फॉरेन्सिक एक्स्पर्ट- गुन्ह्यांचा शोध घेणारे बिनावर्दीचे पोलीस
By Admin | Updated: May 30, 2014 10:31 IST2014-05-30T10:31:23+5:302014-05-30T10:31:23+5:30
‘सीआयडी’मधले डॉक्टर साळुंखे आठवतात. ‘सीआयडी’वाले कायम त्यांच्या लॅबमध्ये येऊन त्यांना काहीबाही शोधायला लावतात. एसीपी प्रद्युम्न आणि दया स्वत: कितीही हुशार असले तरी त्यांना प्रत्येक एपिसोडमध्ये या डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. हे डॉक्टर साळुंखे फॉरेन्सिक एक्स्पर्टचंच काम करतात

फॉरेन्सिक एक्स्पर्ट- गुन्ह्यांचा शोध घेणारे बिनावर्दीचे पोलीस
प्रयोगशाळेत आपलं कसब पणाला लावत गुन्हेगारापर्यंत पोहचण्याचं एक खास काम.
‘सीआयडी’मधले डॉक्टर साळुंखे आठवतात. ‘सीआयडी’वाले कायम त्यांच्या लॅबमध्ये येऊन त्यांना काहीबाही शोधायला लावतात. एसीपी प्रद्युम्न आणि दया स्वत: कितीही हुशार असले तरी त्यांना प्रत्येक एपिसोडमध्ये या डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. हे डॉक्टर साळुंखे फॉरेन्सिक एक्स्पर्टचंच काम करतात. आता टीव्हीवरच्या मालिकातला अतिरंजित भाग सोडला तरी फॉरेन्सिक एक्स्पर्टचं काम इतकंच थरारक आणि आव्हानात्मक असतं. या क्षेत्रात काय येत नाही, विज्ञान, आरोग्य, ते पर्यावरण हे सारं या शाखेत अभ्यासलं जातं. मुख्यत: प्रयोगशाळेतच हे काम सांगतं. गुन्हेगारानं पाठीमागे ठेवलेले बारके पुरावे शोधत पोलिसांना मदत करण्याचं काम हे फॉरेन्सिक एक्स्पर्ट करतात.
विविध प्रयोग करून, चाचण्या करून, समाधान होईपर्यंतचा ताळा हाताशी लागत नाही तोपर्यंत हे एक्स्पर्ट काम करतात. त्यानंतर हाती आलेल्या तपशिलाचं विेषण करून, डाटा हाताशी ठेवून ते पोलिसांना समजेल अशा भाषेत रिपोर्ट लिहून देतात. टीव्हीवर दिसतं तितकंच किंवा त्याहूनही अत्यंत थरारक असं हे काम, नव्या संदर्भात तर या कामाचं महत्त्व अधिक वाढत आहे.
फॉरेन्सिक एक्स्पर्ट कोण असतात ?
फॉरेन्सिक एक्स्पर्ट असं म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर कुणीतरी एकच व्यक्ती येतो. पण एकच माणूस सगळी कामं करतो असं नाही. फॉरेन्सिक एक्स्पर्ट असलेलेही अनेक विषयांतले तज्ज्ञ असतात.
१) मेडिकल एक्झामिनर - दणदणीत पैसे कमवून देणारं पण नॉन ग्लॅमरस असं हे काम. मृत शरीराची ऑटॉस्पी अर्थात शवपरीक्षा करण्याचं, मृत्यूचं कारण शोधून काढण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हे तज्ज्ञ करतात. आपण अनेकदा बातम्यांत वाचतो की ऑटॉस्पी रिपोर्ट आला की, मृत्यूचं कारण समजेल, तोच रिपोर्ट हे तज्ज्ञ देतात.
२) क्राईम लॅबोरटरी अँनालिस्ट - हे तज्ज्ञ प्रयोगशाळेत विविध चाचण्या करून मृत्यूचं कारण, ते पुराव्यांची चाचणी करतात.
३) फॉरेन्सिक ऑनकोलॉजिस्ट - खरं तर हे तज्ज्ञ डेंटिस्ट असतात. पूर्णवेळ काम करण्यापेक्षा ते सल्लागार म्हणून काम करतात.
४) फॉरेन्सिक इंजिनिअर - विविध प्रकारचे अपघात, त्यातून झालेल्या जखमा, यासंदर्भात ते काम करतात.
५) क्राईम सीन एक्झामिनर - गुन्हा घडला त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ते मृत व्यक्तींची पाहणी करतात. अन्य गोष्टींची माहिती घेऊन, गुन्हा कसा घडला असेल याचा अभ्यास करतात.
६) फॉरेन्सिक फोटोग्राफी - गुन्हा घडला त्या जागेचे, वस्तूंचे आणि मृत व्यक्तींचे फोटो काढणं, पुरावे पाहून फोटो काढणे आणि त्याचे रेकॉर्ड ठेवणं यात अपेक्षित असतं.
७) याशिवाय - फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्ट, क्रिमिनॉलॉजिस्ट, फॉरेन्सिक अकाउण्टंट या विषयातही करिअरला स्कोप आहे. मात्र यासंदर्भातले अभ्यासक्रम आपल्याकडे अजून उपलब्ध नाहीत.
प्रशिक्षण कुठे?
अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी ( http://www.amu.ac.in/)
दिल्ली विद्यापीठ (http://www.du.ac.in/du/)
अण्णा विद्यापीठ, चेन्नई, (http://www.annauniv.edu/)
पंजाबी विद्यापीठ, पटियाला (punjabipedia.org/)
विश्वविद्यालय सागर, सागर विद्यापीठ मध्य प्रदेश, (www.dhsgsu.ac.in/)
डिपार्टमेण्ट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, मद्रास विद्यापीठ
(www.tn.gov.in/tamilforensic)
डिपार्टमेण्ट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँण्ड फॉरेन्सिक सायन्स, धारवाड, कर्नाटक (http://karnatakcollege.com/departments/criminology-forensic-science)
एमएससी इन फॉरेन्सिक सायन्स, कर्नाटक विद्यापीठ (http://karnatakcollege.com/departments/criminology-forensic-science)
फॉरेन्सिक एक्स्पर्ट कसं होता येतं?
१) एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतर फॉरेन्सिक एक्स्पर्ट होता येतं.
२) दुसरा मार्ग म्हणजे बीएस्सीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, झुलॉजी, बॉटनी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायॉलॉजी, बीफार्म, बीडीएस यापैकी कशाचीही डिग्री असेल तर तुम्ही फॉरेन्सिक सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता.