समजंसपणाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं !
By Admin | Updated: February 11, 2016 19:55 IST2016-02-11T19:55:24+5:302016-02-11T19:55:24+5:30
मी फक्त सोळा वर्षाची होते तेव्हा त्याच्या प्रेमात पडले.मी इंडिपेण्डंट आहे, होते हे त्यालाही माहिती आहे. त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्याच्यापेक्षा आजही जास्त पॅकेज घेते. पण हे सारं आमच्या नात्यात कधी आलं नाही.

समजंसपणाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं !
- सोनाली
मी फक्त सोळा वर्षाची होते तेव्हा त्याच्या प्रेमात पडले.मी इंडिपेण्डंट आहे, होते हे त्यालाही माहिती आहे. त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्याच्यापेक्षा आजही जास्त पॅकेज घेते. पण हे सारं आमच्या नात्यात कधी आलं नाही.
अमेरिकेत तर तो इतका वेगळा होता. पण तिकडून इकडे आलो, लिव्ह इनमध्ये पुण्यात राहू लागलो तर त्याचं भलतंच. कामवाली, स्वयंपाक, इस्त्री, भाज्या-किराणा आणणं, इत्यादि सगळी कामं मीच करायची, आणि ती झाली नाही तर तो मला जाब विचारायचा.
मी कितीदा म्हटलं की, मी तुझी बायको नाही, टिपिकल नव:यासारखा वागू नकोस. त्यात पैसे खर्च होणो, त्याचा हिेशेब, व्यवहार, मित्रमैत्रिणींचं येणं, त्यासाठीची ऊठबस हे सारं मीच करायचं.
मग मला प्रश्न पडू लागला की, स्वतंत्र आणि मॉडर्न असण्यापायी मी हे काय निवडलं आहे? एकीकडे लग्न नाकारलं, दुसरीकडे बायका लग्न करून जे करतात तेच मी करतेय.
त्यावरुन वाद सुरू झाले.
आणि आमचं समंजस रिलेशनशिप एकदम वादळी झाली.
शेवटी आम्ही कौन्सिलरकडे गेलो. एकमेकांच्या चुका, अपेक्षा समजून घेतल्या. खूप बोललो.
आणि काही प्रश्न सुटले. त्यातून आम्ही कामं वाटली, ती समजुतीनं करायचं ठरवलं. आणि एका टप्प्यावर लग्न करायचाही निर्णय घेतला.
आमच्यासारखे सगळे याच वाटेनं जात असतील पण आपल्या समाजात जोवर मुलं, घरकाम, त्यातले कष्ट, मुलींची त्यापायी होणारी वणवण समजून घेतली जात नाही तोर्पयत नात्यात वादाचे मुद्दे येणारच!
मग ते नातं लिव्ह इन का असेना !