पावलात पॉवर
By Admin | Updated: January 29, 2015 15:28 IST2015-01-29T15:28:35+5:302015-01-29T15:28:35+5:30
हील्स म्हणजे पायात उंच टॉवर? नव्हे.

पावलात पॉवर
>हायहील्स घालून टाक्टाक् चालत जायचं याची बहुतेक प्रत्येक मुलीला क्रेझ असते! ‘मला नाही आवडत हाय हील्स’ असं जी नाक मुरडून म्हणते तिच्याही मनात एकदा कधीतरी आपण पॉइण्टर हील्स घालून चालून पहावं असं खोल दडलेलं असतंच म्हणा!
चाल जास्त पडते म्हणून पाय किंवा पाठ दुखते म्हणून, हिल्स घालून पळता येत नाही म्हणून अनेकजणी हील्स वापरत नाहीत हे खरंय!
मात्र तरी ‘हील्स’ घालण्याची फॅशन कधीच जुनी होत नाही.
आणि आता तर काय, एका फ्रेंच अभ्यासानं हे सिद्धच केलंय की, हील्स घातले की मुलींच्या व्यक्तिमत्त्वाला अँडिशनल पॉवर मिळते.
हील्स? आणि पॉवर?
युनिव्हर्सिटी द ब्रिटाज-सूड या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार फॅशनचा हा नवीन संदर्भ समोर आला आहे. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचा अभ्यास करणार्या या विद्यापीठातल्या अभ्यासकांचं म्हणणंच आहे की; हील्स वापरणार्या मुलींकडे पाहण्याची पुरुषांची दृष्टी वेगळी असते, आणि त्या मुलींचा अँटिट्यूडही ठाम आणि स्पष्ट असतो.
एकतर हील्स घालून मुली सुंदर दिसतात, आणि दुसरं म्हणजे त्या ‘अँप्रोचेबल’ नाहीत असा संदेशही देतात असं हा अभ्यास म्हणतो!
हाय हील्स ही फॅशन कधीच आउटडेटेड ठरणार नाहीत, असाही या अभ्यासाचा दावा आहे.
जगातले सगळ्यात ‘हॉट’ आणि स्टायलिश हील्स ज्यांना म्हणतात, स्पाईक्ड हील्स. जगभरातल्या रनवेज् आणि नाईटक्लबमध्ये सध्या हेच हील्स जास्त दिसतात. १0 सेंण्टीमीटर म्हणजेच ४ इंच एवढी या हिल्सची उंची असते.
एक्स्ट्रिम हील्स ही खरी तर सध्याची सर्वाधिक क्रेझ असलेले हील्स आहेत. १३ सेण्टीमीटर ५ इंच इतकी त्याची उंची. अर्थात हे हील्स वापरणं धोकादायक असतं, पण ते आपण कधीतरी वापरू शकू असं स्वप्न पाहणार्या मुलींची संख्या युरोपात जास्त आहे.
हील्स नियमित वापरल्यानं पाठदुखी, पाय मुरगुळणं, घोट्याचं दुखणं हे आाजार होतातच, तरीही उंचच उंच हील्स वापरण्याची क्रेझ जगभरात वाढतेच आहे.