फुकट शॉर्टफिल्मची चटणी
By Admin | Updated: February 1, 2017 15:44 IST2017-02-01T15:44:29+5:302017-02-01T15:44:29+5:30
शॉर्ट फिल्मस, तुम्हाला बघायला आवडतात? म्हणजे? हा काही प्रश्न आहे का? पण मी ३ तासांची भलीमोठी फिल्म नाहीये म्हणत. म्हणजे फीचर फिल्म नाही. शॉर्ट फिल्म. म्हणजे फिल्म्स आवडत असतील, तर त्यांच्या ‘आकाराने’ काय फरक पडतो, ना?

फुकट शॉर्टफिल्मची चटणी
पाहा
जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...
शॉर्ट फिल्मस, तुम्हाला बघायला आवडतात?
म्हणजे? हा काही प्रश्न आहे का?
पण मी ३ तासांची भलीमोठी फिल्म नाहीये म्हणत. म्हणजे फीचर फिल्म नाही. शॉर्ट फिल्म. म्हणजे फिल्म्स आवडत असतील, तर त्यांच्या ‘आकाराने’ काय फरक पडतो, ना?
तर २०१७ पासून फिल्मफेअरने हे शॉर्ट फिल्म अवॉर्ड्स देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये फिल्मफेअर आणि फेसबुक या दोघांच्या माध्यमातून या फिल्म्सचा प्रचार होणार. करायच एवढंच की तुम्ही तुमची फिल्म शूट करायची. ती २० मिनिटांपेक्षा कमी वेळाचीच असली पाहिजे बरं का, आणि धाडून द्यायची फिल्मफेअरकडे. पण फिल्मफेअर, त्यांच्या ज्युरीतर्फेत्या फिल्मचं परीक्षण करणार आणि मग विजेत्या फिल्म्स कोणत्या ते ठरवणार.
तर तुम्ही जर फिल्स बनवत असाल तर नक्कीच या वेबसाइटला भेट द्या, म्हणजे यावर्षी नाही जमलं तरीही पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही स्वत: केलेली फिल्म या वेबसाइटवर देऊ शकता.
तुम्ही फिल्म्स बनवत नाही, पण तुम्हाला जरा वेगळ्या धाटणीच्या फिल्म्स बघायला आवडतात? मग तर बेस्ट. लगेच आपल्या गुगल गॉडला filmfare short film awards 2017 असं शोधायला सांगा.
या वेबसाइडवर तुम्हाला बघायला मिळेल उत्तमातल्या उत्तम अशा शॉर्ट फिल्मचा खजिना. इथे बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांना बरोबर घेऊन तयार केलेल्या फिल्म्सबरोबर तुमच्या- आमच्यासारख्या हौशी कलाकारांनी तयार केलेल्या फिल्म्ससुद्धा आहेत.
यामध्ये यावर्षीचे पीपल्स चॉईस बक्षीस मिळालेली फिल्म ‘खामाखा’ आवर्जून बघा. त्याबरोबरच ‘चटणी’ नावाची अशीच बक्षीस मिळालेली फिल्म पण नक्की बघा!
आणि बाय द वे... तुम्हाला या फिल्म्स बघण्यासाठी साधारण शून्य पैसे खर्च करावे लागणार आहेत!
तर मग मनसोक्त बघा या शॉर्ट फिल्म्स.

http://www.filmfare.com/awards/short-films-2017/about-us