फराळवाले तरुण

By Admin | Updated: November 5, 2015 21:41 IST2015-11-05T21:41:16+5:302015-11-05T21:41:16+5:30

मुलीसुद्धा आताशा स्वयंपाकघरात जायला नाकं मुरडतात, तिथं तरुण दिवाळी फराळ करतात यावर कोण विश्वास ठेवील? पण असं घडतंय खरं!

Framed young | फराळवाले तरुण

फराळवाले तरुण

 - अनुराग भिडे

मुलीसुद्धा आताशा स्वयंपाकघरात जायला नाकं मुरडतात,
तिथं तरुण दिवाळी फराळ करतात
यावर कोण विश्वास ठेवील?
पण असं घडतंय खरं!
‘ तू काय माझी गंमत करतेस?’
ैअसं नाक उडवून उद्धटासारखं आईशी बोलणारी आणि रेडी टू कुक पदार्थही न करता येणारी जाहिरातीतली मुलगी.
पाहिलीये ना तुम्ही?
पण जाहिरातीतलं सारंच काही खरं नसतं.
कारण ट्रेण्ड बदललाय.
आणि स्वयंपाक करणं हे मुलींचंच काम, बायकी काहीतरी असं न समजणारे काही मुलं आपल्या आसपास थोडेबहुत का होईना आता दिसू लागलेत.
स्वयंपाकाचं एकवेळ ठीक आहे पण दिवाळीचं फराळ?
ते मुलांनी करायचं म्हणजे अतीच झालं?
आता तर अनेक मुलींनाही दिवाळीच्या करंजा नी साटो:या करण्यात रस नसतो, त्याच आईला सांगतात मिळतंय ना सगळं रेडिमेड?
मग आण ना?
तिथं तरुण मुलं किचनमधे जाऊन चकल्या पाडायला आणि शंकरपाळी लाटायला बसतील, हे म्हणजे जरा अतीच झालं!
असं वाटू शकतं?
पण अनेक तरुण मुलांना हे काम मनापासून करायला आवडतं.
बरेच जण स्वत:हून आईला मदत करतात. चकल्यांची भाजणी भाजतात. चकल्या पाडायलाच नाही तर तळायलाही बसतात.
लाडूचा रवा भाजतात, लाडू वळतात.
करंज्या-साटो:या करू लागतात.
्रआणि चिवडय़ाची चव पाहत चव करेक्शन करत चिवडाही खातात.
आणि काही तर त्याही पुढचे?
ते घरातलं मायक्रोवेव्ह ओव्हन वापरत दिवाळीत अनेक पदार्थ करूनही पाहतात.
बेक्ड करंजी, ते बेक्ड साटोरी, पफ पोह्यांचा चिवडा, गुलकंद पोळ्या आणि थेट पिङझाबिङझाही!
का करतात ते हे सारं?
तर त्यांना मजा येते. एरव्ही वेळ नसतो पण दिवाळीच्या सुटीत काहीतरी खास करून पहावं, ते इतरांना खाऊ घालावं असं वाटतं.
आनंद वाटतो.
म्हणून ते करतात.
आता पुढचा प्रश्न?
कितीजण करत असतील?
बाकी घरात तर दिवाळीत आई-बाबा मरमर काम करतात. राजपुत्र बसून राहतात, असंच चित्र असतं, असं कुणी विचारेलही!
ते ही खोटं नाही.
पण अपवाद का असेना पण अशा तरुण मुलांची संख्या वाढतेय ज्यांना किचनमधे रस आहे. स्वयंपाकाचे विविध पदार्थ, पाश्मिचत्त्य पदार्थ करून पाहणं हा त्यांचा नवा छंद आहे.
आणि स्वयंपाक करणं म्हणजे काहीतरी कमीपणा, बायकीपणा असं त्यांना वाटत नाही.
उलट आपण एक नवीन कला शिकतोय.
ती करून पाहतोय.
त्यातून स्ट्रेस कमी होतोय.
आनंद मिळतोय, असंच त्यांना वाटतंय.
त्यामुळे अशा क्रिएटिव्ह फुडी वाटेवरून चालणा:यांची संख्या कमी असेल पण तरीही नवीन वाट धरत ते काहीतरी खास करताहेत.
हे महत्त्वाचं!
आणि दिवाळी अशा वेगळ्या प्रकाशमय वाटांचंच तर प्रतीक आहे. 
त्यामुळे किचनमधे जाऊन यंदा प्रयोग करण्याचं मनात असेल.
दिवाळी फराळासाठी आलेल्या पाहुण्यांना इम्प्रेस करायचं असेल
किंवा आईचा जीव जाणत तिला थोडी मदत करायची असेल.
तर लेट्स, गेट सेट गो.
किचन तुमची वाट पाहतंय.
 

Web Title: Framed young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.