनी समजून घेतलं. किमान काही विद्यापीठं तरी विविध शाखांचे विषय शिकायची सोय शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच देऊ लागली आहेत. डिस्टन्स लर्निगमध्येसुद्धा खूप मुलं मुली असतात. काही ऑनलाइन कोर्सेस घरबसल्या करतात. त्यांच्यामुळे आधीच्या शिक्षणाला व्यवसायाभिमुख जोड देता येते. कोणी विविध कला प्रकारांमध्ये करिअर करायचं ठरवतात.
‘आधी नोकरीचं काय ते बघा आणि मग असली थेरं करा’, हे डायलॉग्ज कमी झाले नसले तरी जरात यांचा टोन कमी झाला आहे. विविध प्रकारचे करिअर करून चांगली कमाई करणारी काही यशस्वी उदाहरणं तरी आजूबाजूला दिसू लागली आहेत.
हेच पहा ना, नृत्य प्रकार म्हणजे मुलींचं क्षेत्र आणि खेळांमध्ये मुलगेच जास्त, असंही आता फारसं राहिलेलं नाही. पुरुषांच्या डान्स अकॅडमी असतात. ते पूर्ण वेळ या कामात असतात. त्यातही देशी-विदेशी अनेक नृत्य प्रकार असतात. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये मुलं भाग घेतात, तरुण मुलं काय नाचतात म्हणून लोक दाद देतात. त्याला आता जिम इंडस्ट्रीची जोडसुद्धा मिळते. डाएट कौन्सिलर्स, जिम इन्स्ट्रक्टर म्हणून कितीतरी तरु ण मुलं मुली पूर्णवेळ या प्रोफेशनल सेवांमध्ये कार्यरत असल्याचं दिसतं. मनापासून ते हे काम एन्जॉय करणारे भेटतात. मिळणार्‍या मोबदल्याबद्दल समाधानी असतात. पुढच्या संधींविषयीही बोलतात. त्यासाठी नवनवीन काही गोष्टी शिकतात. अपडेट तर राहावंच लागतं म्हणतात.
नोकरीच्या ज्या संधी पूर्वी अस्तित्वातच नव्हत्या, अशा अनेक संधी सध्या तरुण मुलामुलींना  उपलब्ध आहेत. कॉल सेंटर्स तसे जुने झाले; पण सव्र्हिस इंडस्ट्री झपाटय़ानं वाढली. मोबाइल गॅलरी, त्यांचे कस्टमर केअर विभाग, ऑनलाइन मार्केटिंग,  वेगळ्या ब्रँडचे आउटलेट्स, मॉल्स, ऑनलाइन फुड कंपन्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेव्हल्सच्या पोस्ट्सवर तरुण मंडळी काम करत असतात. त्यातले सगळेच काही एकदम वॉटर टाइट अशा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा शिक्षणातून आलेले नसतात.
युनिसेक्स सलूनमध्ये स्टायलिस्ट म्हणून काम करणारे, ड्रेस डिझायनर्स, बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्समध्ये दिसणारे तरुण, वेगवेगळ्या स्टार्टअ‍ॅप इनिशिएटिव्हमध्ये असणारे तरुण यांच्याशी बोललं तर वेगळंच जग कळतं. कोणी फिशरी सायन्समध्ये करिअर करत असतं. कोणी डिझाईन, गेमिंग आणि  इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये असतं. कोणी एथिकल हॅकिंगमध्ये असतं, तर कोणी ब्रॅण्डिंग, मार्केटिंग आणि कण्टेण्ट रायटिंगमध्ये असतं. कोणी समजून उमजून शेती करायला घेतं. हेल्थ केअर सेक्टरमध्ये केवळ नर्सेसच दिसतात असंही नाही. केअर टेकर म्हणून तरु ण मुलांना त्यात खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. नर्सिग शिकून सिस्टर सारखंच ब्रदर होणं हा पर्याय तर आता जुना होत आला इतके तरुण नर्सिग इंडस्ट्रीत दिसू लागले आहेत.
आजच्या मुलांना सर्व काही इन्स्टंट हवंय, शरीर कष्टाची कामं नकोत, असा सहजच शिक्का मारण्यासारखं आता काहीही उरलेलं नाही, हाही एक नवीन बदल आहे. आजूबाजूच्या वातावरणात इतकी वेगवेगळी अट्रॅक्शन्स असताना कमवा आणि शिका ट्राय करणारे, कॉलेजेसच्या सुटीत पार्टटाइम जॉब करणारे असे वेगवेगळे ट्रेण्ड्स तरु ण मुलांच्या करिअरमध्ये दिसायला लागले आहेत. 
टेढ़ा हैं, पर मेरा हैं असाच अप्रोच या जनरेशनचा आहे. सरळ रस्ते सोडून जरा वळणावळणानं जातात; पण हवं ते करून पाहतात, हे किती आशादायी आहे!

Web Title: 'Gap' in job as a learner, 'Gap' by learning as to earn money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.