शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

झिरमिळ्या...फ्रिन्जेस ही एक नवीच फॅशन, पण, ती सोबर दिसते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 6:20 PM

फ्रिन्जेस ही एक नवीच फॅशन, पण, ती सोबर दिसते का?

- श्रुती साठे

फ्रिन्जेस हा शब्द गेलाय का तुमच्या कानावरून?नसेल तर ही एक नवीन, कोरीकरकरीत फॅशन आहे. नेहमीच्या ड्रेस, जॅकेट, स्कार्फमुळे येणाºया लूकला अजून हटके करायची संधी हे फ्रिन्ज तुम्हाला देतात. म्हणजे नक्की काय हे पाहण्यासाठी सोबतचा फोटो पाहा.अलीकडेच एका पार्टीत मलायका आणि अमृता भगिनी फ्रिन्ज ड्रेसमध्ये दिसल्या. त्याच पार्टीत करिनाने तर ही फ्रिन्ज स्टाइल बुटांसाठी वापरली.फ्रिन्जचा इतिहास अनोखा आहे. त्याचा वापर पहिल्यांदा अमेरिकेत फ्लॅपर गर्ल्सनी केला. फॅशनेबल, बिनधास्त आणि समाजची चौकट न मानणाºया या मुलींना फ्लॅपर म्हणत असत. त्यांचा पेहराव, केसरचनासुद्धा साधारण स्त्रियांपेक्षा वेगळी असायची. नंतर त्यावर आधारित फ्रिन्ज ड्रेसेस बॉलिवूडच्या कॅब्रे, डिस्को अशा बेधडक गाण्यांसाठी वापरू जाऊ लागले. झिरमिळ्यांचे बिंदू आणि हेलनचे ड्रेस आठवा.आता पुन्हा नव्यानं या फ्रिन्जचा वापर खास तरु णींसाठी कपडे बनवणारे ब्रॅण्ड्स वेगवेगळ्या रूपात करताना दिसतात. कधी ड्रेसच्याच कापडाच्या, मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट, कधी फुटवेअर, कधी पर्सनासुद्धा लावलेले फ्रिन्जेस पहायला मिळतात. थोडक्यात झिरमाळ्याच त्या. आताशा त्या ड्रेसच्या आणि बाह्यांचा काठाला लावल्या जातात. लोकरीच्या, लेदर आणि पॉलिस्टरमध्ये त्या विविध रंगात मिळतात. शॉर्ट आणि लॉँग श्रगला लावलेले फ्रिन्जेस अतिशय सुरेख दिसतात, ट्रेण्डी लूक देतात. फ्लोरल आणि आॅल ओव्हर प्रिंटेड श्रगच्या काठांना लेदरच्या फ्रिन्जेस सुरेख दिसतात.फ्रिन्जेसचा वापर फक्त पॉप आणि वेस्टर्न लूकसाठीच होतो हे श्रुती हसनने साफ खोटं ठरवलं. पारंपरिक लेहेंगा चोलीवर गुलाबाचे नक्षीकाम केलेली आणि फ्रिन्जेस लावलेली ओढणी आकर्षक आणि सोज्वळ दिसली. त्यावर घातलेले फ्रिन्जेसचे कानातलेपण शोभून दिसले. हा नवा प्रकार ट्राय करून पहायला हरकत नाही.