शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

गेमिंगचा नाद लागलाय ? त्यात करिअर होऊ शकतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 2:55 PM

गेमिंग/हॅकिंग/अ‍ॅप्स मेकिंग या करिअरच्या वाटा आहेत हे कुणाला खरं वाटलं असतं? -तरुण मुलांना वाटतं !

ठळक मुद्दे गेमिंगचा नाद लागून बारावीत टप्पा खाल्लेला आर्य पुढे कुठे गेला? - थेट लंडन!

प्राची  पाठक 

आर्य. बारावीचं वर्ष म्हणजे कफ्यरु असतो घरांमध्ये. अभ्यास एके अभ्यास. आयुष्यातले हेच एकमेव महत्त्वाचं वर्ष आहे अशा सुतकी वातावरणात अनेक घरं असतात. आर्य बारावीत कॉलेजला जरूर जात असे; पण कॉलेज झाल्यावर गेमिंग कॅफेमध्येही खेळायला जात असे. काही दिवस गेल्यावर त्याच्या आईच्या त्याची ही सवय लक्षात आली. त्या स्वतर्‍ समुपदेशक. त्यांनी त्याला समजावून सांगितलं. पण आर्य गेमिंगच्या विश्वात पुरता रमला होता. समजावून सांगितल्यावरही ऐकत नाही म्हटल्यावर पुढच्या वेळी आईनेच आर्यला गेमिंग कॅफेसाठी म्हणून काही पैसे काढून दिले. तो आर्यसाठी टर्निग पॉइंट ठरला. आईच्या या कृतीमुळे आपला नेमका कल काय आहे, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, किती वेगळं आणि केअरिंग कुटुंब आपल्यासाठी आहे, याची लख्ख जाणीव त्याला झाली.तेव्हापासून पुढचा गेमिंगचा प्रवाससुद्धा पालकांच्या सोबत गेमिंगच्या विविध पैलूंची चर्चा करत सुरू झाला. आर्यने स्वतर्‍च गेमिंगच्या विश्वाची भरपूर माहिती काढली. गेम स्टडीज, गेम डिझाइन, गेम आर्ट, गेम डेव्हलपमेंट असे अनेक पर्याय त्यातसुद्धा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. करिअर हे अंतिम ध्येय नसून ती एक प्रोसेस असते, हे आर्यने समुपदेशक आईकडूनच जाणून घेतलं. बारावीत गेमिंगमध्ये पुरता बुडलेला असल्यानं आर्य एका विषयात नापास झाला होता. पण हा निकाल हातात यायच्या आधीच त्याला घरून समंजस साथ मिळालेली होती. एरवी जे व्यसन म्हणून पाहिलं गेलं असतं ते गेमिंगचं विश्व ‘यात काहीतरी शिकता येईल, आपला ओढा तिकडे आहे’, या स्पष्टतेपर्यंत येऊन पोहचलं होतं.एरवीच्या भाषेत ज्याला वर्ष वाया जाणं म्हणतात, तसं न होता आर्य आता गेमिंग या फिल्डमध्येच विद्यार्थी म्हणून दाखल झाला होता. सतत गेम्स खेळतो, तर शिकू गेमिंगच असा उतावळेपणा त्यात नव्हता. तो एक समजून उमजून घेतलेला निर्णय होता. वेगवेगळ्या अ‍ॅण्टिटय़ूड टेस्ट्स मधून पार पडून. त्यामुळे आर्यचं पुढचं शिक्षण गेम स्टडीमध्येच सुरू झालं. त्यात एक वर्ष पूर्ण केल्यावर त्यानं लंडनला गेम डिझायनिंगला अ‍ॅडमिशन घेतली. तोवर तो बारावीतला एक राहिलेला विषयसुद्धा चांगल्या गुणांनी पास झालेला होता.करिअर हा अंतिम टप्पा नसतो, तर ती एक प्रोसेस असते, हा अनुभव या वळणावर त्याला परत आला. आपल्याला गेम डिझायनिंगपेक्षा गेम स्टडीजमध्ये जास्त रस आहे, ते एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. स्पेसिफिक असं फिल्ड त्यानं आता निवडलं होतं.विशेष म्हणजे आपल्या मुलाचं वर्ष वाया तर जात नाही ना यावर कपाळावर मोठ्ठी आठी घेऊन वावरण्यापेक्षा आपला मुलगा कोणत्या मानसिक टप्प्यावरून जातोय, याबद्दल सजग असलेल्या पालकांनी याही वळणावर त्याला साथ दिली. आर्य आता गेम स्टडीजवर फोकस करतो आहे.करिअर आकाराला येईलही; पण महत्त्वाचं काय, तर आपल्या आवडीनिवडीवर नीट विचार करून त्यात काही शिकणं. त्यासाठी घरची साथ मिळणं. स्वतर्‍ माहिती काढणं, धडपड करणं. इनिशिएटिव्ह घेणं! वेगळ्या वाटेने धडपड करणार्‍या मुलांना घरून अशी साथ मिळतेच असं नाही. आपल्याला माहीतच नसलेल्या आणि पूर्णतर्‍ वेगळ्या अशा फिल्डमध्ये करिअर करायचं स्वप्न बघणार्‍या मुलाच्या पाठीशी उभं राहणं, त्याला उगाच आंधळ्या मायेनं न गोंजारणं, अशी दुहेरी कसरत पालकांनासुद्धा करावी लागते. म्हणूनच या टप्प्यावर आर्य आणि त्याच्या पालकांनी कमावलेली स्पष्टता फार महत्त्वाची आहे. करिअरची ही प्रोसेस तो मनापासून पार पडताना दिसते, ते म्हणूनच! अर्थात आर्य हा अपवाद नाही, आपल्या वाटा आपण शोधणारे आता असे अनेकजण नक्की आहेत.

वेड लागतं,त्याचीच पुढे करिअर होते..

1. ‘काय ते सारखं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसायचं?’ - हा घरोघरचा डायलॉग. हा डायलॉग तरुण मुलांवर क्षेपणास्नसारखा सोडून घरातले ज्येष्ठ नंतर स्वतर्‍ही आपापल्या मोबाइलमध्ये आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये डोकं घालून बसतात. मोबाइलचं आकर्षण, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, टॅब, पॅड वगैरे विविधता आणि त्यातून मिळणार्‍या सोयी ही आता सगळ्यांचीच गरज बनली आहे. ‘मोबाइल र्‍ शाप की वरदान’ वगैरे रटाळ निबंध गळ्यात पाडून घ्यायच्या आतच ते यंत्र त्यांच्या आधीच्या पिढीच्या हातात येऊन पडलं होतं ! त्यामुळे, त्यांना शाप आणि वरदान अशा दुहेरी मांडणीपेक्षा आणखी वेगळं त्यात काही असतं, हेही कळलं होतं. एकांगी कट्टरता काहीच कामाची नसते, हे समजून घ्यायलासुद्धा हे उदाहरण महत्त्वाचं आहे. 2. मोबाइल आल्यावर गेमिंगचं फॅड फार झपाटय़ानं वाढलं. त्या आधी घराघरांत आलेल्या संगणकांमध्ये काही मोजके गेम्स कॉम्प्युटरवाला टाकून जात असे. त्या गेम्समुळेसुद्धा उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. या गेम्समध्ये आकाराला आलेलं खोटं विश्व, त्या खेळांचा वेग, त्यातली हाणामारी, हिंसा, धरपकड, शूट करणं, तोडफोड वगैरे हे सगळं एका अर्थी चिंतेचं कारण होतंच. पण तरीही त्यांची संख्या मर्यादित होती. हळूहळू गेमिंगमध्ये प्रचंड व्हरायटी यायला लागली. वेगवेगळ्या लेव्हल्स पार करत पुढे जायचं आकर्षण लोकांना वाटू लागलं. काहींना त्याचं व्यसन जडलं, तर काहींना एका जागी बसून हे खेळत बसल्यानं शरीरावर विविध अपाय जाणवू लागले. ही एक बाजू!3. दुसरी बाजू म्हणजे, आपल्या मुलाला गेमिंग कॅफेमध्ये जाताना बघणं. वेळ आणि पैसाही वाया घालवताना बघणं. ‘हीच वर्ष आहेत करिअरची’ हा दबाव जरी आपल्या मुलांवर टाकायचा नसला तरी त्यात व्यावहारिक तथ्य असतंच. गेमिंगमध्ये रमलेल्या मुलाला ते करून जितका आनंद मिळत असतो, तितकंच मोठं आव्हान त्याच्या पालकांना त्याला आयुष्याचं भान देण्यात असतं. 4. आता मात्र काळ बराच पुढं सरकला आहे. आणि तंत्रज्ञानासह अनेक नवी करिअर तरुण मुलांनी आपलीशी करणंही सुरू केलं आहे. त्या करिअरच्या वाटय़ा त्यांच्या पालकांना ना माहीत आहेत, ना त्या वाटेवरच्या धोक्यांचा काही परिचय आहे. मात्र तरीही गेमिंग/हॅकिंग, सायबर सिक्युरिटी अशा वाटेनं अनेक तरुण मुलंमुली सहज निघाली आहेत. त्यातले काहीजण तर कुठलाही कोर्स न करताही आपण स्वतर्‍ काही गोष्टी करून पाहत, ऑनलाइन शिकत एक वाट तयार करकरून पुढं जात आहेत.5. हे नव्या वाटा चालणं, सोपं कसं असेल; पण ज्यांनी धाडस केलं ते आता निघालेत नवीन काही शोधत.