लिबर ऑफिस एक फुकट सॉफ्टवेअर
By Admin | Updated: July 6, 2016 17:27 IST2016-07-06T17:21:31+5:302016-07-06T17:27:00+5:30
संगणकाच्या वापराशिवाय कार्यालयाचे कामकाज आजकाल होऊच शकत नाही. मग ते कार्पोरेट कंपन्या असो किंवा अगदी छोट्या व्यावसायिकाचे कार्यालय असो.

लिबर ऑफिस एक फुकट सॉफ्टवेअर
>- अनिल भापकर
संगणकाच्या वापराशिवाय कार्यालयाचे कामकाज आजकाल होऊच शकत नाही. मग ते कार्पोरेट कंपन्या असो किंवा अगदी छोट्या व्यावसायिकाचे कार्यालय असो. संगणक हवा म्हणजे हवाच. म्हणजे पगारपत्रक तयार करणे, मार्केटिंगसाठी प्रेझेंटशन तयार करणे, रेकॉर्ड ठेवणे, आॅफिसची पत्रके टाईप करणे आदी सर्व प्रकारची आॅफिस कामे करण्यासाठी संगणकाचा वापर या कार्यालयामध्ये प्रामुख्याने केला जातो. यासाठी मायक्र्रोसॉफ्ट आॅफिस हे सॉफ्टवेअर पूर्वापार वापरले जाते. त्यासाठी किंमत मोजून कंपन्या हे सॉफ्टवेअर विकत घेतात. मात्र आज आपण अशा सॉफ्टवेअरबद्दल माहिती घेणार आहोत जे वरील सर्व कामे करतेच; पण हे सॉफ्टवेअर अगदी मोफत उपलब्ध आहे, त्याचे नाव आहे लिबर आॅफिस.
लिबर आॅफिस हे द डॉक्युमेंट फाऊंडेशन यांच्याकडून तयार करण्यात आलेले असून नो प्रॉफिट संकल्पनेवर आधारित आहे. हे एक मोफत सॉफ्टवेअर आहे. लिबर आॅफिस याचा अर्थ म्हणजे फ्री आॅफिस. कारण लिबर हा फे्रंच शब्द असून त्याचा अर्थ फ्री असा होतो. लिबर आॅफिस हे अनेक युजर्सनी मिळून तयार केलेले आहे. लिबर आॅफिस हे जगभरातील वेगवेगळ्या तीस भाषांना सपोर्ट करते. त्याचप्रमाणे लिबर आॅफिसचे विंडोज व्हर्जन, तसेच मॅक व्हर्जन आणि लिनक्स व्हर्जनदेखील मोफत उपलब्ध आहे.
लिबर आॅफिसची वैशिष्ट्ये
1) मोफत- होय लिबर आॅफिस हे १०० टक्के मोफतच आहे. त्याचे अपडेटदेखील मोफत उपलब्ध असून दर सहा महिन्याला मोफत उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे कुठलीही वार्षिक फी त्यासाठी घेतली जात नाही.
2) अनेक भाषांचा सपोर्ट - जगभरातील जवळपास ३० भाषांचा सपोर्ट लिबर आॅफिसला आहे आणि अजूनही अनेक भाषांचा सपोर्ट उपलब्ध करण्याचे काम चालू आहे.
3) स्वत:चे लिबर आॅफिस - तुम्ही लिबर आॅफिसमध्ये तुम्हाला हवे ते बदल करून दुसºयाला वापरायला देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आॅनलाईन सपोर्टसुद्धा उपलब्ध आहे.
4) २० वर्षांपासून - लिबर आॅफिसची ही संकल्पना वीस वर्षांपासून अस्तित्वात आहे.
5) युजर फ्रेंडली - लिबर आॅफिस हे अत्यंत युजर फ्रेंडली असून मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पावरपॉइंटच्या फाईल्स सहज यामध्ये इंपोर्ट करता येतात.